Lokmat Sakhi >Beauty > भुवया आणि पापण्यांचे केस पांढरे व्हायला लागले? बोटावर ‘हे’ तेल घेऊन करा मसाज- पाहा जादू...

भुवया आणि पापण्यांचे केस पांढरे व्हायला लागले? बोटावर ‘हे’ तेल घेऊन करा मसाज- पाहा जादू...

Best home remedies to get thick eyebrows : what to do if eyebrows are very thin : how to get dark black and thick eyebrows : भुवया व पापण्यांचे केस निस्तेज, पांढरे किंवा विरळ दिसतात, मग एकदा हे खास घरगुती तेल वापरुन पाहाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2025 13:21 IST2025-07-12T13:05:35+5:302025-07-12T13:21:13+5:30

Best home remedies to get thick eyebrows : what to do if eyebrows are very thin : how to get dark black and thick eyebrows : भुवया व पापण्यांचे केस निस्तेज, पांढरे किंवा विरळ दिसतात, मग एकदा हे खास घरगुती तेल वापरुन पाहाच...

Best home remedies to get thick eyebrows what to do if eyebrows are very thin how to get dark black and thick eyebrows | भुवया आणि पापण्यांचे केस पांढरे व्हायला लागले? बोटावर ‘हे’ तेल घेऊन करा मसाज- पाहा जादू...

भुवया आणि पापण्यांचे केस पांढरे व्हायला लागले? बोटावर ‘हे’ तेल घेऊन करा मसाज- पाहा जादू...

वाढत्या वयोमानाप्रमाणे किंवा अगदी ऐन तारुण्यात देखील अनेकांना भुवयांचे केस पांढरे होणे, विरळ होणे किंवा गळणे याचा त्रास होतो. चेहऱ्याच्या सौंदर्यात भुवया व पापण्या महत्त्वाची (Best home remedies to get thick eyebrows) भूमिका बजावतात. शक्यतो, भुवया व पापण्यांचे केस दाट, काळेभोर (what to do if eyebrows are very thin) आणि भरीव असले तरच चेहरा आणि डोळे उठून दिसतात. परंतु काहीवेळा आपले भुवयांचे केस पांढरे होऊ लागतात किंवा विरळ होतात यामुळे सौंदर्य हरवून गेल्यासारखे वाटते(how to get dark black and thick eyebrows).

शरीरातील हार्मोनल बदल, स्ट्रेस, पोषणाची कमतरता किंवा केमिकल्सयुक्त ब्यूटी प्रॉडक्सचा अतिरेक यामुळे भुवयांचे केस निस्तेज, पांढरे किंवा विरळ होऊ शकतात. अशा परिस्थितीत, भुवया व पापण्यांच्या केसांचे सौंदर्य बिघडू द्यायचे नसेल तर या समस्येवर घरगुती उपाय करणे अधिक फायदेशीर ठरते. नैसर्गिक आणि घरच्याघरीच तयार केलेलं तेल हा सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. भुवया व पापण्यांच्या केसांचे हरवलेले सौंदर्य पुन्हा आणण्यासाठी घरगुती तेल कसे तयार करायचे आणि त्याचा वापर कसा करायचा ते पाहूयात.   

साहित्य :- 

१. खोबरेल तेल - ५ ते ६ टेबलस्पून 
२. दुधीभोपळा - १ छोटा तुकडा (चमचाभर किसून घेतलेला दुधीभोपळा)
३. मेथी दाणे - ५ ते ६ दाणे 
४. कलोंजी - १/२ टेबलस्पून 
५. एरंडेल तेल - १ टेबलस्पून 

 कृती :- 

सगळ्यांतआधी एका भांड्यात खोबरेल तेल घेऊन त्यात चमचाभर किसून घेतलेला दुधीभोपळा, मेथी दाणे, कलोंजी असे सगळे पदार्थ एकत्रित घालून मिसळून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण गॅसच्या मंद आचेवर हलकेच गरम करुन द्यावे. एक हलकीशी उकळी आली की गॅस बंद करावा. त्यानंतर हे मिश्रण थोडे थंड होण्यासाठी ठेवून द्यावे. हे मिश्रण थंड झाल्यावर गाळणीच्या मदतीने गाळून घ्यावे. गाळून घेतलेल्या या तेलात चमचाभर एरंडेल तेल मिसळावे. आता हे तयार तेल एका बाटलीत भरुन स्टोअर करावे. 

चेहऱ्यावर तेज-केस काळेभोर, क्या है राज? फक्त १ बटाटा, हा घरगुती उपाय शंभर टक्के असरदार...

याचा वापर कसा करावा ? 

तयार तेल आपण भुवया आणि पापण्यांच्या केसांवर देखील लावू शकतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी थोडेसे तेल बोटांवर घेऊन ते भुवया आणि पापण्यांवर लावून मसाज करून घ्यावा. त्यानंतर रात्रभर हे तेल तसेच राहू द्यावे दुसऱ्या दिवशी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. दररोज २० ते २५ दिवस हा उपाय सलग केल्यास भुवया, पापण्यांचे केस दाट आणि काळेभोर होण्यास मदत होते.  

पोटली तेलाने करा मसाज! आजीबाईच्या बटव्यातील सोन्यासारखा उपाय, केसांच्या समस्याच विसरुन जा... 


हे घरगुती औषधी तेल वापरण्याचे फायदे... 

१. खोबरेल तेल :-  खोबरेल तेल केसांना पोषण देऊन नैसर्गिकरीत्या वाढीस मदत करते.

२. दुधीभोपळा :- दुधीभोपळा केसांचा कोरडेपणा कमी करून त्यांना मऊ व निरोगी ठेवतो.

३. मेथी दाणे :- मेथी दाण्यातील प्रथिने आणि निकोटिनिक ॲसिड केसांची वाढ आणि पांढरेपणा कमी करण्यास मदत करतात. 

४. कलोंजी :- कलोंजीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे केस गळणे, पांढरे होणे आणि विरळपणा कमी करण्यास मदत करतात. 

५. एरंडेल तेल :- एरंडेल तेल केसांना अधिक दाट व काळेभोर करण्यास मदत करतात.

Web Title: Best home remedies to get thick eyebrows what to do if eyebrows are very thin how to get dark black and thick eyebrows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.