Join us
Daily Top 2Weekly Top 5

नको महागडे सिरम, नको फेशवॉश! आहारात लपलंय सौंदर्याचं गुपित, रोज खा 'हे' पदार्थ, चेहरा उजळेल ८ दिवसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2026 18:00 IST

Glowing skin naturally: Skin whitening home remedies: Foods for glowing skin: जाणून घेऊया आपल्या ताटात लपलेले सौंदर्याचे गुपित आणि अशा काही गोष्टी ज्यांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास आपला चेहरा चंद्रासारखा उजळेल.

आपणही सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. आपला चेहरा ग्लो करावा यासाठी आपण वीन प्रकारचे सीरम, महागडे फेस वॉश किंवा 'मॅजिकल' नाईट क्रीम विकण्याचा प्रयत्न करत असतो. आपणही हजारो रुपये खर्च करून या बाटल्या आपल्या ड्रेसिंग टेबलवर सजवतो.(Glowing skin naturally) पण याचा आपल्या त्वचेवर हवा तसा परिणाम पाहायला मिळत नाही.(Skin whitening home remedies) चेहऱ्याला बाहेरुन किती महागड्या गोष्टी लावल्या तरी जोपर्यंत शरीराला आतून योग्य पोषण मिळत नाही तोपर्यंत नैसर्गिक चमक मिळण अशक्य आहे. आपण जे काही खातो त्याचा चांगला-वाईट परिणाम आपल्या त्वचेवर होतो.( Foods for glowing skin) महागड्या क्रीम्स या फक्त त्वचेला वरच्यावर पोषण देतात पण ताटातील पौष्टिक पदार्थ आपल्या शरीरातील पेशींना पुन्हा नव्याने पुनरुज्जीवित करण्याचे काम करते. जाणून घेऊया आपल्या ताटात लपलेले  सौंदर्याचे गुपित आणि अशा काही गोष्टी ज्यांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास आपला चेहरा चंद्रासारखा उजळेल.

मी अब्सेंट बाप होतो, मुले मोठी झाली पण मी.. ! राम कपूरने सांगितली खंत, बापाची अस्वस्थ गोष्ट

1. कोलेजन वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी अत्यंत आवश्यक असते. कोलेजन आपल्या त्वचेची लवचिकता टिकवून ठेवते आणि सुरकुत्या कमी करते. रोजच्या आहारात लिंबू किंवा लिंबूवर्गीय फळे खा. यात संत्री, मोसंबी, पपईसारखी फळे खाल्ल्याने त्वचेवरील डाग कमी होतात. 

2. नट्स आणि सीड्समध्ये ओमेगा- ३ फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात असतात. हे त्वचेला नैसर्गिक ओलावा देण्याचे काम करतात. कोरड्या त्वचेची समस्या असलेल्या लोकांसाठी अक्रोड आणि जवस हे देखील चांगले आहे. 

3. गाजर, बीट आणि पपई यांमध्ये बीटा-कॅरोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. गाजर खाल्ल्याने त्वचेला एक नैसर्गिक ग्लो येतो, तर बीट रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे चेहऱ्यावर लाली येते. पपईमधील 'पपेन' एन्झाईम मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते.

4. आपले पोट साफ असेल तर त्वचा सुंदर दिसते. दही खाल्ल्याने पचन सुधारते. दह्यातील लॅक्टिक अॅसिड त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्याचे आणि मुरुमांच्या समस्यांपासून मुक्ती देण्याचे काम करते. 

5. दिवसभरात कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी प्या. पाणी शरीरातील घाण बाहेर काढते. तसेच ग्रीन टी शरीरातील अँटी- ऑक्सिडंट्स वाढवते, ज्यामुळे त्वचा तरुण दिसते. अति साखर, जास्त मीठ, तेलकट पदार्थ आणि पॅकेज्ड फूड खाणे टाळा. साखरेमुळे त्वचेवर अकाली वृद्धत्व येते, तर तेलकट पदार्थांमुळे पिंपल्स येतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Unlock radiant skin in 8 days with these foods!

Web Summary : Skip expensive serums! Diet is key to glowing skin. Eat vitamin C-rich foods, nuts, seeds, carrots, beetroot, papaya, and yogurt. Hydrate well and avoid junk food for a naturally radiant complexion in days.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीअन्न