Join us

गुढीपाडवा : शोभायात्रेला नटून जायचंय, पण पिंपल्सचं टेंशन? 'हा' घरगुती उपाय- टॅनिंग -पिंपल्स गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2025 16:26 IST

Best Home Remedies For Removing Pimples And Tanning: चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि टॅनिंग कमी करायचं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेचच करून पाहा..(how to get clear skin?)

ठळक मुद्देहा उपाय केल्याने पिंपल्स तर कमी होतीलच पण चेहऱ्यावरचं टॅनिंग जाऊन त्वचा छान उजळलेली दिसेल.

गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. त्यामुळे ही सुरुवात छान आनंदाने, प्रसन्नतेने करण्याचा सगळ्यांचाच प्रयत्न असतो. गुढीपाडव्याच्या दिवशी बहुतांश महिला गुढी उभारताना छान पारंपरिक वेशभुषा करून सुंदर तयार होतात. काठपदराची रेशमी साडी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकाेर आणि अंगाखांद्यावर मराठी दागिने असा छान साज असतो. पण त्याचवेळी जर चेहऱ्यावर पिंपल्स आलेले असतील किंवा मग चेहरा टॅनिंगमुळे खूप जास्त काळवंडून गेला असेल तर असा सगळा थाट करण्याची सगळी मजाच जाते. म्हणूनच तुमच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून वेळीच थोडी काळजी घ्या आणि लगेचच हा एक अतिशय सोपा घरगुती उपाय करून पाहा (home made face pack for removing tanning). हा उपाय केल्याने पिंपल्स तर कमी होतीलच पण चेहऱ्यावरचं टॅनिंग जाऊन त्वचा छान उजळलेली दिसेल.(best home remedies for removing pimples and tanning)

 

चेहऱ्यावरचे टॅनिंग आणि पिंपल्स कमी करण्याचा उपाय

चेहऱ्यावरचे टॅनिंग आणि पिंपल्स कमी करण्यासाठी काय उपाय करावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ ruchita.ghag या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

गुढीपाडवा स्पेशल: श्रीखंड आणखी चवदार होण्यासाठी त्यात ५ पदार्थ नक्की घाला, स्वाद जास्त खुलेल

उन्हाळ्यात त्वचा खूप जास्त टॅन होते. त्यामुळे अगदी आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा उपाय केला तरी हरकत नाही. कारण यामुळे त्वचेची चमक टिकून राहण्यास मदत होईल.

 

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा बेसन पीठ घाला. त्यामध्ये चिमूटभर हळद, १ चमचा मध आणि १ चमचा गुलाब पाणी घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावा.

गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीच्या जोडीला हवीच बटाट्याची खमंग भाजी! ५ टिप्स- भाजी होईल जास्त चवदार

१० ते १२ मिनिटे हा लेप चेहऱ्याला राहू द्या. त्यानंतर हलक्या हाताने चोळून तो काढून टाका आणि चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हा उपाय केल्यानंतर चेहऱ्याला मॉईश्चरायझर नक्की लावा. तुम्हाला चेहऱ्यामध्ये खूप छान फरक पडलेला दिसून येईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी