बदलती जीवनशैली, जंकफूड आणि प्रदूषणामुळे आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम होतो.(Skin care tips) त्वचेची नीट काळजी घेतली नाही तर चेहऱ्यावर पिंपल्स, फोडांचे डाग , काळे ठिपके राहतात. ज्यामुळे आपला चेहरा विद्रूप दिसू लागतो.(ayurvedic drink for glowing skin) आपण कितीही मेकअप केला तरी चेहरा काही उजळत नाही. चुकीचा आहार, कमी पाणी पिणं, हार्मोन्स बदलणं, ताण-तणाव यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात.(ayurvedic remedy for pimples) अनेकदा पिंपल्स गेल्यानंतर त्याचे डाग चेहऱ्यावर कायन टिकून राहतात. हे डाग दूर करण्यासाठी आपण महागडे पार्लर ट्रिटमेंट्स, क्रीम्स किंवा फेस मास्क निवडतो. पण याचा परिणाम आपल्याला तात्पुरता मिळतो.(how to remove acne scars naturally) पण आपण दैनंदिन जीवनात काही छोटे बदल केल्यास त्वचेची नीट काळजी घेता येईल. तसेच पिंपल्स आणि फोडांचे डाग देखील कमी होऊन त्वचा उजळण्यास मदत होईल. (natural skin glow remedies)
गरबा खेळताना घामाच्या धारा-मेकअप जातो वाहून? ५ टिप्स- रात्रभर मेकअप राहील जसाच्या तसा-नो टेंशन
आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी जितकी बाहेरुन आवश्यकता आहे तितकीच आतून स्वच्छ होणे देखील गरजेचे आहे. यासाठी आपल्याला महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्सची नाही तर स्वयंपाकघरात आढळणाऱ्या मसाल्यांचा उपयोग करावा लागेल. मसाल्यांपासून खास आयुर्वेदिक ड्रिंक तयार करुन रोज रात्री झोपण्यापूर्वी प्यावं. यामुळे मुरुमे, पिंपल्सची समस्या टाळता येईल. जळजळ कमी करता येईल तसेच त्वचा आतून दुरुस्त होण्यास मदत होईल.
हे आयुर्वेदिक ड्रिंक बनवण्यासाठी आपल्याला १ चमचा बडीशेप, १ चमचा जीरे, १ चमचा ओवा, १ ग्लास पाणी, काळे मीठ लागेल. हे पाणी तयार करण्यासाठी आपल्याला सर्व साहित्य एकत्र करुन पाण्यात मंद आचेवर ५ ते १० मिनिटे उकळवून घ्या. यानंतर पाणी गाळून त्यात काळे मीठ घाला आणि रात्री प्या. हे पेय रोज प्यायल्याने मुरुमे कमी होतील. शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल. चेहऱ्यावरची सूज कमी होऊन नैसर्गिक चमक वाढेल. तसेच आपले पचन देखील सुधारेल.
बडीशेप आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते. ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते. तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होतात. जिऱ्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे त्वचेचे संक्रमण आणि मुरुमे कमी करण्यास मदत करतात. हे पाणी आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्याने महिन्याभरात आपल्याला फरक दिसेल.