Lokmat Sakhi >Beauty > कॅन्सरवर मात करणाऱ्या सोनाली बेंद्रेच्या चेहऱ्यावरच्या चमचमत्या ग्लोचे रहस्य, ‘हा’ खास पदार्थ

कॅन्सरवर मात करणाऱ्या सोनाली बेंद्रेच्या चेहऱ्यावरच्या चमचमत्या ग्लोचे रहस्य, ‘हा’ खास पदार्थ

Beauty Tips By Sonali Bendre: सोनाली बेंद्रे म्हणजे बॉलीवूडमधलं मराठमोळं सौंदर्य. बघा वयाच्या पन्नाशीतही तिने स्वत:चं सौंदर्य कसं सांभाळलं...(beauty secret of actress Sonali Bendre's young and radiant glowing skin)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2025 13:14 IST2025-01-22T12:46:26+5:302025-01-22T13:14:55+5:30

Beauty Tips By Sonali Bendre: सोनाली बेंद्रे म्हणजे बॉलीवूडमधलं मराठमोळं सौंदर्य. बघा वयाच्या पन्नाशीतही तिने स्वत:चं सौंदर्य कसं सांभाळलं...(beauty secret of actress Sonali Bendre's young and radiant glowing skin)

beauty secret of actress sonali bendre's young and radiant glowing skin, beauty tips by Sonali Bendre | कॅन्सरवर मात करणाऱ्या सोनाली बेंद्रेच्या चेहऱ्यावरच्या चमचमत्या ग्लोचे रहस्य, ‘हा’ खास पदार्थ

कॅन्सरवर मात करणाऱ्या सोनाली बेंद्रेच्या चेहऱ्यावरच्या चमचमत्या ग्लोचे रहस्य, ‘हा’ खास पदार्थ

Highlightsसोनाली म्हणते की माझ्या त्वचेला एखादे उत्पादन सूट झाले की मी ते वारंवार बदलत नाही. अनेक जणी इथेच चुकतात. वेगवेगळे सल्ले ऐकून वेगवेगळी उत्पादने वापरून पाहतात. बऱ्याचदा त्यानेच त्वचेचे नुकसान होते.

बॉलीवूडची नंबर १ ची अभिनेत्री किंवा टॉप ५ मध्ये येणारी अभिनेत्री अशी सोनाली बेंद्रेची ओळख कधीच नव्हती. पण तरीही तिने स्वत:ची एक जागा निर्माण केली आहे आणि ती तिचं वेगळेपण टिकवून आहे. तिचा सहज अभिनय ही तर तिची खासियत आहेच. पण त्यासोबतच तिच्या लोभस हास्याचेही अनेक चाहते आहेत. मध्यंतरीच्या काळात सोनालीला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. काही क्षणांसाठी ती हादरून गेली हाेती. पण नंतर पुन्हा उमेदीने उभी राहिली आणि सगळे औषधोपचार नेटाने पुर्ण करून आज त्या आजारातून ती पुर्णपणे बाहेरसुद्धा आली आहे. तिच्या संपूर्ण आजारपणाच्या काळात तिची जिद्द कायम होती. ती जशी आजही टिकून आहेत, तसेच काहीसे तिच्या सौंदर्याचे. वयाची पन्नाशी गाठून, एवढं आजारपण झेलूनही तिचं सौंदर्य अबाधित आहे(Beauty Tips By Sonali Bendre). त्यासाठी ती काय करते ते पाहा..(beauty secret of actress Sonali Bendre's young and radiant glowing skin)

 

स्वत:चे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सोनाली नेमकं काय करते, कोणत्या ब्यूटी ट्रिटमेंट्सवर तिचा जास्त विश्वास आहे, याविषयी काही वर्षांपुर्वी एबीपी न्यूजने तिची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये माहिती देताना सोनाली म्हणाली की कडुलिंब ही आपल्याकडची एक अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे.

नाश्त्यामध्ये चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका! पौष्टिक वाटत असले तरी पोटासाठी आहेत अतिशय घातक

ती औषधोपचांसाठी जशी उपयुक्त ठरते तसेच सौंदर्य खुलविण्यासाठीही तिचा उपयोग होतो. सोनाली कडुलिंबापासून तयार केलेली वेगवेगळी प्रसाधने वापरते आणि तेच तिच्या चमकदार, तरुण त्वचेचे रहस्य आहे. सोनाली म्हणते की माझ्या त्वचेला एखादे उत्पादन सूट झाले की मी ते वारंवार बदलत नाही. अनेक जणी इथेच चुकतात. वेगवेगळे सल्ले ऐकून वेगवेगळी उत्पादने वापरून पाहतात. बऱ्याचदा त्यानेच त्वचेचे नुकसान होते.

 

कडुलिंबाचा फेसपॅक कसा वापरावा?

बऱ्याच जणींना चेहऱ्यावर ॲक्ने, पिंपल्स येण्याचा त्रास होतो. काही जणींच्या चेहऱ्यावर खूप पिगमेंटेशन असते. कडुलिंबाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल घटक असतात जे त्वचेच्या वरील सगळ्या समस्या कमी करण्यासाठी निश्चितच मदत करू शकतात.

लग्नात नऊवारी नेसून मराठी थाट करायचा? 'या' पद्धतीने घ्या शेला, दिसाल राजेशाही- घरंदाज!!

यासाठी कडुलिंबाची कोवळी पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर थोडेसे पाणी टाकून ती मिक्सरमधून वाटून घ्या. त्यानंतर ते वाटण गाळून घ्या. कडुलिंबाच्या पानांचा जो रस निघेल त्यामध्ये थोडी चंदन पावडर आणि चिमूटभर हळद घाला. हा लेप चेहऱ्यावर लावा आणि १० ते १२ मिनिटांनी धुवून टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा. काही दिवसांतच त्वचेमध्ये खूप छान फरक दिसून येईल. 


 

Web Title: beauty secret of actress sonali bendre's young and radiant glowing skin, beauty tips by Sonali Bendre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.