Lokmat Sakhi >Beauty > डार्क सर्कल्समुळे डोळे खोल गेलेले दिसतात? घ्या एका रात्रीत डार्क सर्कल्स कमी करणारा उपाय

डार्क सर्कल्समुळे डोळे खोल गेलेले दिसतात? घ्या एका रात्रीत डार्क सर्कल्स कमी करणारा उपाय

Best Home Hacks For Reducing Dark Circles: डोळ्यांभोवती वाढलेले डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर ठरू शकतो.(how to get rid of dark circles?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2025 15:17 IST2025-06-11T15:16:44+5:302025-06-11T15:17:29+5:30

Best Home Hacks For Reducing Dark Circles: डोळ्यांभोवती वाढलेले डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर ठरू शकतो.(how to get rid of dark circles?)

best home hacks for reducing dark circles, reasons and causes of dark circles, how to get rid of dark circles  | डार्क सर्कल्समुळे डोळे खोल गेलेले दिसतात? घ्या एका रात्रीत डार्क सर्कल्स कमी करणारा उपाय

डार्क सर्कल्समुळे डोळे खोल गेलेले दिसतात? घ्या एका रात्रीत डार्क सर्कल्स कमी करणारा उपाय

Highlightsहा लेप डोळ्यांच्या भोवती १० ते १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून घ्या. काळेपणा बराच कमी झालेला दिसेल.

बऱ्याच तरुण मुली, महिलांच्या डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स असतात. डोळ्यांच्या आजुबाजुला असणाऱ्या या काळ्या वर्तुळांमुळे आपण खूप अशक्त, आजारी असल्यासारखे दिसतो. शिवाय डोळेही खूप खोल गेल्यासारखे दिसतात. विशेषत: आयब्रोज केल्यानंतर तर डोळ्यांभोवतीचा काळेपणा खूप स्पष्ट जाणवतो. डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स येण्याची इतरही अनेक कारणे आहेत. ती कोणती ते आपण पुढे पाहूया (reasons and causes of dark circles). पण त्याआधी ते डार्क सर्कल्स घालविण्यासाठी त्याला कोणता घरगुती लेप लावता येऊ शकतो, याची माहिती घेऊया (best home hacks for reducing dark circles).. हा लेप तयार करणं अतिशय सोपं आहे आणि तो खूप जास्त फायदेशीर ठरणारा आहे.(how to get rid of dark circles?)

 

डोळ्यांभोवतीचे डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी उपाय

डोळ्यांभोवती असणारी काळी वर्तुळं कमी करण्यासाठी कोणता घरगुती उपाय करता येऊ शकताे, याविषयीची माहिती instituteofayurvediccosmetic या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

सतत चीज खाल्ल्यानं कोलन कॅन्सरचा धोका, ज्यात त्यात चीज घालण्यापूर्वी वाचा ते नेमकं खावं किती..

हा उपाय करण्यासाठी बटाटा किसून घ्या आणि तो काही मिनिटांसाठी पाण्यात राहू द्या. आता साधारण अर्ध्या तासात बटाट्यामधला जो स्टार्च असतो तो भांड्याच्या तळाशी साचतो. हा पांढरा स्टार्च अलगदपणे काढून घ्या आणि तो वाळवायला ठेवा. वाळल्यानंतर त्याची अगदी बारीक पावडर तयार होईल. ही पावडर डोळ्यांभोवतीचा काळेपणा कमी करण्यासाठी मदत करते. या पावडरमध्ये गुलाबजल घाला आणि हा लेप डोळ्यांच्या भोवती १० ते १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून घ्या. काळेपणा बराच कमी झालेला दिसेल.

रेणुका शहाणेने शेअर केला धक्कादायक अनुभव, म्हणाली मी आई झाले अन् दुसऱ्याच दिवशी मला.... 

बटाट्यामधल्या स्टार्चची पावडर करणं कठीण वाटत असेल त्या स्टार्चमध्ये लिंबाचे ३ ते ४ थेंब घाला आणि तो लेप डोळ्यांभोवती लावा. १० ते १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. बटाटा आणि लिंबू यांच्या एकत्र प्रभावामुळेही काळे डाग लवकर निघून जातील.

 

या गोष्टींमुळे डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणखी गडद होत जातात...

१. डिहायड्रेशन किंवा पाणी कमी प्रमाणात पिणे.

२. आहारात फळं आणि हिरव्या पालेभाज्या कमी प्रमाणात असणे.

३. ॲनिमिया किंवा एचबी खूप कमी असणे.

हात- पाय काळे पडले? घ्या मस्त उपाय- घरच्याघरी फुकटात मिळेल पेडिक्युअर- मेनिक्युअरसारखा इफेक्ट

४. स्क्रिन टाईम खूप जास्त असणे, शिवाय रात्री अंधारातही मोबाईल बघण्याची सवय

५. नेहमीच जागरण करण्याची सवय

वरील गोष्टी करणं टाळल्यानेही डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते. 

 

Web Title: best home hacks for reducing dark circles, reasons and causes of dark circles, how to get rid of dark circles 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.