हिवाळा सुरु झाला की सगळ्यात जास्त त्रास होतो तो आपल्या त्वचेला. दिवसभर थंड वारा, कमी आर्द्रता आणि कोरड्या वातावरणाचा आपल्या त्वचेला त्रास होतो.(Winter skincare tips) त्वचेतील नैसर्गिक ओलावा झपाट्याने कमी होऊ लागतो.(Night skincare routine) यामुळे चेहरा कोरडा, निस्तेज आणि रापलेला दिसू लागतो. चेहऱ्यावर सुरकुत्या, डार्क सर्कल , त्वचा ओढल्यासारखी जाणवू लागते.(Winter glow tips) ओठ फुटणे हे सामान्य असलं तरी हे याचा आपल्याला त्रास होतो. कितीही क्रीम लावली तरी चेहरा पुन्हा कोरडा पडतो.(Natural skincare in winter)
हिवाळ्यात रात्रीचा काळ हा त्वचेच्या दुरुस्तीसाठी चांगला असतो. या काळात त्वचा नैसर्गिकरित्या बरी होते आणि पुन्हा नव्याने चमकते.(Skin glow tips) पण रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी योग्य पद्धतीने घेतल्यास सकाळी चेहरा सुंदर, मऊ आणि चमकदार होण्यास मदत होईल.
सावळा गं रंग माझा...! शोभून दिसतात ७ रंगांच्या साड्या, खुलून दिसतो लूक- चेहऱ्यावरही येईल चकाकी
1. हिवाळ्यात व्हीप्ड किंवा जेल क्रीम त्वचेला ओलावा देत नाहीत. त्याऐवजी आपण शिया बटर, कोको बटर, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइलसारखे घटक वापरु शकतो. त्यासाठी चांगले मॉइश्चरायझर निवडा. हे त्वचेवर चांगल्या प्रकारचा थर निर्माण करुन ओलावा टिकवून ठेवते.
2. जर आपली त्वचा खूप कोरडी असेल तर झोपण्यापूर्वी हायल्यूरॉनिक अॅसिड सीरम लावा. ज्यामुळे त्वचेतील पाणी टिकून राहते. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते.
3. व्हिटॅमिन ई हे नैसर्गिक अँटीऑक्सिडेंट आहे जे त्वचेला रात्रीच्या वेळी दुरुस्त करण्यास मदत करतात. आपल्या क्रीममध्ये व्हिटॅमिन ई चे काही थेंब मिसळा. यानंतर त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा. थंडीमुळे चेहऱ्याचा कोरडेपणा आणि सुरकुत्या कमी होतील.
केमिकल डाय नकोच! तेलात मिसळा १ पदार्थ, केस होतील मुळापासून काळेभोर- पांढरे केस चमकणारही नाही
4. कोरडी त्वचा असलेल्यांसाठी गुलाबाचे तेल, बदाम तेल, ऑर्गन ऑइल किंवा जोजोबा तेल चांगले असते. याचे काही थेंब रात्री चेहऱ्यावर लावा. ते त्वचेला पोषणा देतात, मॉइश्चरायझ करतात आणि चमक देतात.
5. हिवाळ्यात सर्वात जास्त ओठ फाटतात, कोरडे पडतात. पण रात्री झोपण्यापूर्वी लिप बाम लावा. डोळ्यांखाली काळी वर्तुळे किंवा सूज येत असेल तर क्रीम लावा. डोळ्यांखालील त्वचा नाजूक असते. त्यासाठी मॉइश्चरायझर लावायला हवं.
6. जर आपला चेहरा लाल होत असेल, सतत जळजळत असेल किंवा संवेदनशील असेल तर रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर लावा. हे थंड, मॉइश्चरायझिंग असते. हिवाळ्यात रात्री त्वचेची निगा राखल्यास सकाळी त्वचा चमकण्यास मदत होईल. तसेच चेहरा धुतल्यानंतर कोणतेही क्रीम किंवा सीरम लावा.
