Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > फक्त खोबरेल तेलच नाही तर नारळाच्या शेंडया पण केसांसाठी वरदान! पाहा कसा करायचा उपयोग...

फक्त खोबरेल तेलच नाही तर नारळाच्या शेंडया पण केसांसाठी वरदान! पाहा कसा करायचा उपयोग...

benefits of coconut husk for hair : coconut husk hair benefits : how to use coconut husk for hair : coconut husk remedy for hair fall : केसांसाठी नारळाच्या शेंड्यांचा नेमका वापर कसा करायचा ते पाहूयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2026 11:30 IST2026-01-17T11:30:00+5:302026-01-17T11:30:03+5:30

benefits of coconut husk for hair : coconut husk hair benefits : how to use coconut husk for hair : coconut husk remedy for hair fall : केसांसाठी नारळाच्या शेंड्यांचा नेमका वापर कसा करायचा ते पाहूयात...

benefits of coconut husk for hair coconut husk hair benefits how to use coconut husk for hair coconut husk remedy for hair fall | फक्त खोबरेल तेलच नाही तर नारळाच्या शेंडया पण केसांसाठी वरदान! पाहा कसा करायचा उपयोग...

फक्त खोबरेल तेलच नाही तर नारळाच्या शेंडया पण केसांसाठी वरदान! पाहा कसा करायचा उपयोग...

केसांचे आरोग्य व सौंदर्य जपण्यासाठी आपल्यापैकी बहुतांशजणी खोबरेल तेलाचाच वापर करतात. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी आपण वर्षानुवर्षे खोबरेल तेलावर विश्वास ठेवत आलो आहोत. हे तेल फॅटी ॲसिड, प्रोटीन आणि व्हिटॅमिन ई सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने केसांना मजबुती आणि चमक देते. खोबरेल तेलातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म केसांच्या अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत करतात. केसांची काळजी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर सर्वात आधी येतं ते खोबरेल तेल, मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे की खोबरेल तेलाप्रमाणेच नारळाच्या वरील आवरण म्हणजेच शेंड्या देखील तितक्याच फायदेशीर आणि केसांसाठी जणू वरदानच मानल्या जातात.(benefits of coconut husk for hair).

बहुतेकदा आपण नारळाच्या शेंड्या कचरा समजून फेकून देतो परंतु त्या प्रत्यक्षात केसांसाठी एका नैसर्गिक औषधाप्रमाणेच काम करतात. आयुर्वेद आणि निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. किरण गुप्ता यांच्या मते, नारळाच्या शेंड्यांमध्ये असे नैसर्गिक गुणधर्म असतात जे केसांच्या अनेक गंभीर समस्या दूर करू शकतात. पारंपरिक आयुर्वेदात (coconut husk hair benefits) आणि जुन्या घरगुती उपायांमध्ये नारळाच्या शेंड्यांचा वापर केवळ आरोग्यासाठीच नाही तर केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी देखील केला जातो. केसगळती, कोरडेपणा, कोंडा, केसांची वाढ खुंटणे अशा त्रासांवर नारळाच्या शेंड्या नैसर्गिक आणि गुणकारी उपाय ठरू शकतात. केसांसाठी नारळाच्या शेंड्या योग्य पद्धतीने वापरल्यास हा पारंपरिक, घरगुती उपाय केसांना नैसर्गिक मजबुती आणि ( how to use coconut husk for hair) चमक देण्यास मदत करतो. नारळाच्या शेंड्यांचा वापर करून आपण केसांना मुळापासून पोषणही देऊ शकतो. केसांसाठी नारळाच्या शेंड्यांचा नेमका वापर कसा करायचा ते पाहूयात... 

केसांसाठी नारळाच्या शेंड्यांचा नेमका वापर कसा करायचा? 

१. नारळाच्या शेंड्यांचे हेअर वॉटर :- नारळाच्या शेंड्यांचे हेअर वॉटर  तयार करण्यासाठी, नारळाच्या वाळलेल्या शेंड्यांचे छोटे तुकडे करून घ्या आणि ते २ ते ३ ग्लासभर पाण्यात टाकून चांगले उकळवून घ्या. पाणी थंड झाल्यावर ते गाळून घ्या. केस धुवून झाल्यानंतर या पाण्याने सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा केस स्वच्छ धुवून घ्यावेत. आठवड्यातून दोनदा याचा वापर केल्यास स्काल्प थंड राहण्यास आणि कोंडा कमी करण्यास मदत होऊ शकते.

