प्रत्येक मुलीचे स्वप्न असतं की लग्नाच्या दिवशी आपण सगळ्यात सुंदर दिसावं. यासाठी अनेक मुली महिनाभराआधीच पार्लरच्या चकरा मारु लागतात, महागड्या फेशियलवर हजारो रुपये खर्च करतात.(bridal skin glow) लग्नात सुंदर लूक, आकर्षक पोशाख आणि मेकअपसोबतच सर्वात जास्त लक्ष वेधून घेते ती नवरीची त्वचा.(bridal diet before wedding) लग्नाआधी पार्लर, फेशियल, स्किन ट्रीटमेंट्सवर भरपूर खर्च केला जातो; पण खऱ्या अर्थाने त्वचेला आतून चमक येते ती योग्य आहारामुळे.(glowing skin before marriage)
आपलेही लवकरच लग्न होणार असणार असेल तर डाएटमध्ये काही खास गोष्टींचा समावेश करायला हवा. ज्यामुळे आपली त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागेल. त्वचा चमकवण्यासाठी महागडे स्किन केअर रुटीन, सप्लिमेंट्सची गरज नाही, तर घरगुती आणि सहज केल्या जाणाऱ्या उपायांवर आपण भर द्यायला हवा. कोणत्या ५ गोष्टीं डाएटमध्ये असायला हव्या, जाणून घेऊया.
तिळाचे लाडू कडक होतात? गुळाचा पाक न चुकता मऊ- लुसलुशीत लाडू करण्याची सोपी ट्रिक, १५ मिनिटांत होतील
1. नैसर्गिकरित्या चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण प्रोटीनयुक्त सॅलेड खायला हवं. यासाठी आहारात काकडी, टोमॅटो, गाजर, चणे, चीज, पनीर आणि कडधान्य खाऊ शकता. सॅलेड हे आपल्या शरीराला आतून पोषण देते. यामुळे आपल्या त्वचेच्या पेशी आतून दुरुस्त होतात. त्वचा निरोगी होण्यास मदत होईल.
2. दही हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. दह्यातील प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य सुधारते. ज्याचा त्वचेच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. यामुळे मुरुमे कमी करण्यास त्वचेचा पोत सुधारण्यास आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करु शकते.
3. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सि़डंट्स असतात. जे त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवण्याचे काम करतात. रोज ग्रीन टी प्यायल्याने वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास आणि त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.
4. चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी आपण स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरी सारखी फळे खाऊ शकतो. त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे आपल्या शरीरातील कोलेजन उत्पादन वाढविण्यास मदत करते. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते.
5. आपण बदाम, अक्रोड, चिया सीड्स आणि अळशीच्या बिया खाऊ शकतो.यामध्ये चांगले फॅट्स असते जे आपल्या त्वचेला आतून मॉइश्चराइझ करते. रोज खाल्ल्याने कोरड्या त्वचेपासून मुक्तता मिळते. यामुळे आपल्या चेहऱ्यावर पार्लसारखा ग्लो येईल.
