Join us  

१ चमचा बेसन आणि ४ गोष्टी, चेहऱ्यावरचे बारीक केस-डलनेस सगळं गायब झटपट-पाहा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2024 10:10 AM

Besan Face Packs: A Foolproof Remedy for a Skin : टॅनिंग रिमुव्हल क्रीमचा वापर आपण अनेक गोष्टींसाठी करू शकता, याने स्किन ग्लो करते

पार्लरसारखा ग्लो कोणाला नाही आवडत (Skin Care Tips). सध्या हवेत गरमी आणि उन्हाच्या झळा बसू लागले आहेत. उन्हाळ्यात मुख्य समस्या स्किनच्या निगडीत वाढतात. शिवाय हायड्रेशनची समस्याही वाढत जाते. स्किन टॅन होते, ज्यामुळे आपल्याला बऱ्याचदा चारचौघात लाजिरवाणेही वाटते. हात, पाय, गुडघे आणि पायांवरही काळे डाग पडतात. शिवाय हे डाग मेनीक्युअर आणि पेडीक्युअर केल्याशिवाय जात नाही.

जर आपल्याला पार्लरमध्ये जाऊन खर्च न करता, घरातच काळपट डाग आणि टॅनिंग काढायचं असेल तर, एकदा या टॅनिंग रिमुव्हल क्रीमचा (Tanning Removal Cream) वापर करून पाहा. या घरगुती साहित्यांनी तयार केलेल्या क्रीममुळे डेड स्किन, टॅनिंग आणि काळपट डाग निघतात. शिवाय स्किन ग्लो करते, आणि लहान केस देखील निघतात(Besan Face Packs: A Foolproof Remedy for a Skin).

टॅनिंग रिमुव्हल क्रीम तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

बेसन

हळद

मध

उडीद डाळच कशाला? कपभर रव्याचे करा क्रिस्पी मेदू वडे; आतून सॉफ्ट-बाहेरून कुरकुरीत; करा १५ मिनिटात

दही

टूथपेस्ट

शाम्पू (चेहऱ्यावर लावताना शाम्पू वगळला)

इनो

अशा पद्धतीने तयार करा टॅनिंग रिमुव्हल क्रीम

टॅनिंग दूर करण्यासाठी आपण घरगुती क्रीम तयार करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा बेसन घ्या. त्यात अर्धा चमचा हळद, मध, ३ चमचे दही, एक चमचा टूथपेस्ट, अर्धा चमचा शाम्पू (जर आपण ही पेस्ट चेहऱ्यावर लावत असाल तर, त्यात शाम्पू मिक्स करू नका) आणि अर्धा चमचा इनो घालून चमच्याने छान मिसळा. अशा प्रकारे टॅनिंग रिमुव्हल क्रीम तयार.

अशा पद्धतीने करा टॅनिंग रिमुव्हल क्रीमचा वापर

घरीच पार्लरसारखं पेडीक्युअर करता येते? टोमॅटो-लिंबाचा सोपा उपाय; टॅनिंग निघेल-पाय चमकतील..

जर आपल्याला चेहऱ्यावरचे लहान केस, टॅनिंग आणि काळपट डाग घालवायचे असतील तर, आपण या टॅनिंग रिमुव्हल क्रीमचा वापर करू शकता. यासाठी स्किन आधी धुवून घ्या. नंतर पेस्ट ब्रश किंवा बोटाने लावा. साधारण १० मिनिटानंतर पेस्ट पाण्याने धुवून काढा. आपण या पेस्टचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. याने स्किनच्या निगडीत अनेक समस्या सुटतील.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी