आपल्यापैकी अनेकजणींना त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या वारंवार त्रास देतात. त्वचेच्या अनेक समस्यांपैकी बहुतेकजणींना सतावणारी समस्या म्हणजेच त्वचेवर पिंपल्स येणे. प्रत्येकीला कधी ना कधी ( How to get rid of pimples and get clear skin fast) त्वचेवर पिंपल्स येण्याच्या समस्येचा कमी अधिक त्रास (How to remove a pimple according to Ayurveda) भोगावा लागलाच असेल. वयात येताना किंवा हार्मोन्समध्ये बदल (Home Remedies for Pimples) होत असताना पिंपल्स येणं सामान्य मानलं जातं, पण काहीवेळा ही समस्या वारंवार आणि सतत होत राहिल्यास ती केवळ त्वचेची नाही तर शरीरातील अंतर्गत असंतुलनाचं लक्षण असू शकते. विशेषतः जेव्हा पित्त दोष वाढतो तेव्हा अशा प्रकारच्या त्वचेसंबंधित समस्या अधिक जाणवू लागतात(Ayurvedic Remedy For Pimple Nutritionist Shweta Shah Shares 7 Day Pimple Remedy That Cool Your Pitta & Clear Your Skin).
चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, झोपेचा अभाव, तणाव, पचनसंस्थेतील बिघाड किंवा आयुर्वेदानुसार वाढलेल पित्त दोष यामुळेही पिंपल्सची समस्या वाढते. म्हणूनच पिंपल्सवर फक्त बाहेरून औषधं लावून उपाय होत नाही, तर या समस्येची मुळं आतून शोधून त्यावर उपाय करणे गरजेचे असते. यासाठीच, प्रसिद्ध सेलिब्रिटी आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी पित्त दोष शांत करून त्वचेला आतून स्वच्छ ठेवण्याचा एक सोपा आणि घरगुती उपाय सांगितला आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी सुचवलेला हा घरगुती उपाय, जो पित्त दोष नियंत्रित करून चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी करण्यास मदत करतो.
पित्त दोष वाढल्यावर त्वचेवर पिंपल्स येण्याची कारणं...
सेलिब्रिटी आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांच्यामते, आयुर्वेदानुसार जेव्हा शरीरात पित्तदोष वाढतो, तेव्हा रक्तात विषारी द्रव्ये (टॉक्सिन्स) तयार होऊ लागतात आणि त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसू लागतो. त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ, पिंपल्स, लालसर बारीक पुरळ, डाग, सूज किंवा जळजळ यांसारख्या समस्या वाढतात. असे असले तरी काही खास उपायांमुळे पित्तदोष शांत करता येतो आणि त्वचेसंबंधित तक्रारींपासून आराम मिळू शकतो. खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी, घरगुती आयुर्वेदिक उपाय यांच्या मदतीने त्वचेचं आरोग्य पुन्हा सुधारू शकतो.
अळशीचा साबण करा घरच्याघरी, विकतच्या साबणांपेक्षा सुंदर आणि त्वचा होते मऊमऊ फ्रेश...
आठवड्याभरात पिंपल्स होतील गायब...
न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह सांगतात की, एक खास आणि सोपा, घरगुती उपाय फक्त ७ दिवस नियमित केल्यास पिंपल्सची समस्या मुळापासून कमी होऊ शकते. हा उपाय केवळ पिंपल्स कमी करत नाही तर त्वचेला आतून स्वच्छ करतो आणि पित्तदोषही शांत करतो. यासाठी, आपल्याला ४ ते ५ लवंग काड्या, प्रत्येकी १ टेबलस्पून मध आणि लिंबाचा रस तसेच ४ ते ५ कडुलिंबाची पाने इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
सगळ्यांतआधी एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात या लवंग काड्या रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी या लवंग काड्यांची मिक्सरमध्ये वाटून बारीक पेस्ट तयार करून घ्यावी. या तयार लवंगाच्या पेस्टमध्ये मध आणि लिंबाचा रस मिसळा. आपल्याला हवे असल्यास आपण त्यात कडुलिंबाच्या पानांची पेस्ट देखील घालू शकता. हे मिश्रण दररोज सकाळी उपाशी पोटी चमचाभर खावे. न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांच्या मते, हा उपाय सलग ७ दिवस केल्यास त्याचे चांगले परिणाम तुम्हाला सहज दिसू लागतील. त्वचा स्वच्छ व निरोगी होण्यास मदत होईल आणि पित्तदोष नियंत्रित राहील.
जास्वंदीचे लालबुंद फुल करते त्वचेवर जादू! त्वचेच्या सगळ्या समस्यांवर गुणकारी सुंदर औषध...
घरीच करा डोळ्यांसाठी नॅचरल आयमास्क, थकलेल्या डोळ्यांना मिळेल गारवा-डोळे दिसतील सुंदर...
हा उपाय केल्याचा फायदा कसा होतो ?
१. रक्तशुद्धी करण्यासाठी :- श्वेता शाह यांच्या मते, लवंग आणि कडुलिंब हे दोन्ही घटक रक्तशुद्ध करण्यासाठी फायदेशीर ठरतात. हे शरीरातील विषारी द्रव्ये (टॉक्सिन्स) बाहेर काढण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचेची आतून खोलवर स्वच्छता होते.
२. पित्तदोष कमी करणं :- लवंग आणि लिंबाचा रस शरीरातील उष्णता कमी करण्याचे काम करतात. त्यामुळे पित्तदोष संतुलित राहतो आणि त्वचेची जळजळ, लालसरपणा व सूज आपोआप कमी होते.
३. पिंपल्सवर असरदार :- श्वेता शाह सांगतात की हा उपाय केवळ त्वचेच्या वरच्या थरावर परिणाम करत नाही, तर त्वचेला आतून स्वच्छ करून पिंपल्स तयार होण्याची प्रक्रिया थांबवतो.
४. मुलायम व शांत त्वचा :- कडुलिंब व मध त्वचेला आतून मॉइश्चराइज करतात, ज्यामुळे चेहरा अधिक स्वच्छ, मऊसूत आणि तेजस्वी दिसतो.