आरशात स्वत:चा चेहरा पाहिल्यानंतर आपलीही त्वचा सुंदर, नितळ आणि स्वच्छ असावी असं प्रत्येक महिलेला वाटतं. वाढत्या वयात चेहऱ्यावर पिंपल्स येणे, मुरुमांची समस्या, त्वचा कोरडी, तेलकट किंवा काळी पडणं या समस्येला आपल्याला वारंवार सामोरे जावे लागते.(Arab women beauty secrets) पण अरेबियन महिलांची त्वचा इतकी सुंदर कशी हा प्रश्न कायमच पडतो. त्यांच्या सौंदर्याची जगभर चर्चा आहे.(natural glow face pack)
कडक ऊन आणि कोरड्या हवामानातही त्यांची त्वचा नितळ, चमकदार आणि मऊ दिसते. हे लोक महागडे फेशियल, ट्रीटमेंट्स किंवा केमिकल प्रॉडक्ट्स वापरत नाही तर काही सोपे घरगुती उपाय करतात ज्यामुळे त्वचा अधिक चमकण्यास मदत होते.(yogurt face pack) त्यापैकीच एक उपाय म्हणजे दही. योग्य पद्धतीने दह्यात मिसळलेल्या काही घटकांमुळे त्वचेला ताजेपणा आणि नैसर्गिक ग्लो मिळण्यास मदत होते.
तिळाचे लाडू दगडासारखे कडक होतात- तुटतच नाही? गूळ निवडण्यासाठी ४ टिप्स-लाडू मऊ खुसखुशीत
दही हे आपल्या त्वचेसाठी सौम्य आणि पोषक मानलं जातं. यामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स, लॅक्टिक अॅसिड आणि मॉइश्चरायझिंग घटक असतात. जे आपल्या त्वचेला मऊ ठेवण्यास, कोरडेपणा कमी करण्यास आणि डेड स्किन हटवण्यास मदत करू शकतात. अरेबियन स्किन केअरमध्ये दह्याचा वापर अनेकदा घरगुती फेसपॅकच्या स्वरूपात केला जातो. दह्यात कोणते २ पदार्थ मिसळायला हवे पाहूयात.
मायग्रेनच्या त्रासाने डोकं उठलं? इवलासा आल्याचा तुकडा ‘या’ पद्धतीने चघळा, डोकेदुखी होईल कमी
आपण देखील आपल्या त्वचेची व्यवस्थित काळजी घेतली तर अरब महिलांसारखी त्वचा आपल्याला मिळू शकते. कोणतेही महागडे उत्पादने न खरेदी करता आपण दह्याचा वापर करु शकतो. दह्यात आपण तांदळाचे पीठ आणि दूध पावडर मिक्स करायला हवे. याचा फेस पॅक तयार करुन चेहऱ्यावर १५ मिनिटे लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा, नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहरा पुन्हा नव्याने उजळण्यास मदत होईल.
जर आपली त्वचा नाजूक असेल तर पॅच टेस्ट करायला विसरु नका. दह्यातील लॅक्टिक अॅसिडमुळे त्वचेचा काळपटपणा दूर होऊन चेहरा उजळतो. हा फेस पॅक त्वचेला घट्ट बनवतो, ज्यामुळे वाढत्या वयाची लक्षणे लवकर दिसत नाही. आपली त्वचा कोरडी पडत असेल, तर हा फॉर्म्युला त्वचेला खोलवर हायड्रेट करतो.
