आजकालच्या व्यस्त लाईफमध्ये ताण तणाव आणि प्रदूषणामुळे केस कमकुवत होतात. महागडे शॅम्पू आणि केसांची उत्पादनं बाजारात बरीच उपलब्ध आहेत (Solution For Hair Fall). पण यातील केमिकल्समुळे केसांचे आरोग्य खराब होते. आयुर्वेदातील काही पदार्थ केसांसाठी फायदेशीर, गुणकारी ठरू शकतात. ज्यामुळे केसांचं कोणतंही नुकसान न होतात चांगला रिजल्ट दिसून येतो (How To Grow Hairs Naturally). अश्वगंधाचा वापर अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो. केसांना यामुळे काय खास फायदा होतो ते समजून घेऊ. (Ashwnagandha Hair Tonic For Hairs Long And Strong Hairs An Only 20 Rs)
अश्वगंधा केसांसाठी वरदान
रिसर्चनुसार आयुर्वेदात अश्वगंधाला शक्ती आणि मजबूती देणारी जडी-बूटी समजले जाते. याच्या वापरानं केवळ केस गळणं कमी होत नाही तर नवीन केस सुद्धा सहज उगवतात. यामुळे स्काल्पला पोषण मिळतं. ज्यामुळे केस दाट, चमकदार आणि दाट, मजबूत होतात. अश्वगंधामध्ये शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात (Ref). ज्यामुळे केसांची घनता चांगली होते. अश्वगंधा स्काल्पमधील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते याशिवाय नैसर्गिकरित्या केसांच्या केराटीन स्तराचे संरक्षण करते, ज्यामुळे केस जास्त मजबूत होतात आणि तुटण्याचे प्रमाण कमी होते.
अश्वगंधाची सुकलेली मुळं, नारळाचे किंवा तिळाचे तेल आणि लोखंडाची कढई. सगळ्यात आधी लोखंडाच्या कढईत सुकलेली मुळं १५ ते २० मिनिटं घालून मंद आचेवर शिजवून घ्या. थंड झाल्यानंतर केसांना आणि स्काल्पला हलक्या हातानं मसाज करा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा प्रयोग केल्यास केस गळणं कमी होईल आणि केस दाट-चमकदार दिसतील.
केसांसाठी अश्वगंधा पावडर
तुम्ही अश्वगंधा तेलाचा वापर करू शकता किंवा तुमच्या नेहमीच्या खोबरेल तेलात अश्वगंधा चूर्ण मिसळून ते गरम करून, स्काल्पला मसाज करू शकता. जर तुमच्याकडे तेल तयार करण्याचा वेळ नसेल तर तुम्ही अश्वगंधा पावडर दह्यात किंवा पाण्यात मिसळून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट स्काल्पवर लावून २० ते ३० मिनिटांसाठी केस असेच राहू द्या नंतर कोमट पाण्यानं केस धुवा.
चहा गाळून चहा पावडर फेकू नका! घरातील ५ काम झटपट, सोपी होतील; दाट-सुंदर केस दिसतील
या पद्धतीनं केसांतील कोंडा आणि कोरडेपणा निघून जाण्यास मदत होईल. अश्वगंधाचा परीणाम लगेच दिसत नाही पण हळूहळू केस मजबूत होतात. दाट होतात आणि केसांची चमक वाढते.याशिवाय ताण-तणाव कमी होतो जो केस गळण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे.