डोळ्यांखाली काळे, गडद डार्क सर्कल्स येण्याची समस्या बऱ्याचजणींना सतावते. एकदा का डोळ्यांखाली हे डार्क सर्कल्स आले की ते जाता जात नाहीत. डोळ्यांखाली येणारे डार्क सर्कल्स (How To Use DESI GHEE for Dark Circles) आपल्या सुंदर चेहऱ्याचा संपूर्ण लूक बिघडवतात. चेहरा गोरा आणि डोळ्यांखाली काळे डार्क सर्कल्स ( Use ghee to reduce dark circles) यामुळे अनेकदा आपला चेहरा विचित्र आणि फारच (Add Desi Ghee To Your Skincare Routine To Prevent Dark Circles) थकलेला दिसतो. तासंतास स्क्रीनकडे पाहणे, अपुरी झोप, ताण-तणाव, वाढते वय किंवा पोषणातील कमतरता यांसारख्या अनेक कारणांमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल्स दिसू लागतात. सुरुवातीला हलके आणि कमी गडद दिसणाऱ्या डार्क सर्कल्सवर वेळीच काही उपाय केले तर ते न वाढता लगेच कमी होण्याची शक्यता असते( Best Ways To Use Ghee For Dark Circles).
डोळ्यांखाली दिसणाऱ्या या डार्क सर्कल्सवर आपण काही साधेसोपे घरगुती उपाय देखील सहज करु शकतो. डोळ्यांखाली दिसणारे डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी आपण स्वयंपाक घरातील साजूक तुपाचा वापर करु शकतो. आयुर्वेदात साजूक तुपाला त्वचेचा पोत सुधारण्याचं औषध मानलं जातं. साजूक तुपातील पोषक घटक त्वचेला हायड्रेट करून काळेपणा कमी करण्यास मदत करतात. डोळ्यांखालील डार्क सर्कल्ससाठी साजूक तूप लावण्याचा सोपा आणि घरच्याघरीच करता येणारा उपाय कसा करावा, हे पाहूयात.
डार्क सर्कल्स घालवण्यासाठी अस्सल देसी उपाय...
फिटनेस आणि न्यूट्रिशनिस्ट, नितेश सोनी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करण्याचा अस्सल देसी उपाय सांगितला आहे. नितेश सोनी यांच्यामते, ‘‘ज्यांच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स आहेत, त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी थोडंसं साजूक तूप हलकं गरम करून ते बोटावर घेऊन हळूवारपणे डोळ्यांखाली लावावं.’’ त्यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही रोज हा उपाय करत राहिलात, तर काही दिवसांतच डोळ्यांखालील डार्क सर्कल्सचा काळेपणा कमी व्हायला लागेल आणि हळूहळू डार्क सर्कल्स पूर्णपणे गायब होतील.
डार्क सर्कल्ससाठी साजूक तूप वापरण्याची पद्धत...
थोडं साजूक तूप एका वाटीत घ्या आणि हलकं गरम करा, इतकंच की त्वचेला चटका बसणार नाही. त्यानंतर त्वचेला सोसवेल इतकंच गरम साजूक तूप बोटांवर घ्या. आता तूप हलक्या हाताने टॅप करत करत डोळ्यांखाली लावा आणि गोलाकार पद्धतीने बोट फिरवत डोळ्यांखालील त्वचेला मसाज करुन घ्या. शक्यतो रात्री झोपण्यापूर्वीच हा उपाय करा आणि हे तूप रात्रभर तसेच डोळ्यांखाली लावून ठेवा. जर तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे लावत राहिलात, तर सुमारे दोन ते तीन आठवड्यांतच तुम्हाला फरक दिसायला लागेल. डोळ्यांखालील गडद डार्क सर्कल्स हलके होतील, त्वचा मऊ आणि मॉइश्चराइज होईल आणि डोळ्यांखालची सूज देखील कमी होईल.
दिसाल इतक्या सुंदर की बघत राहिल प्रत्येकजण! ‘या’ घरगुती सीरमचे फक्त २ थेंब करतात जादू...
डार्क सर्कल्सवर साजूक तूप कसे फायदेशीर...
साजूक तूप फक्त खाण्यासाठीच नाही, तर त्वचेसाठीही ते कोणत्या सुपरफूडपेक्षा कमी नाही. यात व्हिटॅमिन A, D, E आणि K असतात, जे त्वचेला आतून दुरुस्त करतात. साजूक तुपामध्ये ओमेगा - ३ फॅटी ॲसिड्स असतात, जे त्वचेची सूज कमी करतात आणि त्वचा मऊ करतात. तुपामधील सोबतच नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्मांमुळे थकलेली त्वचा रिलॅक्स होते. जेव्हा तुम्ही हलकं गरम साजूक तूप डोळ्यांखाली लावता, तेव्हा ते हळूहळू त्या भागाची सूज कमी करतं, रक्ताभिसरण सुधारतं आणि त्वचेची दुरुस्ती करून नैसर्गिक चमक देतं.
१ चमचा खोबरेल तेल-१ चिमूट तुरटी, चेहरा इतका चमकेल की मैत्रिणी विचारतील फेशियलचं नाव...
सोबतच लक्षांत ठेवा...
१. मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनकडे खूप वेळ एकटक बघू नका.
२. पुरेशी झोप घ्या, किमान ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्या, रात्री उशिरापर्यंत जाग राहू नका.
३. डोळे वारंवार चोळणं टाळा.
४. शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून दिवसभर पाणी पित राहा.