Join us

डाळिंबाची सालं ठेवतील तरुण! पिंपल्स, सुरकुत्या, डागांची समस्या होईल दूर- चेहऱ्यावर चकाकता ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2025 12:44 IST

pomegranate face mask: Skin care tips: Remove dark spots naturally: अनेकदा आपण डाळिंब सोलल्यानंतर त्याची सालं फेकून देतो. पण ही सालं आपल्याला त्वचेसाठी फायदेशीर ठरु शकते.

जंक फूड, वाढते प्रदूषण, अपुरी झोप, मानसिक ताण आणि सतत वापरल्या जाणऱ्या केमिकल पदार्थांचा आपल्या शरीरासह त्वचेवर परिणाम होतो.(Skin care tips) आपणही सगळ्यांमध्ये सुंदर आणि उठून दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. सुंदर दिसणाऱ्यासाठी महागड्या पार्लर आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या केमिकल्स उत्पादनाचा चेहऱ्यावर विपरीत परिणाम होतो. पण अनेकदा घरगुती उपाय केल्यानं आपल्याला फायदा होऊ शकतो.(Natural glow with pomegranate)

फळं आपल्या शरीरासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर असतात. अनेकदा आपण डाळिंब सोलल्यानंतर त्याची सालं फेकून देतो.(Pomegranate peel for pimples) पण ही सालं आपल्याला त्वचेसाठी फायदेशीर ठरु शकते. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असते जे आपल्या त्वचेच्या अनेक समस्यांवर उपचार करु शकते. (Anti-aging home remedies)

Monsoon Skin Care : ५ सवयींमुळे चेहरा वयापेक्षा जास्त वेगानं होतो म्हातारा! पाहा तरुण होण्याचा मंत्र

डॉक्टर सांगतात डाळिंबाची साले उन्हात नीट वाळवून घ्या. त्याची पावडर करुन गुलाबजल घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून काही वेळाने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे आपल्या चेहऱ्याला अनेक फायदे होतील. धुळ आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर मुरुमे आणि फोड यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. हे टाळण्यासाठी डाळिंबाच्या सालीचा वापर आपण करु शकतो. या सालींमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्यामुळे मुरुम आणि पिंपल्सच्या समस्या कमी होतात.

जर आपली त्वचा कमी वयात निस्तेज होत असेल तर त्यावर डाळिंबाची सालं फायदेशीर ठरेल. डाळिंबाच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे त्वचा घट्ट ठेवण्यास आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. डाळिंबाच्या साली त्वचेचा रंग किंवा टोन सुधारतात. तसेच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणतात. इतकेच नाही तर यामुळे टॅनिंग देखील दूर होते. आपल्या त्वचेवर काळे डाग किंवा पिग्मेंटेशनची समस्या असेल तर नियमितपणे याचा वापर केल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होतील.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी