हिवाळ्याच्या दिवसांत त्वचा कोरडी पडते. त्यामुळे तळपायाच्या भेगासुद्धा खूप जास्त वाढलेल्या दिसतात. आता तर फेब्रुवारी महिनाही अर्ध्यावर आला आहे. वातावरणातली थंडी कमी झाली असली तरी हवेतला कोरडेपणा मात्र कायम आहे. यामुळे या दिवसांत हात- पाय फुटल्यासारखे होतात. अंग काेरडं पडतं. अशावेळी तळपायाच्या भेगाही खूपच जास्त वाढलेल्या असतात. पाय अगदीच रखरखीत होऊन जातात (how to make cracked heels soft?). तुमच्याही तळपायांचं असंच झालं असेल आणि कोणतेही क्रिम लावले तरी त्यांच्यावर विशेष परिणाम दिसून येत नसेल तर घरच्याघरी हा एक अगदी सोपा उपाय करून पाहा (best cream for cracked heels). अगदी २ ते ३ दिवसांतच तुम्हाला पायांवर खूप छान परिणाम दिसून येईल.(best home remedies for cracked heel)
तळपायच्या भेगा कमी करण्यासाठी घरगुती उपाय
तळपायाच्या भेगा कमी करण्यासाठी कोणता घरगुती उपाय करावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ aanchalnavneetjain या इन्स्टाग्राम चॅनलवर शेअर करण्यात आला आहे.
हात- पाय बारीक, पण सुटलेल्या पोटामुळे फिगर बिघडली? ५ व्यायाम- पोट होईल सपाट
यामध्ये काही घरगुती पदार्थ वापरून तळपायांच्या भेगा कमी करण्यासाठी घरच्याघरी कसं क्रिम तयार करावं, याविषयीची माहिती सांगितली आहे.
ते क्रिम तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये ४ ते ५ चमचे मोहरीचं तेल घ्या.
मोहरीच्या तेलामध्ये २ चमचे व्हॅसलिन आणि मेणबत्तीचा एक बोटाएवढा लांब तुकडा घाला. हे पातेले आता गॅसवर गरम करायला ठेवा.
जेव्हा तेलामध्ये घातलेलं व्हॅसलिन आणि मेणबत्ती वितळेल तेव्हा गॅस बंद करा. गरम झालेलं मिश्रण थोडं कोमट झालं की ते एका डबीमध्ये भरून ठेवा.
पायऱ्या चढणे- उतरणे की चालणे? हृदयासाठी दोन्हीपैकी काय जास्त चांगलं? वाचा तज्ज्ञांचं मत
दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर हे क्रिम तुमच्या तळपायांच्या भेगांवर लावा आणि त्यानंतर पायामध्ये सॉक्स घाला. रात्री झोपण्यापुर्वी पाय स्वच्छ धुवूनही तुम्ही हा उपाय करू शकता. काही दिवस नियमितपणे करून पाहा. तळपायांच्या भेगा आणि रखरखीतपणा नक्कीच कमी झाल्यासारखा जाणवेल.