तुटलेले केस ही अगदीच कॉमन समस्या आहे. (Are you worried about your hair falling out all the time? Before you get frustrated and cut your hair, here's what to do.)केसांच्या टोकाला फाटे फुटतात त्यामुळे केस विरळ होत जातात. केस गळायला लागतात. तसेच दिसायलाही पिंजारलेले दिसतात. तुटलेल्या केसांमागे अनेक कारणे असतात. तसेच उपायही असतात. तुटलेले केस फक्त दिसायला खराब दिसत नाहीत. (Are you worried about your hair falling out all the time? Before you get frustrated and cut your hair, here's what to do.)त्याच्यामुळे केसांचे आरोग्यही खराब होते. केसांचे पोषण कमी होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे.
केसांना फाटे फुटण्यामागे कारणे काय असतात?
१. सतत स्ट्रेटनिंग तसेच ब्लो- ड्रायिंग केल्याने सतत केस कापल्याने केसांना फाटे फुटतात. कर्लिंग तसेच कलरिंग अशा ट्रिटमेंट्स केल्याने केसांचे आरोग्य तर खराब होतेच आणि त्याला फाटेही फुटतात.
२. केसांना योग्य ते पोषण मिळत नाही. केसांचा ओलावा कमी होतो मग ते कोरडे होतात आणि तुटतात. केस व्यवस्थित न विंचरल्यानेही ही समस्या उद्भवते.
3. आहारात जर आयर्न कमी असेल तर केसांवर त्याचा परिणाम होतो. शरीरातील जीवनसत्व डी, जीवनसत्व बी१२ कमी झाल्यामुळे केस तुटतात. शरीरातील प्रोटीन कमी झाल्याने केसांना फाटे फुटतात.
काय करू शकता?
१. हेअर हिटींग टुल्सचा वापर कमी करा. तसेच केसांसाठी स्प्रे वापरु नयेत. इतरही काही रसायने असणारे प्रॉडक्ट्स केसांसाठी वापरु नयेत. केमिकलयुक्त शाम्पू वापरू नका. कंडिशनिंग प्रॉडक्ट्स तसेच हेअर मास्क अशा गोष्टी केसांसाठी वापरू नयेत.
२. केस वाळवताना टॉवेलने जास्त जोरात झटकल्याने केस तुटतातही आणि खराबही होतात. केस पुसताना काळजी घ्यावी.
३. आहारात बायोटीनयुक्त पदार्थ घ्यावेत. तसेच प्रोटीनची मात्रा वाढवावी. आयर्नचे प्रमाण संतुलित राहावे यासाठी अन्नपदार्थ खावेत.
४. केस वाळवण्यासाठी हेअर ड्रायर वापरत असाल तर त्याचा वापर कमी करा. गरज असतानाच वापरावा. सतत केस कापणे टाळा. केसांना सारखी कात्री लागली की केस तुटत जातात. मात्र योग्य वेळी केसांचा आकार व्यवस्थित करून घेणेही गरजेचे आहे.
या काही सवयी लावल्यानंतरही जर केसांना फाटे फुटत असतील तर योग्य वेळीच डॉक्टरांकडे जाऊन या. कशाची कमतरता आहे याची तपासणी करा आणि त्यानुसार उपाय करा.