Lokmat Sakhi >Beauty > मुलांचे केस खूप विरळ होते म्हणून अभिनेत्री डेबिना बॅनर्जीने केला ‘हा’ खास घरगुती उपाय

मुलांचे केस खूप विरळ होते म्हणून अभिनेत्री डेबिना बॅनर्जीने केला ‘हा’ खास घरगुती उपाय

Best Home Hacks For Thick Hair of Kids: लहान मुलांचे केस पातळ असतील तर त्यांची चांगली वाढ व्हावी यासाठी कोणता उपाय करावा याविषयी सांगत आहे अभिनेत्री डेबिना बॅनर्जी...(Debina Banerjee suggests home remedies for hair growth in kids)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2025 17:03 IST2025-08-30T15:44:18+5:302025-08-30T17:03:07+5:30

Best Home Hacks For Thick Hair of Kids: लहान मुलांचे केस पातळ असतील तर त्यांची चांगली वाढ व्हावी यासाठी कोणता उपाय करावा याविषयी सांगत आहे अभिनेत्री डेबिना बॅनर्जी...(Debina Banerjee suggests home remedies for hair growth in kids)

best home hacks for thick hair of kids, how to reduce hair fall in kids, debina Banerjee suggests home remedies for hair growth in kids  | मुलांचे केस खूप विरळ होते म्हणून अभिनेत्री डेबिना बॅनर्जीने केला ‘हा’ खास घरगुती उपाय

मुलांचे केस खूप विरळ होते म्हणून अभिनेत्री डेबिना बॅनर्जीने केला ‘हा’ खास घरगुती उपाय

Highlightsकाही दिवस हा उपाय नियमितपणे करून पाहा. केसांमध्ये चांगला फरक जाणवेल. 

काही लहान मुलांच्या केसांना अजिबातच वाढ नसते. शिवाय ते खूप पातळ असतात. काही जणांचे केस तर अगदी रेशमासारखे मऊ आणि नाजुक असतात. ते दिसायला छान दिसत असले तरी खूप लवकर तुटतात आणि मग विरळ होतात. अशावेळी मुलांच्या केसांची काळजी कशी घ्यावी हा प्रश्न आईला पडतोच (best home hacks for thick hair of kids).. लहान मुलांच्या केसांना रोज तेल लावणंही उपयोगाचं नाही. कारण मग ते नियमितपणे स्वच्छ झाले नाही तर केसांमधला कोंडा वाढत जातो. म्हणूनच अशावेळी मुलांच्या केसांची काळजी घेण्यासाठी नेमका कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो (how to reduce hair fall in kids?), याविषयीची माहिती अभिनेत्री डेबिना बॅनर्जी हिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.(Debina Banerjee suggests home remedies for hair growth in kids)

 

मुलांचे केस पातळ असतील तर कोणता घरगुती उपाय करावा?

डेबिना मागच्या काही दिवसांपासून तिच्या मुलींच्या पातळ केसांसाठी हाच उपाय करत आहे आणि त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येत आहे, असं ती सांगते. हा उपाय अतिशय सोपा आहे.

वजन लवकर कमी करायचं असेल तर व्यायाम कमी करा, वेटलॉस एक्सपर्टचा महिलांना खास सल्ला

तो करण्यासाठी साधारण एक ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये कडिपत्त्याची ८ ते १० पाने घाला. कडिपत्ता केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असतो हे आपल्याला माहितीच आहे.

आता त्यामध्ये रोजमेरीची पानंही घाला. तसेच मेथ्याही घाला. रोजमेरीची पानं तुमच्या शहरातल्या ब्यूटी शॉपमध्ये किंवा मग ऑनलाईन शॉपिंग साईटवरही मिळू शकतात. आता हे पाणी गॅसवर गरम करायला ठेवा आणि १० ते १५ मिनिटे चांगलं उकळवून घ्या. 

 

यानंतर गॅस बंद करा. पाणी थंड होऊ द्या आणि त्यानंतर ते गाळून एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. रोज रात्री झोपण्यापुर्वी हे पाणी मुलांच्या डोक्यावर केसांच्या मुळाशी शिंपडा.

गौरींच्या स्वागतासाठी दारात काढा सुरेख पाऊलं, ७ सुंदर रांगोळी डिझाईन्स, घराला येईल शोभा

त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. दुसऱ्या दिवशी केस धुण्याची गरज नाही. कारण आपण यासाठी कोणतंही तेल वापरत नाही. त्यामुळे केस तेलकट होत नाहीत. काही दिवस हा उपाय नियमितपणे करून पाहा. केसांमध्ये चांगला फरक जाणवेल. 


 

Web Title: best home hacks for thick hair of kids, how to reduce hair fall in kids, debina Banerjee suggests home remedies for hair growth in kids 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.