Join us

काखेतील काळेपणाची लाज वाटते? डॉक्टर सांगतात ३ घरगुती उपाय, नसते प्रयोग येतील अंगाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2025 19:51 IST

Are You Embarrassed By The Dark Underarms? Try these 3 Home Remedies : काळवंडलेल्या काखेकडे दुर्लक्ष करू नका .

शरीराची कितीही काळजी घेतली तरी काही ना काही सारखे होतच राहते. काही गोष्टी कितीही उपाय केले तरी पुन्हा येतात. जसं की काखेतील काळेपणा. ब्युटीपार्लरला जाऊन क्लिनअप केलं तरी पुन्हा काख काळवंडते. ही समस्या आपल्याला फार वाटते. आपण लक्ष देत नाही.(Are You Embarrassed By The Dark Underarms? Try these 3 Home Remedies) तुम्हाला हे माहिती आहे का की हा काळेपणा ऍलर्जीमुळे होऊ शकतो? माहिती नसेल तर जाणून घ्या. काख काळवंडणं नैसर्गिक आहे. पण त्याला खाज सुटणं चांगलं लक्षण नाही.(Are You Embarrassed By The Dark Underarms? Try these 3 Home Remedies)

काख का काळवंडते?

१.डॉक्टर सांगतात, काखेतील काळेपणाचे मुख्य कारण म्हणजे हार्मोनल चेंजेस् . बऱ्याच जणींच्या काखा काळवंडलेल्या असतात. यात लपवण्यासारखे काहीच नाही, मुलींचा आत्मविश्वास कमी होतो. पण तो काळपटपणा हार्मोन्समुळे येतो. त्यात लाज वाटण्याची गरज नाही. पण  काहींना ऍलर्जीमुळे हा काळपटपणा येतो त्यांना मात्र डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे. 

२.रेझरने काखेतले केस कापल्यामुळे काख काळी पडते. काही केमिकल युक्त प्रोडक्ट्स वापरल्याने देखील असे होते. काखेत खाज येते. ब्युटी प्रोडक्टस वापरताना विचार करा .

३. घामामुळे सुद्धा काख काळवंडते. हे कारण सामान्य आहे. योग्य साबण आणि क्रिम वापरून घामाचा त्रास होणार नाही याची काळजी घेता येते. त्रिफळा चूर्णसारख्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून वास घालवता येतो. 

४. सेंट व परफ्यूममुळे असे होऊ शकते. त्यामुळे तुमच्या शरीराला मानवेल असाच सेंट वापरा. 

 सोशल मिडियावर सुंदर काखेसाठीचे उपाय बघून मुली ते करतात. तसे करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अवयवांवर प्रयोग करणे धोकादायक आहे. काही घरगुती उपाय आहेत. जे वर्षानुवर्ष महिला करत आल्या आहेत. ते करून बघा.१. बटाट्याच्या कापाने काख स्वच्छ करत जा.२. साध्या खोबरेल तेलाने मसाज करा .३. हळदीचा लेप लावा.

घरच्या घरी बरं होतं नसल्यात वेळीच डॉक्टरांकडे जा. जर कसली ऍलर्जी झाली असेल तर ते चांगले लक्षण नाही. पीएच मध्ये गडबड असू शकते. त्यामुळे वेळीच उपचार केलेले बरे. 

टॅग्स :हेल्थ टिप्सब्यूटी टिप्सहोम रेमेडी