Lokmat Sakhi >Beauty > डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य

डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य

Cucumber for Eyes: सोशल मीडिया आणि ब्युटी टिप्समध्ये तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की लोक डोळ्यांवर काकडीचे तुकडे ठेवून आराम करतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:31 IST2025-08-06T12:25:58+5:302025-08-06T12:31:44+5:30

Cucumber for Eyes: सोशल मीडिया आणि ब्युटी टिप्समध्ये तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की लोक डोळ्यांवर काकडीचे तुकडे ठेवून आराम करतात.

applying cucumber in eyes make you relax know the truth | डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य

डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य

कमी झोप आणि मोबाईलची स्क्रीन सतत पाहिल्याने डोळ्यांना सूज येते किंवा डार्क सर्कल येतात. सोशल मीडिया आणि ब्युटी टिप्समध्ये तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की लोक डोळ्यांवर काकडीचे तुकडे ठेवून आराम करतात. डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरोखर डोळ्यांना आराम मिळतो का की तो फक्त एक ब्यूटी ट्रेंड बनला आहे?

डॉ. आंचल यांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडीत असलेले व्हिटॅमिन सी, कॅफीक एसिड आणि अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांची सूज कमी करण्यास आणि डार्क सर्कल हलकी करण्यास मदत करू शकतात. हा घरगुती उपाय अनेक लोकांसाठी प्रभावी ठरला आहे.

सूज कमी होते

काकडीत असलेला थंडपणा सूज कमी करतो. विशेषतः स्क्रीनवर बराच वेळ काम केल्यानंतर डोळ्यांवर काकडी ठेवल्याने आराम मिळतो.

डार्क सर्कल कमी होतात

काकडीत असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि सिलिका डोळ्यांखालील त्वचेला टोन उजळवण्यास मदत करतात.

आराम मिळतो

काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असतं, जे डोळ्यांभोवतीच्या त्वचेला आराम देतं.

कसा करायचा वापर?

काकडी १५ ते २० मिनिटं रेफ्रिजरेटरमध्ये थंड करा.

त्यानंतर दोन गोल काप कापून डोळ्यांवर ठेवा.

डोळे बंद करा आणि १० ते १५ मिनिटं आराम करा.

हे ठेवा लक्षात

काकडी पूर्णपणे धुतल्यानंतरच डोळ्यांवर ठेवा.

जर तुम्हाला ऍलर्जी किंवा त्वचेवर जळजळ होण्याची समस्या असेल तर प्रथम पॅच टेस्ट करा

काकडी फक्त थकवा आणि सूज कमी करण्यास मदत करते, 

डोळ्यांसंबंधी गंभीर आजार असल्यास वापरू नका

काकडी डोळ्यांना आराम देण्याचा एक नैसर्गिक आणि सोपा मार्ग असू शकते, हा फक्त एक घरगुती उपाय आहे, उपचार नाही. जर डोळ्यांमध्ये सतत जळजळ, सूज किंवा वेदना होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.


 

Web Title: applying cucumber in eyes make you relax know the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.