आपल्यापैकी अनेकींना केसगळतीची समस्या खूपच सतावते. केस विंचरताना कंगव्यात अडकलेले केसांचे गुच्छ पाहून कित्येकदा आपली झोप उडते. केस रोज गळून आपल्याला टक्कल पडेल की काय अशीच भीती वाटते. कधी कधी असं वाटतं की आपण जेवढे केस डोक्यावर बघतोय, त्यापेक्षा जास्त तर घराच्या कोपऱ्यात आणि कंगव्यातच दिसतात... केस गळणं ही आजकाल केवळ समस्या राहिलेली नाही, तर ते एक मोठं टेन्शन बनलं आहे. केसगळती थांबवण्यासाठी अनेक उपाय आपण करतो, परंतु यातही घरगुती आणि नैसर्गिक उपाय केसांसाठी अधिक जास्त फायदेशीर ठरतात(fenugreek seeds cooked rice and coconut oil hair mask for hair fall relief).
घरच्याघरीच बनवलेले नॅचरल हेअर मास्क केसांसाठी अत्यंत (homemade hair mask for hair fall) उपयुक्त ठरु शकतात. घरच्याघरीच तयार केलेले हेअर मास्क केसांच्या मुळांना पोषण देण्यास, स्काल्प निरोगी ठेवण्यास आणि केस मजबूत करण्यास मदत करू शकतात. विशेष म्हणजे हे उपाय पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे केसांवर केमिकल्सचा वाईट परिणामही होत नाही. केसगळती थांबवण्यासाठीचे घरगुती उपाय केसांना फक्त गळण्यापासूनच वाचवत नाहीत, तर त्यांना आरशासारखी (best hair mask for hair fall relief) चकाकीही देतात. केसगळतीला कायमचा 'फुलस्टॉप' लावण्यासाठी हे खास घरगुती हेअर मास्क नक्की तयार कसा करायचा ते पाहूयात.
केसगळती थांबण्यासाठी घरगुती हेअर मास्क...
सततच्या केस गळतीमुळे हैराण झाला असाल आणि केस विंचरताना ते हातात येत असतील, तर मेथी दाणे, शिजलेला भात आणि खोबरेल तेलाचा हेअर मास्क केसांवर लावू शकता. केसांना मजबूत बनवण्यासाठी आणि केसगळती कमी करण्यासाठी हे घटक खूप मदत करतात. आपण हा मास्क घरी सहज तयार करू शकता. हा मास्क लावल्याने केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळते आणि स्काल्प स्वच्छ ठेवण्यास मदत होते.
घाम साचून काळे झालेत अंडरआर्म्स? ५ मिनिटांचे २ उपाय - त्वचा दिसेल उजळ...
सगळ्यात आधी मेथीचे दाणे ५ ते ६ तास पाण्यात भिजवून घ्यावेत. त्यानंतर हे भिजवलेले मेथी दाणे मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात शिजवलेला भात आणि खोबरेल तेल सर्व एकत्रित करून मिक्सरला लावून वाटून घ्यावे, त्याची पातळसर अशी पेस्ट तयार करून घ्यावी. नंतर आंघोळीच्या १ तास आधी हा मास्क केसांना व्यवस्थित लावा आणि नंतर केस धुवून टाका. केसांच्या मुळांपासून ते खालच्या टोकांपर्यंत हा मास्क केसांवर संपूर्ण लावून घ्यावा. हा हेअर मास्क आठवड्यातून १ किंवा २ वेळा केसांवर लावू शकता. हा मास्क केसांच्या मुळांना मजबूत करण्यासोबतच केस गळती पूर्णपणे कमी करतो. या मास्कचा वापर केल्यामुळे तुमच्या केसांना खोलवर पोषण मिळते आणि त्याचबरोबर डँड्रफचा धोकाही मोठ्या प्रमाणात कमी होतो. केस कमी वयातच पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरतो.
केसांसाठी हा उपाय कसा फायदेशीर...
१. मेथी दाणे :- मेथी दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि निकोटिनिक ॲसिड असते, जे केसांच्या मुळांना मजबूत करून केसगळती रोखण्यास मदत करतात. यामध्ये अँटी-फंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे स्काल्पवरील कोंडा आणि खाज कमी होण्यास मदत होते. मेथीमधील लेसिथिन केसांच्या क्युटिकलला कंडिशन करते आणि नवीन केसांच्या वाढीस चालना देते.
२. शिजवलेला भात :- शिजलेल्या भातात कार्बोहायड्रेट्स आणि अमिनो ॲसिड्स असतात, जे केसांवर एक नैसर्गिक संरक्षणात्मक थर तयार करतात आणि केसांना खोलवर कंडिशनिंग करतात. भातातील 'इनोसिटॉल' नावाचा घटक खराब झालेले केस दुरुस्त करण्यास आणि केसांची लवचिकता वाढवण्यास मदत करतो.
३. खोबरेल तेल :- खोबरेल तेल केसांच्या आतपर्यंत जाऊन आर्द्रता टिकवून ठेवते, ज्यामुळे केस कोरडे पडत नाहीत. यातील फॅटी ॲसिड्स केसांच्या मुळांना आवश्यक पोषण देतात, ज्यामुळे केसांचे तुटणे कमी होते. खोबरेल तेल स्काल्पचे आरोग्य सुधारते आणि केसांना अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यास मदत करते.
Web Summary : Struggling with hair fall? A homemade mask of fenugreek seeds, cooked rice, and coconut oil can strengthen hair roots, nourish the scalp, and reduce hair fall naturally. Use 1-2 times a week for best results.
Web Summary : बाल झड़ने से परेशान हैं? मेथी दाना, पका चावल और नारियल तेल का घरेलू मास्क बालों की जड़ों को मजबूत कर, स्कैल्प को पोषण दे और प्राकृतिक रूप से बालों का झड़ना कम कर सकता है। सर्वोत्तम परिणामों के लिए सप्ताह में 1-2 बार प्रयोग करें।