Join us

१ चमचाभर मेथ्या आणि चमचाभरच तांदुळाचं सिक्रेट सिरम; केस वाढतील भरभर, गळणंही होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 12:45 IST

Hair Growth Serum : हे सिरम बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा.  त्यात एक चमचा तांदूळ, एक चमचा मेथीच्या बीया घालून उकळवा आणि  उकळ्यानंतर हे पाणी गाळून घ्या

ठळक मुद्देहे दोन पदार्थ वापरून तुम्ही केसांसाठी भरपूर फायदे मिळवू शकता. यासाठी जास्त खर्चही करावा लागणार नाही आणि केस  सुंदर चमकदार दिसतील.  

स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ असतात ज्यांचा वापर करून तुम्ही केस, त्वचेची काळजी घेऊ शकता.  मेथीचे आरोग्याच्या दृष्टीनं अनेक फायदे आहेत. थंडीच्या दिवसात प्रत्येकाच्याच घरी मेथी असतेच तांदूळही प्रत्येकाच्याच घरात असतो. (How to Grow hairs naturally)

हे दोन पदार्थ वापरून तुम्ही केसांसाठी भरपूर फायदे मिळवू शकता. यासाठी जास्त खर्चही करावा लागणार नाही आणि केस  सुंदर चमकदार दिसतील.  जर तुमचे केस खूपच गळत असतील तर केसांवर हा  घरगुती उपाय करून समस्या काही प्रमाणात टाळता येऊ शकते. ( Homemade  Hair Growth Serum using  rice and fenugreek for hair growth)

केसांच्या वाढीसाठी घरगुती सिरम कसे बनवायचे? (Hair Growth Serum)

फ्लेक्ससीड्स - 1 टीस्पून

मेथी दाणे - 1 टीस्पून

तांदूळ - 1 टीस्पून

काळ्या बियांचे तेल (कलौंजी)  - 1 टीस्पून

हे सिरम बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा.  त्यात एक चमचा तांदूळ, एक चमचा मेथीच्या बीया घालून उकळवा आणि  उकळ्यानंतर हे पाणी गाळून घ्या. त्यात ब्लॅक सीड ऑईल घाला. हे मिश्रण एकत्र केल्यानंतर केसांना लावून मसाज करा.

पांढरे केस वाढले, डायची भीती वाटते? घरी बनवलेला हा शॅम्पू वापरा, काळेभोर होतील केस

अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवा. सध्या केस गळण्याची समस्या खूपच कॉमन झाली आहे. धूळ, प्रदूषण यामुळे केस कोरडे होतात. व्यवस्थित निगा न राखल्यास केसाचं गळणं सुरु होतं.  या समस्येवर उपाय म्हणून तुम्ही हे सिरम वापरू शकता. जेणेकरून केस सुंदर, दाट दिसतील. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी