हिवाळा सुरु झाला की वातावरणातला गारवा वाढतो. ज्याचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. (Winter skincare tips) पण या काळात सगळ्यात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे त्वचेचा कोरडेपणा. दिवसभर वातावरणात गारवा, ऊन यामुळे रात्रीपर्यंत आपली त्वचा काळी पडते, निस्तेज होते किंवा राठ दिसू लागते.(Reduce dark circles naturally) यामुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल, सुरकुत्या, बारीक रेषा आणि पिग्मेंटेशनच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात.(Night cream for glowing skin)
अनेकदा आपण दिवसभर त्वचेची काळजी घेतो. स्किन केअरही फॉलो करतो. पण रात्री झोपताना त्वचेची काळजी घेत नाही.(Winter beauty routine) ज्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ग्लो हरवतो. हिवाळ्यात चेहऱ्यावर ‘ग्लो’ आणि टवटवीत ठेवणे आणखी कठीण होते. अशावेळी काही घरगुती क्रीम रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा. ज्यामुळे आठवड्याभरात पुन्हा आपला चेहरा ग्लो करण्यास मदत होईल.
ही क्रीम बनवण्यासाठी आपल्याला २ चमचे कोरफडीचा गर, १ चमचा एरंडेल तेल आणि २ व्हिटॅमिन ई कॅप्सूल लागतील. यानंतर आपल्याला एका बाऊलमध्ये कोरफडीचा गर घेऊन त्यात एरंडेल तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. हे तिन्ही घटक नीट मिसळा. याचा पांढरा मलईसारखा थर तयार होईल. रात्री झोपण्यापूर्वी हे क्रीम नियमितपणे त्वचेवर लावा. २ आठवडे त्वचेला ही क्रीम लावल्यास आपली त्वचा तरुण राहिल.
अस्सल गावरान पद्धतीची शेव-टोमॅटो भाजी, १५ मिनिटांत होईल चमचमीत पदार्थ, चवीलाही बेस्ट-सोपी रेसिपी
या क्रीममध्ये सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करणारे घटक आहे. दिवसातील प्रदूषण, मेकअप, धूळ-मळ, सूर्याच्या हानिकारक किरणांचा परिणाम हे सगळं त्वचा रिपेअर करण्याचं काम रात्री झोपेत सुरू करतं. त्या वेळी योग्य नाईट क्रीम लावली तर तिचा फायदा दुप्पट होतो. तसेच या क्रीममुळे रक्ताभिसरण वाढते, त्वचेला कूलिंग-हायड्रेशन करते आणि डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी उत्तम मानली जाते.