२. नारळाच्या शेंड्या आणि खोबरेल तेलाचे मिश्रण :- नारळाच्या शेंड्या जाळून त्याची राख तयार करा आणि ही राख खोबरेल तेलात मिसळून मंद आचेवर गरम करून घ्या. तेल थंड झाल्यावर ते गाळून घ्या. यानंतर या तेलाने स्काल्पला मसाज करा आणि १ ते २ तासांनंतर शाम्पूने केस स्वच्छ धुवा. असे केल्याने केस दाट आणि मजबूत होण्यास मदत होऊ शकते.

३. नारळाच्या शेंड्यांचा हेअर पॅक :- वाळलेल्या नारळाच्या शेंड्या दळून त्याची बारीक पावडर तयार करा. आता यामध्ये दही किंवा कोरफडीचा गर मिसळून पेस्ट तयार करा. तयार झालेली पेस्ट स्काल्पवर आणि केसांना लावा. मग ३० मिनिटांनंतर सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवा. हा हेअरपॅक लावल्याने स्काल्पची खोलवर स्वच्छता होते. 

स्पेशल मॅजिक ट्रिक! केसांच्या समस्यांनुसार आवळ्याच्या रसात मिसळून ७ पदार्थ लावा, रुक्ष निस्तेज केस चमकू लागतील...

त्वचेवर येईल काचेसारखा लखलखता ग्लो फक्त ५ रुपयांत! पार्लरचे हजारो रुपये वाचतील - त्वचा दिसेल ग्लोईंग...

केसांसाठी नारळाच्या शेंड्या वापरण्याचे फायदे अनेक...

१. कोंडा आणि खाजेपासून सुटका :- नारळाच्या शेंड्यांमध्ये अँटी - फंगल गुणधर्म असतात, जे स्काल्पवर जमा झालेला कोंडा आणि फंगल इन्फेक्शन कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे, आठवड्यातून किमान दोन वेळा केसांसाठी नारळाच्या शेंड्यांचा वापर केल्यास स्काल्प स्वच्छ आणि निरोगी ठेवता येते. 

२. केसांची वाढ होण्यासाठी :- केसांसाठी नारळाच्या शेंड्यांचा वापर केल्याने स्काल्पचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळते. या शेंड्यांचा वापर केल्याने 'हेअर फॉलिकल्स' अ‍ॅक्टिव्ह होण्यास मदत होते.

लेकीच्या लग्नात आईची हौस, नवरीच्या आईसाठी ५ रंगाच्या साड्या! लग्नसोहळ्यात मिळेल रॉयल लूक...

३. केस मजबूत करण्यासाठी :- केसांसाठी नारळाच्या शेंड्यांचा वापर केल्याने केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळते. यामुळे केस तुटण्याची समस्या कमी होते, केसगळतीवर नियंत्रण राहते आणि केस मुळापासून मजबूत होतात. 

४. स्काल्प डिटॉक्स करण्यासाठी :- प्रदूषण, रासायनिक हेअर प्रॉडक्ट्स आणि घाणीमुळे स्काल्पवर विषारी घटक जमा होतात. अशा परिस्थितीत, नारळाच्या शेंड्यांचा वापर स्कॅल्पला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यास मदत करतो.

केसांच्या आरोग्यासाठी आपण अनेकदा महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करतो, पण निसर्गाने आपल्याला अशा काही गोष्टी दिल्या आहेत ज्या आपण कचरा समजून फेकून देतो. नारळाच्या शेंड्या त्यापैकीच एक आहेत, नारळाच्या सालीमध्ये नैसर्गिक गुणधर्म असतात, जे केसांच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात.

Web Title : नारियल का छिलका: सुंदर, स्वस्थ बालों के लिए एक गुप्त हथियार।

Web Summary : नारियल तेल से परे, छिलका लाभ प्रदान करता है। यह रूसी से लड़ता है, विकास को बढ़ावा देता है, बालों को मजबूत करता है और खोपड़ी को डिटॉक्स करता है। प्राकृतिक बालों की देखभाल के लिए हेयर वाटर, तेल मिश्रण या हेयर पैक के रूप में उपयोग करें।

Web Title : Coconut Husk: A Secret Weapon for Beautiful, Healthy Hair.

Web Summary : Beyond coconut oil, the husk offers benefits. It combats dandruff, boosts growth, strengthens hair, and detoxifies the scalp. Use as hair water, oil infusion, or hair pack for natural hair care.