केसगळतीची समस्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चुकीची जीवनशैली, जंक फूड, हार्मोनल बदल, हवामानातील बदल, जास्त केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स आणि हेअरस्टाईनिंग याचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या केसांवर होतो.(hair fall remedy) यामुळे केस सहज तुटतात, निस्तेज दिसू लागतात किंवा केसांना फाटे फुटतात.(hair growth tips) अनेकदा आपण केसांसाठी महागडी हेअर ट्रीटमेंट्स, सिरम्स, स्पा किंवा केमिकल उपचार करून पाहतो, पण याचा परिणाम तात्पुरताच ठरतो आणि केसांना जास्त प्रमाणात डॅमेज करते. (home remedies for hair fall)
आजकाल बहुतेक जणांना वेळेअभावी केसांची योग्य काळजी घेता येत नाही. यामुळे केस कोरडे पडतात, गळतात. अशावेळी आपण केसांसाठी महागडे शाम्पू, हेअर ट्रिटमेंट्स किंवा काही औषधांचा वापर करतो.(tea powder for hair) पण त्याऐवजी आपण स्वयंपाकघरात आढणाऱ्या चहा पावडरचा वापर करु शकतो. यासाठी आपल्याला चहा पावडरमध्ये १ खास गोष्ट मिसळावी लागेल.(damaged hair treatment) ज्यामुळे केसांतील कोंडाही कमी होईल आणि केस गळणारही नाही.
आपल्याला केसांसाठी चहा पावडर, तांदूळ, मेथीचे दाणे आणि कढीपत्ता लागेल. सगळ्यात आधी आपल्याला चहा पावडर, मेथीचे दाणे, तांदूळ आणि कढीपत्ता पाण्यामध्ये उकळवावा लागेल. थंड झाल्यानंतर हे मिश्रण शाम्पूमध्ये मिसळून हर्बल हेअर क्लिंझर तयार करा. जेव्हा आपण केस धुवू तेव्हा हा उपाय करा. चहाची पाने आपल्या केसांना नैसर्गिक चमक देतात. यामध्ये असणारे अँटीऑक्सि़डंट्स केसगळती कमी होण्यास मदत करते. तसेच केसांची मुळे देखील मजबूत होतात.
तांदूळ केसांना आतून मजबूत करण्याचे काम करतो. केसांचा पोत सुधारुन फाटे फुटलेल्या केसांना दुरुस्त करण्यास मदत होते. मेथीचे दाणे केसांना आणि टाळूला खोलवर पोषण देतात. केसांची वाढ होण्यास मदत होते. कढीपत्ता केसांना अकाली पांढरे होण्यापासून रोखतो आणि नवीन केसांची मुळापासून वाढ करतो.
