Lokmat Sakhi >Beauty > Makeup Tips : मेकअप करताना फाऊंडेशन की कन्सिलर सर्वात आधी काय लावावं? ४ टिप्स- दिसाल अगदी ब्यूटी क्वीन

Makeup Tips : मेकअप करताना फाऊंडेशन की कन्सिलर सर्वात आधी काय लावावं? ४ टिप्स- दिसाल अगदी ब्यूटी क्वीन

foundation vs concealer what comes first: beginner makeup tips step by step: flawless makeup routine guide : आपण कन्सिलर आणि फाऊंडेशनमधील फरक समजून घेऊया. त्वचेच्या प्रकारानुसार सगळ्यात आधी त्वचेवर काय लावायला हवे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2025 12:34 IST2025-06-26T12:34:03+5:302025-06-26T12:34:56+5:30

foundation vs concealer what comes first: beginner makeup tips step by step: flawless makeup routine guide : आपण कन्सिलर आणि फाऊंडेशनमधील फरक समजून घेऊया. त्वचेच्या प्रकारानुसार सगळ्यात आधी त्वचेवर काय लावायला हवे.

Beauty Tips What should you apply first foundation or concealer Follow these 4 tips look like a beauty queen | Makeup Tips : मेकअप करताना फाऊंडेशन की कन्सिलर सर्वात आधी काय लावावं? ४ टिप्स- दिसाल अगदी ब्यूटी क्वीन

Makeup Tips : मेकअप करताना फाऊंडेशन की कन्सिलर सर्वात आधी काय लावावं? ४ टिप्स- दिसाल अगदी ब्यूटी क्वीन

सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला मेकअपचा आधार घेतात. सर्वच महिलांना अधिक प्रमाणात मेकअप करायला आवडते. त्यासाठी त्या नेहमी आपल्या स्कीन टोन आणि चेहरा लक्षात घेऊन मेकअप करतात.(Makeup Tips) परंतु, काही महिला अशा असतात ज्यांना मेकअप करायला आवडते पण त्यांना याविषयी कोणत्याही पद्धतीची कल्पना नसते.(Beauty Tips) मेकअप करताना त्यासाठी लागणारं फाऊंडेशन, पावडर, सीरम, कन्सिलर यांपैकी कोणतं प्रोडक्ट कधी आणि कसं लावावं याबाबत आपला गोंधळ उडतो.(foundation vs concealer what comes first) जर आपण व्यवस्थित पद्धतीने मेकअप केला नाही तर आपला चेहरा अधिक केकी किंवा पॅची दिसू शकतो. (beginner makeup tips step by step)

केस विंचरताच केसांची मोठी गुंतवळ हातात येते? ५ सोपे बदल, केसांच्या सगळ्या तक्रारीच संपतील

1. आपण कन्सिलर आणि फाऊंडेशनमधील फरक समजून घेऊया. त्वचेच्या प्रकारानुसार सगळ्यात आधी त्वचेवर काय लावायला हवे. जाणून घेऊया काही सोप्या टिप्स 

2. मेकअप करताना सगळ्यात फाऊंडेशन लावणे चांगले असते. कारण यामुळे आपल्या संपूर्ण त्वचेचा रंग सारखा होतो. तसेच चेहऱ्यावर काही काळे डाग किंवा काळे भाग राहत असतील तर कन्सिलरच्या मदतीने आपण ते नीट करु शकतो. 

3. फाऊंडेशन हे चेहऱ्यावरील त्वचेचा रंग एकसारखा करण्यास मदत करते. काळी वर्तुळे, मुरुमे, चेहऱ्यावर असणाऱ्या खुणा, लालसरपणा या सगळ्यांना लपविण्यासाठी कन्सिलरचा वापर केला जातो. फाऊंडेशन हे आपल्या शेड्समध्ये पाहायला मिळते. तर कन्सिलर हे अधिक डार्क रंगामध्ये मिळते ज्यामुळे आपल्या त्वचेवर डाग झाकता येतात. 

केसांसाठी बहुगुणी आहे मेथी! 'या' पद्धतीने लावा हेअर पॅक, कोंड्याचा त्रास होईल कमी- केस होतील दाट

4. जर आपली त्वचा तेलकट असेल तर आपण मॅट फिनिश असलेले फाऊंडेशन आणि नॉन-क्रीमी कन्सिलर वापरायला हवे. कोरडी त्वचा असणाऱ्यांनी हायड्रेटिंग आणि ड्यू फिनिश असलेले प्रोडक्ट वापरणे चांगले असते. जर आपली त्वचा अतिसंवेदनशील असेल तर कमी रसायन असलेली उत्पादने निवडावी, ज्यामुळे त्वचेला आग, जळजळ आणि रॅशेस येणार नाही. 

5. आपल्याला पार्टी, लग्न किंवा शूटसाठी मेकअप करायचा असेल तर लेयरिंगची पद्धत निवडा. यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी प्राइमर, नंतर फाऊंडेशन मग कन्सिलर लावा. सेटिंग पावडरने आपला चेहरा नीट सेट करा. लेयरिंग करताना उत्पादनांचे प्रमाण कमी ठेवा, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक लूक येईल. 

6. आपल्या त्वचेवर जास्त डाग किंवा काळी वर्तुळे नसतील तर फक्त फाऊंडेशन पुरेसे असते. पण काही भाग खूप काळा किंवा लालसरपणा असेल तर कन्सिलरने टच-अप द्या. अनेकदा आपण गरज नसताना संपूर्ण चेहऱ्यावर कन्सिलरचा वापर करतो. ज्यामुळे मेकअप खूप जास्त केल्यासारखे वाटते. 

7. मेकअपचा बेस अधिक काळ टिकवण्यासाठी आपल्याला प्राइमर आणि सेटिंग स्प्रे वापरायला हवा. यासाठी सगळ्यात आधी त्वचेला मॉइश्चरायझर करायला विसरु नका. जास्त घाम येणाऱ्या त्वचेवर मॅट फिनिश आणि पावडर असणारी उत्पादने वापरा.ब्रश किंवा स्पंज वापरुन बेस चांगला मिसळा ज्यामुळे मेकअप जास्त वेळ राहिल. 

Web Title: Beauty Tips What should you apply first foundation or concealer Follow these 4 tips look like a beauty queen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.