शरीरावरील नको असणारे केस काढण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग करतो.(Chemical-free waxing at home) वॅक्सिंग, थ्रेडिंग आणि शेव्हिंग हे शरीरावरील केस काढण्याचे काम करते.(Homemade wax with coffee powder) यासाठी आपल्याला पैसे तर मोजावे लागतातच पण त्रास देखील सहन करावा लागतो. (Natural wax for body hair removal) शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी आपला अधिक वेळ देखील जातो.(No-pain natural waxing method) वॅक्सिंग करताना आपल्याला अधिक त्रास होतो. वॅक्सिंगचे देखील अनेक प्रकार आहे.(Itch-free body wax at home) रेझर, स्ट्रीप किंवा हॉट वॅक्सने बॉडीवरील केस काढले जातात. परंतु, हे करताना आपल्याला अधिक वेदना होतात. वॅक्सिंग हे रेझरच्या तुलनेत फायदेशीर असते.(Herbal hair removal remedy) यामध्ये आपल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्सिंग पाहायला मिळते. सॉफ्ट- हार्ड वॅक्स, फ्रुट वॅक्स, चॉकलेट वॅक्स, शुगर वॅक्स असे वॅक्सिंगचे प्रकार आहेत. (Coffee scrub for waxing)
रात्री झोपण्यापूर्वी टाचांना लावा 'हे' तेल, सोपा घरगुती उपाय, टाचा होतील मऊ
शरीरावरील केस काढण्यासाठी आपण थ्रेडिंग आणि वॅक्सिंगची मदत घेतो. परंतु, यामुळे आपल्या त्वचेवर रॅशेस किंवा पुरळे येतात. तसेच त्वचेवर जळजळ देखील होते. परंतु, या त्रासापासून वाचण्यासाठी कॉफीचा हा घरगुती उपाय आपल्याला फायदेशीर ठरेल. तसेच त्वचेला अधिक चमकदार बनवेल.
वॅक्स कसे बनवाल?
पाणी - १ कप साखर - १ कप कॉफी - २ चमचे लिंबाचा रस - १ चमचा तेल
कृती
1. सगळ्यात आधी पातेल्यात पाणी गरम करुन घ्या. त्यात कपभर साखर घालून चांगले उकळवून घ्या.
2. आता यामध्ये २ चमचे कॉफी घालून चांगले उकळू द्या. त्यात लिंबाचा रस घालून पुन्हा उकळवा.
3. तयार पाण्याचे मिश्रण घट्ट होईपर्यंत चमच्याने ढवळत राहा.
4. मिश्रण घट्ट झाल्यानंतर वॅक्स तयार होईल. एका वाटीमध्ये सर्व मिश्रण काढून थोडे थंड होण्यासाठी ठेवा.
5. वॅक्स करण्यापूर्वी त्वचेला तेल लावा. तयार केलेले वॅक्स पायाला किंवा हाताला लावून वॅक्सिंग करतो तसे करा.
कॉफी वॅक्सिंगमुळे त्वचेला अनेक फायदे होतात. वॅक्सिंगमुळे केस काढण्याची प्रक्रिया सोपी होते. तसेच केसांची वाढ देखील थांबते. कॉफीत अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे त्वचेला पोषण मिळण्यास मदत होते. तसेच त्वचेवरील लालसरपणा आणि सूज कमी होण्यास मदत होते.