Join us

आरोग्यासाठी वरदान आहे कडुनिंबाची पानं! 'असा' करा उपयोग, पुटकुळ्या-फोड्या- कोंडा होईल दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2025 16:17 IST

skin care with neem leaves: dandruff solution using neem: neem uses for clear skin: आयुर्वेदानुसार कडुनिंबाची पाने आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहेत.

आपणही सुंदर-देखणं दिसावं असं प्रत्येकाला वाटतं परंतु, बदलेल्या जीवनशैलीनुसार त्वचा आणि केसांच्या समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.(skin care with neem leaves) त्वचा-केसांसाठी आपण महागडे उत्पादने वापरतो. परंतु, यामध्ये असणारे रसायन केसांसह त्वचेचे देखील नुकसान करतात.(dandruff solution using neem) यांचा अतिप्रमाणात वापर केल्याने त्वचा कोरडी पडते, मुरुमे, फोड येतात. तसेच केसात कोंडा होतो, केसगळती वाढते.(neem uses for clear skin) केसांच्या आणि त्वचेच्या समस्या टाळायच्या असतील आणि     त्वचेची- केसांची काळजी घ्यायची असेल तर महागड्या उत्पादनांवर पैसे खर्च करणं टाळा.(herbal treatment for acne and scalp issues) कोणतेही केमिकल्स न वापरता चेहऱ्याची आणि केसांची काळजी घ्यायची असेल तर आयुर्वेदिक उपाय करुन पाहू शकता. यासाठी आपल्याला कडुनिंबाची पाने उपयोगात आणायला हवी.(how to use neem for pimples) आयुर्वेदानुसार कडुनिंबाची पाने आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. 

चेहऱ्यावर अचानक मुरुमं-पुटकुळ्या वाढल्या? पावसाळ्यातला हा त्रास कमी करण्यासाठी 'अशी' घ्या काळजी

कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. जे आपल्या त्वचेसह केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. संसर्गांपासून नाही तर त्वचा चमकदार आणि केस मजबूत करण्यास देखील मदत करतात. याचा वापर कसा करायचा पाहूया. 

एक ग्लास पाण्यात कडुनिंबाची पाने उकळवून     गाळून स्प्रेच्या बाटलीत भरा. हा स्प्रे फवारल्याने पिंपल्स आणि मुरुमे यांच्या समस्या टाळता येतील.  कडुलिंबाच्या पाने पाण्यामध्ये घालून त्याची वाफ घेतल्याने त्वचेची छिद्रे स्वच्छ होण्यास मदत होते.तसेच कडुनिंब आपली त्वचा नितळ ठेवण्यास मदत करते. कडुनिंबाची पाने सुकवून त्याची बारीक पावडर तयार करा. यामध्ये मुलतानी माती आणि गुलाबजल घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होईल. तसेच मुरुमांची समस्या कमी होईल. 

आंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने मिसळून आंघोळ केल्यानंतर शरीरावर मुरुमे किंवा संसर्गाची समस्या होणार नाही. याशिवाय केसांना हे पाणी लावल्याने कोंड्याची समस्या कमी होईल. बर्फ साठवताना त्यात कडुनिंबाची पाने घालून गोठवा. हा बर्फ त्वचेवर चोळल्याने त्वचा घट्ट होऊ शकते. तसेच केसांच्या आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजी