सध्या ग्रीन टी पिण्याचा ट्रेंड फारच लोकप्रिय आहे. आजकाल बरेचजण वजन कमी करण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी ग्रीन टी पिणे पसंत करतात. ग्रीन टी पिण्याने जसे आपल्या आरोग्याला (Green Tea Is Very Beneficial For Your Face Know About It) अनेक फायदे मिळतात तसेच त्वचेसाठी देखील ग्रीन टी (Get Clear Skin, Glowing Skin With Green Tea) अतिशय उपयुक्त आहे. आजकाल बहुतेकजणांना (Benefits of Green Tea for Skin) त्वचेच्या अनेक समस्या सतावतात. या अनेक प्रकारच्या स्किन प्रॉब्लेम्समुळे आपल्या त्वचेचे सौंदर्य आणि आरोग्य बिघडते. यासाठीच वेळोवेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी त्वचेची स्वच्छता करणे गरजेचे असते( Benefits of a Green Tea Face Mask and How to Make One).
त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी आपण ग्रीन टी फेसमास्कचा वापर करु शकतो. ग्रीन टी प्यायल्याने जसे आपले शरीर आतून डिटॉक्स होते तसेच ग्रीन टी फेसमास्क लावल्याने त्वचा आतून स्वच्छ केली जाते. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊन आपली त्वचा अधिक सुंदर आणि आकर्षक दिसू लागते. यासाठी ग्रीन टी फक्त पिऊ नका तर त्वचेसाठी देखील त्याचा फेसमास्क म्ह्णून कसा वापर करु शकतो ते पाहा.
साहित्य :-
१. ग्रीन टी पावडर - १ टेबलस्पून
२. मध - १ टेबलस्पून
३. दही - १ टेबलस्पून
आयुर्वेदिक पद्धतीने करा स्किन डिटॉक्स! त्वचेच्या समस्या होतील दूर - फरक दिसेल काही दिवसांत...
फक्त वाटीभर बेसन पिठात मिसळा 'हे' ६ पदार्थ, विकतचे फेसमास्क जाल विसरुन - त्वचा दिसेल सुंदर....
कृती :-
१. ग्रीन टी बॅग फोडून त्यातील ग्रीन टी च्या पानांची पावडर एका बाऊलमध्ये काढून घ्यावी.
२. त्यानंतर त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून दही आणि मध घालावे.
३. आता सगळे जिन्नस चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावेत.
४. ग्रीन टी चा हा तयार फेसमास्क १० ते १५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून द्यावा.
वाढते वजन - पोटाची ढेरी होईल कमी, सकाळी उपाशी पोटी खा 'हे' फळं - दिसाल स्लिमट्रिम...
ग्रीन टी फेसमास्कचा वापर कसा करावा ?
१. ग्रीन टी फेसमास्क फ्रिजमधून बाहेर काढल्यावर तो ब्रशच्या मदतीने थेट चेहऱ्यावर लावावा.
२. त्यानंतर हा फेसमास्क चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे तसाच लावून ठेवावा.
३. मग १५ मिनिटांनी किंवा फेसमास्क संपूर्णपणे सुकल्यावर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.
४. ओला चेहरा स्वच्छ पुसून कोरडा करावा त्यानंतर चेहऱ्यावर नेहमीच्या वापरातील मॉइश्चरायझर लावून घ्यावे.
ग्रीन टी फेसमास्क लावण्याचे फायदे :-
१. ग्रीन टी मध्ये व्हिटॅमिन 'ई' असते, जे तुमच्या चेहऱ्याला हायड्रेट करते आणि त्वचेला पोषण देते.
२. त्वचेला आलेली सूज दूर करण्यासाठी ग्रीन टी चा वापर केला जातो. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेवरील लालसरपणा किंवा जळजळ दूर करण्यास मदत करतात.
३. ग्रीन टी मध्ये अँटिऑक्सिडेंट असल्याने स्किन एजिंग होण्यापासून बचाव केला जातो.