Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग होतील कमी, खोबऱ्याच्या तेलात 'अशी' मिसळा तुरटी; ७ दिवसांत दिसेल फरक

चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग होतील कमी, खोबऱ्याच्या तेलात 'अशी' मिसळा तुरटी; ७ दिवसांत दिसेल फरक

Stop wrinkles naturally: Get clear and glowing skin: anti-aging face oil: त्वचेवर सुरकुत्या पडणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे किंवा पिंपल्समुळे त्वचेवर काळे डाग पडण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2026 18:00 IST2026-03-29T18:00:00+5:302026-03-29T18:00:03+5:30

Stop wrinkles naturally: Get clear and glowing skin: anti-aging face oil: त्वचेवर सुरकुत्या पडणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे किंवा पिंपल्समुळे त्वचेवर काळे डाग पडण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Benefits of applying alum and coconut oil Homemade serum for glowing skin How to get rid of fine lines in 7 days Natural face lift tips Alum for skin whitening and tightening | चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग होतील कमी, खोबऱ्याच्या तेलात 'अशी' मिसळा तुरटी; ७ दिवसांत दिसेल फरक

चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग होतील कमी, खोबऱ्याच्या तेलात 'अशी' मिसळा तुरटी; ७ दिवसांत दिसेल फरक

वाढत्या वयानुसार त्वचेवर सुरकुत्या पडणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे किंवा पिंपल्समुळे त्वचेवर काळे डाग पडण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रदूषण, उन्हाचा तडाखा आणि रासायनिक सौंदर्यप्रसाधनांचा अतिवापर यामुळे आपल्या त्वचेवर कमी वयातच सुरकुत्या येऊ लागतात. (Stop wrinkles naturally) अनेकदा आपण या समस्यांवर मात करण्यासाठी महागड्या अँटी- एजिंग क्रीम्सचा वापर करतो. पण काही घरगुती उपाय केल्यास आठवड्याभरात फरक जाणवेल. हा उपाय म्हणजे खोबऱ्याच्या तेलात तुरटी मिसळणे. (Get clear and glowing skin)
खोबरेल तेल हे त्वचेला खोलवर ओलावा देण्यासाठी ओळखले जाते, तर तुरटीमध्ये नैसर्गिकरीत्या त्वचा घट्ट करण्याचे आणि बॅक्टेरिया मारण्याचे गुणधर्म असतात.(anti-aging face oil)  हे दोन्ही घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते त्वचेसाठी एका मॅजिकल सीरमप्रमाणे काम करतात. हे मिश्रण त्वचेला लावल्यास आठवड्याभरात आपल्याला फरक पाहायला मिळेल. 

वयाच्या चाळिशीनंतर हाडं राहतील दणकट, खा ५ कॅल्शियमयुक्त पदार्थ- ठिसूळ हाडं होतील मजबूत

सगळ्यात आधी एका छोट्या वाटीत खोबऱ्याचे तेल घ्या आणि त्यात तुरटीची पावडर नीट मिसळा. तुरटी पूर्णपणे विरघळली की त्याचे दाणे त्वचेला टोचणार नाही. सगळ्यात आधी आपली त्वटा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. यामुळे आपले रक्ताभिसरण सुधारते. तर तेल आपल्या त्वचेच्या आतपर्यंत पोहोचते. १५ ते २० मिनिटानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. 

तुरटीत अॅस्ट्रिंजंट नावाचे गुणधर्म असतात. जे त्वचेच्या छिद्रांना आकुंचन देतात. यामुळे वयानुसार सैल झालेली त्वचा यामुळे घट्ट होते, ज्यामुळे कपाळावरील किंवा डोळ्यांजवळ असलेल्या सुरकुत्या कमी होतात. खोबऱ्याचे तेल त्वचेची लवचिकता टिकवून ठेवते. 

तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे पिंपल्स निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करतात. खोबऱ्याच्या तेलातील लॉरिक अॅसिड डाग कमी करण्यास मदत करते. ७ दिवस हा उपाय रोज केल्याने आपल्याला त्वचेवर फरक जाणवेल तसेच काळेपणा कमी होऊन त्वचा उजळते. 

हा उपाय केल्यानंतर त्वचेला व्यवस्थित मॉइश्चरायझर करा. आपली त्वचा खूप संवदेनशील असेल तर हा उपाय करण्यापूर्वी कानाच्या मागे पॅच टेस्ट करा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करणे पुरेसे आहे. 

ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांनी हा उपाय करा. यामुळे त्वचेला आर्द्रता ठेवण्यास मदत होते. खोबरेल तेल हे नैसर्गिक मॉइश्चयराझर आहे. जे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते आणि कोरडेपणा कमी करते.

Web Title : नारियल तेल और फिटकरी का मिश्रण झुर्रियाँ और काले धब्बे कम करता है।

Web Summary : नारियल तेल को फिटकरी पाउडर के साथ मिलाकर चमकदार त्वचा पाएं। यह मिश्रण झुर्रियों, काले धब्बों को कम करता है और त्वचा को कसता है। सर्वोत्तम परिणामों के लिए धीरे-धीरे मालिश करें। नियमित उपयोग से त्वचा की रंगत और बनावट में सुधार दिखेगा।

Web Title : Coconut oil and alum mix reduces wrinkles and dark spots.

Web Summary : Mix coconut oil with alum powder for glowing skin. This blend reduces wrinkles, dark spots, and tightens skin. Apply and massage gently for best results. Regular use, two to three times a week, will reveal noticeable improvements in skin tone and texture.