Lokmat Sakhi >Beauty > केस विरळ झालेत? वाटीभर तांदूळाचे पाणी 'या' पद्धतीने केसांना लावा, घनदाट-सॉफ्ट होतील केस

केस विरळ झालेत? वाटीभर तांदूळाचे पाणी 'या' पद्धतीने केसांना लावा, घनदाट-सॉफ्ट होतील केस

Best Ways To Use Rice Water For Long Hairs (Kes Vadhvnyache Upay) : तांदूळात व्हिटामीन बी, सी असते. यातील कार्बोहायड्रेट्स केसांना रिपेअर करण्यास मदत करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 11:24 AM2024-04-05T11:24:40+5:302024-04-05T11:54:31+5:30

Best Ways To Use Rice Water For Long Hairs (Kes Vadhvnyache Upay) : तांदूळात व्हिटामीन बी, सी असते. यातील कार्बोहायड्रेट्स केसांना रिपेअर करण्यास मदत करतात.

Best Ways To Use Rice Water For Long Hairs : How To use Rice Water For Get Long Hairs Naturally | केस विरळ झालेत? वाटीभर तांदूळाचे पाणी 'या' पद्धतीने केसांना लावा, घनदाट-सॉफ्ट होतील केस

केस विरळ झालेत? वाटीभर तांदूळाचे पाणी 'या' पद्धतीने केसांना लावा, घनदाट-सॉफ्ट होतील केस

तांदूळ (Rice) आपल्या रोजच्या खाण्यातील एक घटक आहे, लोक चवीने भात खातात. भात एक ब्युटी इंग्रिडीएंटही आहे. तांदूळाच्या पाण्याचा वापर फारसा केला जात नाही. (Hair Growth Tips)  तांदूळ धुतल्यानंतर पाणी फेकून दिलं जातं.  केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळण्यासाठी  काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.  जसं की केमिकल्सयुक्त क्रिम्स वापरण्यापेक्षा घरगुती उपाय करून तुम्ही केसांची चांगली काळजी घेऊ शकता. (How To use Rice Water For Get Long Hairs Naturally) तांदूळात व्हिटामीन बी, सी असते. यातील कार्बोहायड्रेट्स केसांना रिपेअर करण्यास मदत करतात.

रिसर्चनुसार जपानमधील महिलांच्या लांबसडक केसांचे सिक्रेट हे तांदूळाचे पाणी आहे. जवळपास ५ ते ६ फुटांपर्यंत या महिलांचे केस आहेत.  (Ref) तांदूळामुळे स्काल्पला पोषण मिळून केसांची इलास्टिसिटी वाढते. तांदूळाचे पाणी आंबवून वापरल्यास त्याचा जास्त फायदा होतो.  कारण यात एंटी ऑक्सिडेंट्स जास्त प्रमाणात असतात. २ दिवस आंबवल्यानंतर या पाण्याचा आपल्या रूटीनमध्ये समावेश करा. (How to Make Rice Water For Hair Growth)

दाट आणि  जाड केसांसाठी तुम्ही तांदूळाच्या पाण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकता. सगळ्यात आधी तांदूळाचे पाणी तयार कसे करायचे ते समजून घ्यायला हवं. तांदूळाचे पाणी तयार करण्यासाठी २ कप तांदळात जवळपास ४ कप पाणी घाला आणि आचेवर ठेवून द्या. जितका  तांदूळ घ्याल त्याच्या दुप्पट पाणी घ्या. तांदूळाचे पाणी ८ ते १६  तासांसाठी भिजवून ठेवा त्यांतर गाळून या पाण्याचा वापर करा. तांदूळ अर्धा तास शिजवल्यानंतर पाणी आणि तांदूळ  वेगळे करा.  बरेचसे लोक भात आंबवून हे पाणी केसांना लावतात.

केसांवर तांदूळाच्या पाण्याचा वापर कसा कराल? (How To Use Rice Water For Hairs)

तांदूळाच्या पाण्याच्या हेअर मास्क  केसांवर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे लावू शकता. तांदूळाचे पाणी केसांच्या मुळांना व्यवस्थित लावा. अर्धा ते एक तास तसंच ठेवून केस स्वच्छ धुवून घ्या. २ ते ३ वेळा केसांना तांदूळाचे पाणी लावू शकता.  शॅम्पूने केस व्यवस्थित धुतल्यानंतर तांदूळाच्या पाण्याने केस धुवा. या पद्धतीने  केस धुतल्यास केस दाट होतील आणि केस मऊ होतील. यामुळे केसांना इंस्टंट शाईनसुद्धा येईल. 

तांदूळाच्या पाण्याचा स्प्रे बनवून तुम्ही केसांना लावू शकता. (Rice Water Spray) तांदूळाचे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा त्यानंतर केसांवर स्प्रे करा. केस धुण्याच्या १ तास आधी हा स्प्रे केसांना लावा. केसांची मालिश करण्यासाठी तुम्ही या पाण्याचा उपयोग करू शकता. 

Web Title: Best Ways To Use Rice Water For Long Hairs : How To use Rice Water For Get Long Hairs Naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.