Join us

पावसामुळे त्वचा तेलकट- कोरडी झाली? २ घरगुती उपाय, सकाळी उठताच चेहऱ्यावर येईल ग्लो- सुरकुत्याही होतील कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2025 11:41 IST

Monsoon beauty tips for oily skin: Home remedies for glowing skin in monsoon: Wrinkle reduction home remedies: आपल्यालाही त्वचेसाठी अधिक पैसे खर्च करायचे नसतील तर हे २ सोपे घरगुती उपाय करुन पाहा. हा उपाय करुन पाहिल्यास त्वचा ग्लो होण्यास मदत होईल.

पावसाळा सुरु झाला असून वातावरणात गारवा पसरला आहे.(Monsoon beauty tips for oily skin) याचा जितका आपल्या आरोग्यावर परिणाम होतो तितकाच आपल्या त्वचेवर देखील होतो.(Home remedies for glowing skin in monsoon) धूळ आणि प्रदूषणाच्या परिणामामुळे त्वचेचे नुकसान होते.(Skin care for oily and dark skin in rainy season) इतकेच नाही तर कामाच्या व्यापामुळे आपल्याला त्वचेकडे फारसे लक्ष देखील देता येत नाही. त्वचा सुंदर आणि तजेलदार ठेवण्यासाठी आपण अनेक महागड्या उत्पादनांचा त्वचेवर वापर करतो.(rainy season glow remedies) पावसाळ्यात वातावरण बदल्यामुळे त्वचेवर त्याचा परिणाम पाहायला मिळतो.(anti-aging natural tips) त्यामुळे त्वचा अधिक तेलकट किंवा कोरडी पडू लागते. त्वचा सुधारण्यासाठी आपण अनेक रासायनिक उत्पादने वापरतो पण यामुळे त्वचेला फायदा होण्याऐवजी नुकसान होते.(face packs for dark skin) जर आपल्यालाही त्वचेसाठी अधिक पैसे खर्च करायचे नसतील तर हे २ सोपे घरगुती उपाय करुन पाहा. हा उपाय करुन पाहिल्यास त्वचा ग्लो होण्यास मदत होईल.(oily skin care home treatment)

विरळ केसांसाठी बेस्ट उपाय! आठवड्यातून एकदा लावा ५ गोष्टी, केसांना मिळेल पोषणतत्व- होतील लांबसडक आणि दाट

आपल्या त्वचेला नैसर्गिकरित्या एक्सफोलिएट करण्यासाठी आपण घरी स्क्रब तयार करु शकतो. यामुळे सुरकुत्या कमी होतील. तसेच त्वचेला नैसर्गिक चमक येईल. हे स्क्रब बनवण्यासाठी पपई, दही आणि कॉफी मिक्स करुन त्याचा स्क्रब तयार करा. फेस स्क्रब बनवण्यासाठी पपईची पेस्ट तयार करा. त्यामध्ये दही आणि थोडी कॉफी पावडर घाला. या सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळल्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा. १० मिनिटे स्क्रब करा. यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जाण्यास मदत होईल. 

त्वचा एक्सफोलिएट झाल्यानंतर दुसरा उपाय फेस पॅक लावणे. फेस पॅक बनवण्यासाठी हळद, बेसन, मध आणि दूध याची पेस्ट तयार करा. हे मिश्रण त्वचेला लावल्याने त्वचा निस्तेज आणि अकाली वृद्धत्व येण्यापासून रोखू शकता. हा फेस पॅक १५ मिनिटे त्वचेला लावा. यानंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून हा उपाय केल्यास त्वचा ग्लो होण्यास मदत होईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी