Join us

उन्हाळ्यासाठी उत्तम घरगुती फेसपॅक- केळीच्या सालींमध्ये 'हा' पदार्थ मिसळून लावा, टॅनिंग निघून जाईल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2025 14:21 IST

Home Hacks For Radiant Glowing Skin: उन्हामुळे त्वचा टॅन होऊन काळवंडली असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(banana face pack for glowing skin)

ठळक मुद्देया लेपामध्ये तुम्ही मध, लिंबाचा रस, कॉफी पावडर, पिठीसाखर, दही असे पदार्थही अधूनमधून घालून चेहऱ्याला लावू शकता. यामुळे त्वचेवर जास्त छान परिणाम दिसून येईल. 

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. कारण कडक, तीव्र उन्हामुळे नाजुक त्वचेला खूप त्रास होतो. आपण सनकोट, हॅण्डग्लोव्ह्ज, स्कार्फ असं सगळं लावून आपलं अंग झाकलं तरीही ते टॅन होतं (easy home hacks for removing tanning). उन्हामुळे त्वचा रापल्यासारखी होते. अनेक जणांना सनबर्नचा त्रास होतो. त्वचेवर लालसर रॅश येते. तुमचा हा सगळा त्रास कमी करण्यासाठी त्वचेला द्या केळीच्या सालांचा गार गार थंडावा (banana face pack for glowing skin).. हा फेसपॅक तुम्ही फक्त उन्हाळ्यातच नाही तर एरवी वर्षभरही लावू शकता. त्यामुळे त्वचेचा टाईटनेस टिकून राहण्यास मदत होईल आणि त्वचेवर अकाली सुरकुत्या येणार नाहीत. तसेच त्वचेचा काळवंडलेपणा कमी होऊन त्वचेवर छान चमक येईल. (skin care tips for summer)

 

चमकदार त्वचेसाठी केळी आणि तांदळाचा फेसपॅक

केळी आणि तांदळाचा फेसपॅक करण्याची रेसिपी अतिशय सोपी आहे. केळी आरोग्यासाठी जशी पौष्टिक असते तसेच केळीचे साल आपल्या त्वचेसाठी अतिशय गुणकारी ठरते. केळीच्या सालांमध्ये असणारे काही घटक त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी मदत करतात.

टॉयलेट सीट वारंवार घासण्याची गरजच नाही! घ्या सोपी युक्ती- टॉयलेटमधली दुर्गंधीही गायब होईल

त्यासाठी एका केळीचे साल घ्या आणि त्याचे बारीक काप करा. ते काप एका पातेल्यामध्ये घाला. त्यामध्ये २ चमचे तांदूळ आणि साधारण दोन कप पाणी घाला.

आता या पातेल्यावर झाकण ठेवून ते गॅसवर गरम करायला ठेवा. मिश्रण गरम होत असताना ते वारंवार हलवत राहा. जेव्हा तांदूळ शिजेल तेव्हा गॅस बंद करा.

 

आता शिजलेला भात आणि केळीची सालं थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात घाला आणि त्याची अगदी बारीक पेस्ट करून घ्या.

डॉ. जगन्नाथ दीक्षित सांगतात 'या' पद्धतीने जेवा; शुगर वाढणार नाही- वजनही राहील नियंत्रणात

ही पेस्ट चेहऱ्याला लावून साधारण २० मिनिटे तशीच ठेवा. त्यानंतर हळूवार हाताने चोळून चेहऱ्याला लावलेला लेप काढून टाका आणि थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. 

या लेपामध्ये तुम्ही मध, लिंबाचा रस, कॉफी पावडर, पिठीसाखर, दही असे पदार्थही अधूनमधून घालून चेहऱ्याला लावू शकता. यामुळे त्वचेवर जास्त छान परिणाम दिसून येईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीसमर स्पेशलकेळी