Lokmat Sakhi >Beauty > डोक्याच्या समोरच्या भागातले केस गळून टक्कल पडू लागलं? करा कोथिंबिरीचा उपाय, केस वाढतील भरभर

डोक्याच्या समोरच्या भागातले केस गळून टक्कल पडू लागलं? करा कोथिंबिरीचा उपाय, केस वाढतील भरभर

Hair Care Tips: कपाळाच्या वरच्या भागावर असणारे छोटे केस म्हणजेच बेबी हेअर कमी होऊन हेअर लाईन मागे गेल्यासारखे दिसत असेल तर हा उपाय लगेचच करून बघा.(home hacks for reducing hair loss)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2025 17:55 IST2025-07-08T09:19:07+5:302025-07-08T17:55:37+5:30

Hair Care Tips: कपाळाच्या वरच्या भागावर असणारे छोटे केस म्हणजेच बेबी हेअर कमी होऊन हेअर लाईन मागे गेल्यासारखे दिसत असेल तर हा उपाय लगेचच करून बघा.(home hacks for reducing hair loss)

baby hair growth remedies, home hacks for reducing hair loss, how to get rid of hair fall  | डोक्याच्या समोरच्या भागातले केस गळून टक्कल पडू लागलं? करा कोथिंबिरीचा उपाय, केस वाढतील भरभर

डोक्याच्या समोरच्या भागातले केस गळून टक्कल पडू लागलं? करा कोथिंबिरीचा उपाय, केस वाढतील भरभर

Highlightsकाही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास केस गळण्याचं प्रमाण बरंच कमी झालेलं दिसेल..

हल्ली केस गळण्याची समस्या खूप जास्त वाढलेली आहे. प्रत्येक घरात केस गळण्याच्या समस्येमुळे वैतागलेली एक तरी व्यक्ती असतेच. यामध्ये साधारण असं दिसून येतं की ज्या व्यक्ती तिशीच्या आसपास आहेत त्या बऱ्याच जणांचे कपाळावरचे छोटेसे केस म्हणजेच बेबी हेअर विरळ होत जाताना दिसतात. यामुळे मग हेअर लाईनही मागे मागे जाऊन कपाळ जास्त मोठं दिसतं (home hacks for reducing hair loss). असा त्रास होत असेल तर बेबी हेअरची वाढ चांगली व्हावी आणि त्यांचं गळणं कमी व्हावं यासाठी काय उपाय करता येऊ शकतो ते पाहूया..(how to get rid of hair fall?)

 

डोक्याच्या समोरच्या भागातले केस जास्त गळत असतील तर काय करावे?

बेबी हेअर कमी होऊन हेअर लाईन मागे जात असेल तर असं होऊ नये म्हणून आपण कोणता उपाय करू शकतो याविषयीची माहिती dr.priyanka.abhinav_7509 या instagram पेजवर शेअर करण्यात आलेली आहे.

बोले चूड़ियां..! येत्या श्रावणात भरा चमचमत्या नव्या बांगड्या, पाहा ६ नवीन सुंदर डिझाइन्स!

यामध्ये एक अतिशय साधा सोपा उपाय सांगितला असून तो उपाय जर तुम्ही नियमितपणे केला तर पुढच्या काही महिन्यातच तुम्हाला तुमच्या बेबी हेअरमध्ये छान वाढ झालेली दिसून येईल. 

हा उपाय करण्यासाठी एक वाटी कोथिंबीर घ्या. ती पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून तिचा रस काढून घ्या.

 

कोथिंबीरीच्या रसामध्ये २ चमचे आल्याचा रस घाला. आल्याचा रस केसांच्या वाढीसाठी खूप चांगला असतो. त्यामुळे केसांच्या मुळाशी चांगला रक्तप्रवाह होऊन केसांची मुळं पक्की होण्यास मदत होते. यामुळे केस गळणे कमी होऊन त्यांची वाढ व्हायला मदत होते.

मसूर डाळीचा फेसपॅक! १५ मिनिटांत टॅनिंग, डेडस्किन जाईल- फेशियल केल्यासारखा इंस्टंट ग्लो मिळेल

आता या रसामध्येच १ किंवा २ विटामिन ई कॅप्सूल घाला. तिन्ही पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि हे मिश्रण दिवसातून एकदा ज्या ठिकाणी बेबी हेअर विरळ होत चालले आहे त्या ठिकाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. तयार केलेले मिश्रण तुम्ही ८ दिवस फ्रिजमध्ये ठेवू शकता. काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास केस गळण्याचं प्रमाण बरंच कमी झालेलं दिसेल, असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे


 

Web Title: baby hair growth remedies, home hacks for reducing hair loss, how to get rid of hair fall 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.