Ayurvedic Remedy for Grey Hair: केस कमी वयातच पांढरे होण्याची समस्या महिला असो वा पुरूषांमध्ये गेल्या काही वर्षात खूप जास्त वाढली आहे. केस पांढरे झाले तर तुम्ही कमी वयातच म्हातारे दिसू लागतात. लोकही यावरून टोमणे मारू लागतात. केस पांढरे होण्याची कारणं वेगवेगळी असतात. ज्यात तणाव, चुकीचं खाणं-पिणं, पोषणाची कमतरता, प्रदूषण, केसांवर केमिकल्सचा वापर करणे यांचा समावेश करता येईल. पांढरे झालेले केस लपवण्यासाठी लोक महागड्या केमिकल्सचा वापर करतात. ज्यामुळे केसांचं अधिक नुकसान होतं.
जर तुम्हाला पांढरे झालेले केस पुन्हा काळे करायची असतील आणि केसांचं नुकसान होऊ द्यायचं नसेल तर काही नॅचरल उपाय करू शकता. केस काळे करण्याचा असाच एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी त्यांच्या इन्स्टा हॅंडलवर एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.
कोणत्या गोष्टी लागतील?
1 कप कलौंजी
2 मोठे चमचे काळे तिळ
2 ते 3 मोठ चमचे आवळा पावडर
काही कढीपत्ते
कसा तयार कराल नॅचरल कलर
सगळ्यात आधी वरील साहित्य एका लोखंडाच्या कढईमध्ये टाका. या गोष्टी कमी गर्द काळ्या होईपर्यंत कमी आसेवर भाजा. त्यानंतर या गोष्टी थंड होऊ द्या. नंतर या गोष्टी मिक्सरमधून बारीक करा.
कसा कराल वापर?
1 चमचा तयार झालेलं पावडर खोबऱ्याच्या किंवा बदामाच्या तेलात मिक्स करा. हे तेल कोमट करा. कोमट झालेलं तेल केसांच्या मुळात लावा. आठवड्यातून दोन वेळा हे तेल तुम्ही केसांमध्ये लावू शकता. यानं तुमचे केस नॅचरली काळे होण्यास मदत मिळेल.
काय काळजी घ्याल?
पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी हा उपाय करण्यासोबतच शरीराला पोषक तत्व मिळतील अशा गोष्टी खाव्यात. डाएटमध्ये व्हिटामिन बी12, आयर्न आणि प्रोटीन असलं पाहिजे. या गोष्टींनी सुद्धा तुम्हाला पांढरे केस काळे करण्यास मदत मिळू शकते.