आजच्या धावपळीच्या जीवनात त्वचेची काळजी घेणं अनेकांसाठी महत्त्वाचं ठरलं आहे. सतत मेकअप, प्रदूषण, ताणतणाव आणि अपुरी झोप यामुळे चेहऱ्यावर थकवा दिसू लागतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळे, अचानक येणाऱ्या फोड्या आणि निस्तेज त्वचा यामुळे आत्मविश्वासही कमी होतो.(ayurvedic skincare remedy) सुंदर दिसण्यासाठी आपण महागड्या क्रीम्स, मेकअप करतो. वाढते वय, मुरुमे किंवा सुरकुत्या लपवण्यासाठी त्वचेवर भरमसाठ मेकअप देखील करतो.(pimples home treatment) पिंपल्स किंवा डाग लपवण्यासाठी मेकअप करण्याऐवजी काही घरगुती उपाय केल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो. सुंदर त्वचेसाठी महागडे फाऊंडेशन किंवा कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स वापरण्याची गरज नाही. आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या काही आयुर्वेदिक घटकांच्या मदतीने त्वचा नैसर्गिकरित्या सुधारता येते.(night skincare routine)आयुर्वेदानुसार रात्रीच्या वेळी त्वचेची व्यवस्थित काळजी घेता येते. झोपेच्या वेळी त्वचा स्वत:ची दुरुस्ती करते आणि नव्याने पेशींची निर्मिती होते. आपण रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला काय लावायला हवं पाहूया.
त्वचेला दुरुस्त करण्यासाठी आपण २ चमचे ग्लिसरीन, ४ चमचे गुलाबजल, १ चमचा कोरफडीचा गर आणि १ चमचा व्हिटॅमिन ई कॅप्सूल लागेल. ही क्रीम बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एका भांड्यात ग्लिसरीन घ्यावं लागेल. त्यात गुलाबजल, कोरफडीचा गर आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला, हे सर्व साहित्य नीट मिसळा. आपली क्रीम तयार होईल.
क्रीम त्वचेला लावण्यापूर्वी तो स्वच्छ धुवा. आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर रोज ७ ते ८ थेंब लावा. आठवड्याभरात आपली त्वचा ग्लो होण्यास मदत होईल. या क्रीममुळे आपली त्वचा हायड्रेट होते. तसेच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते, सुरकुत्या आणि पुरळ देखील कमी होतात. डार्क सर्कल असणाऱ्यांसाठी ही क्रीम उपयुक्त ठरते. या उपायांसोबत पुरेशी झोप, भरपूर पाणी पिणे आणि संतुलित आहार घेतल्यास त्वचेचा नैसर्गिक तेज वाढतो. काही दिवसांतच चेहरा स्वच्छ, मऊ आणि तजेलदार दिसू लागेल.
Web Summary : This article suggests an Ayurvedic night skincare routine using readily available ingredients like glycerin, rose water, aloe vera, and Vitamin E to combat skin issues such as dark circles, pimples, and dullness, promoting natural radiance and hydration.
Web Summary : यह लेख ग्लिसरीन, गुलाब जल, एलोवेरा और विटामिन ई जैसे आसानी से उपलब्ध सामग्री का उपयोग करके आयुर्वेदिक नाइट स्किनकेयर रूटीन का सुझाव देता है, जो डार्क सर्कल, पिंपल्स और सुस्ती जैसी त्वचा की समस्याओं से निपटने, प्राकृतिक चमक और हाइड्रेशन को बढ़ावा देता है।