चेहऱ्याची, त्वचेची पुरेशी काळजी घेण्यासाठी बऱ्याच जणींकडे पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे मग त्वचेचे वेगवेगळे त्रास सुरू होतात आणि मग आपण आपल्या त्वचेबाबत अधिक जागरुक होतो. असंच काहीसं ब्लॅकहेड्सचं आणि व्हाईट हेड्सचंही आहे. त्वचेवर असणाऱ्या छिद्रांमधून बाहेर येणारे सेबम जेव्हा हवेच्या संपर्कात येते तेव्हा रिॲक्शन होऊन ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्स तयार होतात. नाकावर, हनुवटीवर आणि ओठांच्या आजुबाजुला असणाऱ्या त्वचेवर ते थोडे जास्तच दिसतात. म्हणूनच ते काढून टाकण्यासाठी त्वचेची थोडी काळजी घ्या आणि काही घरगुती उपाय करून पाहा (best home hacks to remove black heads and white heads). यामुळे ही समस्या नक्कीच कमी होईल.(how to get rid of black heads and white heads?)
१. ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी उपाय
ब्लॅकहेड्स काढून टाकण्याचा आता एक सोपा उपाय आपण पाहणार आहोत. यासाठी आपल्याला आपल्या स्वयंपाक घरात असणारे दोन पदार्थ घ्यायचे आहेत. त्यापैकी पहिला पदार्थ आहे दालचिनीची पावडर आणि दुसरा पदार्थ आहे लिंबाचा रस.
राम नवमी २०२५: धणे पंजिरीचा नैवेद्य तर हवाच, ‘अशी’ करा पारंपरिक स्वादिष्ट पंजिरी!
हे दोन्ही पदार्थ एका वाटीमध्ये घेऊन व्यवस्थित एकजीव करा आणि त्यानंतर त्यांचा लेप ब्लॅकहेड्स आलेल्या ठिकाणी लावा. साधारण १ मिनिट झाल्यावर चेहरा धुवून टाका. हा उपाय करण्यापुर्वी जर तुम्ही थोडी वाफ घेतली तर आणखी चांगला परिणाम दिसून येईल. दालचिनी आणि लिंबाचा रस प्रत्येक त्वचेवर चालेल असे नाही. त्यामुळे हा उपाय करण्यापुर्वी पॅच टेस्ट जरूर करून पाहा.
२. व्हाईटहेड्स काढून टाकण्यासाठी...
हा उपाय करण्यासाठी आपल्याला बेकिंग सोडा वापरायचा आहे. स्वयंपाकातल्या वेगवेगळ्या पदार्थांसाठी, घरातल्या स्वच्छतेच्या कामासाठी जसा बेकिंग सोडा उपयुक्त ठरतो तसाच तो आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरतो.
डाळींना भुंगा लागतो, तांदुळात अळ्या होतात? ४ टिप्स- धान्य अजिबात खराब होणार नाही
त्याचा वापर कसा करायचा ते आता पाहूया.. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये बेकिंग सोडा घ्या आणि थोडंसं पाणी घालून तो कालवा. आता हा लेप तुमच्या नाकाला किंवा ब्लॅक आणि व्हाईट हेड्स आलेल्या ठिकाणी लावा. एक ते दिड मिनिटाने चेहरा धुवून टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करून पाहा..