केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण बाजारातील महागडे शाम्पू आणि कंडिशनरचा वापर करतो. पण यात असणारे सिलिकॉन आणि पॅराबेन्स केसांच्या वरच्या थराला तात्पुरती चमक देतात पण आतून केसांना कोरडे आणि कमकुवत बनवतात.(Hair Care Tips) यामुळे काही काळानंतर आपले केस झाडूसारखे राठ आणि निर्जीव दिसू लागतात. यामुळे केसगळतीचा त्रास देखील वाढतो. जर आपलेही केस खूप गळत असतील आणि हाताला रखरखीत लागत असतील तर केमिकलला बाय म्हणायची वेळ आली आहे. (Hair softening tips without chemicals)आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत ज्या महागड्या हेअर स्पा ट्रीटमेंटलाही मागे टाकू शकतात. घरच्या घरी आपण हेअर मास्क बनवू शकतो. पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा १० रुपयांत घरीच हेअर मास्क कसा करायचा पाहूया. यासाठी लागणारे साहित्य जाणून घ्या. (Natural remedies for hair fall control)
साहित्य
पिकलेले केळ - १ दही - २ चमचेखोबऱ्याचे तेल - १ चमचा
1. हेअर मास्क बनवण्यासाठी सगळ्यात आधी पिकलेले केळे एका बाऊलमध्ये घेऊन ते चमच्याने किंवा हाताने पूर्णपणे स्मॅश करा. हवं असल्यास आपण मिक्सरमधून देखील ते फिरवून घेऊ शकतो.
2. या स्मॅश केलेल्या केळ्यामध्ये २ चमचे दही आणि १ चमचा खोबऱ्याचे तेल घाला. हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या जोपर्यंत ते क्रीमसारखे मऊ होत नाही.
3. केस थोडे ओले करा. आता हा मास्क केसांच्या मुळांपासून ते टोकापर्यंत व्यवस्थित लावा. केस लांब असतील तर केसांचे छोटे भाग करुन लावा, ज्यामुळे प्रत्येक केसाला पोषण मिळेल.
4. हा मास्क लावून साधारण २० ते ३० मिनिटे राहू द्या. आपण केसांना शावर कॅप लावू शकतो. ३० मिनिटानंतर कोमट पाण्याने केस धुवा, नंतर सौम्य शाम्पून केस स्वच्छ करा.
5. केळ्यात असणारे जीवनसत्त्व केसांना आतून मऊ करतात, ज्यामुळे केस विंचरताना तुटत नाहीत. दह्यातील लॅक्टिक अॅसिड टाळूवरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. ज्यामुळे कोंड्याची समस्या कमी होते. खोबऱ्याच्या तेलामुळे केसांना मजबुती मिळते. हा उपाय केसांना नैसर्गिक चमक देतो.
Web Summary : Avoid chemical conditioners! This homemade mask, using banana, yogurt, and coconut oil, promises to stop hair fall and transform dry, rough hair into soft, silky locks. A cheap and effective solution for healthy hair.
Web Summary : केमिकल कंडीशनर छोड़ें! केला, दही और नारियल तेल से बना यह घरेलू मास्क बालों का झड़ना रोकने और रूखे बालों को मुलायम और रेशमी बनाने का वादा करता है। स्वस्थ बालों के लिए एक सस्ता और प्रभावी उपाय।