Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरफडीचा गर ‘असा’ लावा केसांना आणि धुवून टाका, सॉफ्ट सिल्की केसांसाठी एकदम सोपा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 10:57 IST

Silky Shiny Hair Remedy : केस जेव्हा रखरखीत आणि निर्जीवर होतात तेव्हा ते तुटू लागतात. जर आपलेही केस झाडूसारखे झाले असतील जास्त चिंता करण्याची गरज नाही. कारण यावर एक फारच सोपा आणि गुणकारी असा घरगुती उपाय आहे.

केसांची जर योग्य पद्धतीने काळजी घेतली तर केस चमकदार, मजबूत आणि मुलायम राहू शकतात. केसांची वाढच होत नाहीये, केस चमकदारच दिसत नाहीये याचा राग मनात धरून महागडे प्रॉडक्ट केसांवर लावण्याची काहीच गरज नाही. कारण यासाठी आपण काही घरगुती करू शकता. केस जेव्हा रखरखीत आणि निर्जीवर होतात तेव्हा ते तुटू लागतात. जर आपलेही केस झाडूसारखे झाले असतील जास्त चिंता करण्याची गरज नाही. कारण यावर एक फारच सोपा आणि गुणकारी असा घरगुती उपाय आहे.

हा उपाय म्हणजे जेव्हाही आपण केसांना शाम्पू करणार असाल तर त्याआधी केसांना चांगल्याप्रकारे कोरफडीचा गर  लावा. याने काही दिवसांमध्येच आपले केस मुलायम आणि चमकदार होतील. इतकंच नाही तर कोरफडीच्या गराने केसगळतीही कमी होईल. अशात कोरफडीचा गर लावायचा कसा हे जाणून घेऊया.

कोरफडीचा गर कसा लावाल?

कदाचित आपल्याला माहीत असेल की, कोरफडीचा गर हा केसांसाठी वरदान मानला जातो. कारण याने केसांच्या वेगवेगळ्या समस्या झटक्यात दूर होण्यास मदत मिळते. आठवड्यातून दोन ते तीन दिवस जर केसांना कोरफडीचा गर लावाल तर केस सॉफ्ट आणि सिल्की सुद्धा होतील. यासाठी कोरफडीचं एक जाड आणि भरपूर जेल असलेलं पान घ्या. यातील गर व्यवस्थित काढा आणि मिक्सरमधून चांगली पेस्ट तयार करा.

आता ज्या दिवशी आपण शाम्पू करणार असाल त्याच्या काही तासांआधी केसांवर कोरफडीचा हा गर चांगला लावा. केसांच्या मूळांना लावा आणि केसही पूर्ण गराने कव्हर करा. गर लावून झाल्यावर एखादी शॉवर कॅप घाला किंवा केस असेही बांधू शकता. साधारण १ तासांपर्यंत हा गर केसांना तसाच राहू द्या. त्यानंतर एखाद्या माइल्ड शाम्पूने केस चांगले धुवा. हा उपाय आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा नक्की करा. आपल्याला केस मुलायम, चमकदार झालेले दिसतील. सोबतच केसगळती आणि कोंड्याची समस्याही कमी झालेली दिसेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Aloe vera for soft, silky hair: Application guide

Web Summary : Use aloe vera gel before shampooing for soft, shiny hair. Apply generously to roots and strands, leave for an hour, then wash with mild shampoo. Repeat twice weekly to reduce hair fall and dandruff.
टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स