Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > केस वाढवण्यासाठी कोणतं तेल लावायचं? आयुर्वेदीक तज्ज्ञ सांगतात 'या' तेलानं भरभर केस वाढतात

केस वाढवण्यासाठी कोणतं तेल लावायचं? आयुर्वेदीक तज्ज्ञ सांगतात 'या' तेलानं भरभर केस वाढतात

Ayurvedic Experts Reveals Best Oil For Hair Growth : आयुर्वेदात भृंगराजला केशराज म्हणजेच केसांचा राजा म्हटलं जातं. २०२४ पासून हेअर केअरच्या पद्धतींमध्ये बराच बदल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 12:21 IST2025-12-28T12:09:38+5:302025-12-28T12:21:09+5:30

Ayurvedic Experts Reveals Best Oil For Hair Growth : आयुर्वेदात भृंगराजला केशराज म्हणजेच केसांचा राजा म्हटलं जातं. २०२४ पासून हेअर केअरच्या पद्धतींमध्ये बराच बदल झाला आहे.

Ayurvedic Experts Reveals Best Oil For Hair Growth Ayurvedic Hair Oil For Hair Growth | केस वाढवण्यासाठी कोणतं तेल लावायचं? आयुर्वेदीक तज्ज्ञ सांगतात 'या' तेलानं भरभर केस वाढतात

केस वाढवण्यासाठी कोणतं तेल लावायचं? आयुर्वेदीक तज्ज्ञ सांगतात 'या' तेलानं भरभर केस वाढतात

केसांची काळजी घेणं (Hair Care Tips) कोणत्याही मोठ्या मिशनपेक्षा कमी नसतं.  आपले केस लांबसडक दाट होण्यासाठी काही प्रयत्नही करावे लागतात. बाजारात वेगवेगळी महागडी उत्पादनं, हेअर सिरम उपलब्ध आहेत. पण पारंपारीक तेलांचा पूर्वापार वापर केला जात आहे. २०२४ पासून हेअर केअरच्या पद्धतींमध्ये बराच बदल झाला आहे. आयुर्वेदीक एक्सपर्ट राम अवतार यांनी आयुर्वेदीक तेल  वापरून केसांना कसे चमकवावे याबाबत अधिक माहिती दिली आहे.   (Ayurvedic Experts Reveals Best Oil For Hair Growth Ayurvedic Hair Oil For Hair Growth)

 भृंगराज तेल केसांसाठी फायदेशीर

आयुर्वेदात भृंगराजला केशराज म्हणजेच केसांचा राजा म्हटलं जातं. हिवाळ्याच्या दिवसांत गळणारे केस रोखण्यासाठी आणि नवीन केस उगवण्यासाठी भृंगराज तेल फायदेशीर ठरतं. आयुर्वेदात भृंगराजला केशराज म्हणजेच केसांचा राजा म्हटलं जातं. हिवाळ्याच्या दिवसांत हे तेल केसांना लावल्यानं गळणारे केस थांबवता येतात आणि नवीन केस उगवण्यासही मदत होते.

भृंगराज तेल स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत करते ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. कोमट तेलात  १५ ते २० मिनिटं स्काल्पची मसाज करा. आठवड्यातून १ किंवा दोन वेळा केसांना लावल्यास केस हळूहळू मजबूत होण्यास मदत होते. 

ब्लाऊजला फॅन्सी लूक देणारे मागच्या गळ्याचे १० लेटेस्ट डिझाईन्स; साडीत स्टायलिश दिसाल

आवळा केसांच्या मुळांसाठी टॉनिक

आवळ्याच्या तेलात व्हिटामीन सी, एंटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.  ज्यामुळे केसांना मुळांपासून मजबूती मिळते. डॉ. राम अवतार सांगतात की, केसांना शुद्ध आवळा तेल लावल्यानं केस लांबसडक-दाट होण्यास मदत होते. केस धुण्याच्या ३० मिनिटं आधी हे तेल लावा. ज्यामुळे प्रदुषण, स्ट्रेसमुळे होणारं नुकसान टाळता येतं.

नारळाचं तेल आणि कढीपत्ता

दक्षिण भारतीय घरांमध्ये हा उपाय पूर्वावापर केला जात आहे. डॉ. राम अवतार सांगतात की नारळाचे तेल केसांमध्ये प्रोटीनची कमतरता होण्यापासून बचाव करते. ज्यामुळे केस तुटत नाही. कढीपत्ता व्हिटामीन, अमिनो एसिडनं परिपूर्ण असते ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते.

रोज पाणी घालता तरी फुलंच येत नाही? कुंडीत 'हा' पांढरा पदार्थ कालवा, भराभर येतील गुलाब

मूठभर कढीपत्ता नारळाच्या तेलात गरम करून घ्या. थंड झाल्यानंतर गाळून घ्या नंतर या तेलानं डोक्याची मालिश करा. मूठभर कढीपत्ता नारळाच्या तेलात गरम केल्यानंतर तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल. थंड झाल्यानंतर गाळून या तेलानं डोक्याची मालिश करा.

Web Title : बालों के विकास के लिए आयुर्वेदिक विशेषज्ञ ने बताए बेहतरीन तेल।

Web Summary : आयुर्वेदिक विशेषज्ञ राम अवतार बालों के विकास के लिए भृंगराज, आंवला और नारियल-करी पत्ता तेल का उपयोग करने का सुझाव देते हैं। भृंगराज परिसंचरण में सुधार करता है, आंवला जड़ों को मजबूत करता है, और नारियल का तेल प्रोटीन हानि को रोकता है।

Web Title : Ayurvedic expert reveals best oils for faster hair growth naturally.

Web Summary : Ayurvedic expert Ram Avatar suggests using Bhringraj, Amla, and coconut-curry leaf oil for hair growth. Bhringraj improves circulation, Amla strengthens roots, and coconut oil prevents protein loss.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.