Lokmat Sakhi >Beauty > केसगळती थांबेल, कोंडाही कमी अन् केसही वाढतील; आठवड्यातून एकदा करा हा नॅचरल उपाय!

केसगळती थांबेल, कोंडाही कमी अन् केसही वाढतील; आठवड्यातून एकदा करा हा नॅचरल उपाय!

Vitamin E Onion Juice and Coconut Oil Benefits for Hair: केसगळती, केस तुटणे, डोक्यात कोंडा, रखरखीत केस अशा वेगवेगळ्या समस्या सतत होत राहतात. याची कारणं पोषणाची कमतरता, केसांची योग्य काळजी न घेणे, केमिकल्सचा वापर, एखादा आजार इत्यादी सांगता येतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 20:47 IST2025-05-29T12:05:47+5:302025-05-29T20:47:19+5:30

Vitamin E Onion Juice and Coconut Oil Benefits for Hair: केसगळती, केस तुटणे, डोक्यात कोंडा, रखरखीत केस अशा वेगवेगळ्या समस्या सतत होत राहतात. याची कारणं पोषणाची कमतरता, केसांची योग्य काळजी न घेणे, केमिकल्सचा वापर, एखादा आजार इत्यादी सांगता येतील.

Apply vitamin e, onion juice and coconut oil on hair to get rid off hair fall, dandruff | केसगळती थांबेल, कोंडाही कमी अन् केसही वाढतील; आठवड्यातून एकदा करा हा नॅचरल उपाय!

केसगळती थांबेल, कोंडाही कमी अन् केसही वाढतील; आठवड्यातून एकदा करा हा नॅचरल उपाय!

Vitamin E Onion Juice and Coconut Oil Benefits for Hair: लांब, मुलायम, चमकदार आणि मजबूत केस जास्तीत जास्त महिलांची इच्छा असते. पूर्वी महिलांचे केस कंबरेपर्यंत लांब राहत होते. मोठाल्या दोन दोन वेण्याही पाडल्या जात होत्या. पण आजकाल असं फार कमी बघायला मिळतं. उलट आजकाल केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्यांमुळे महिला वैतागलेल्या आहेत. केसगळती, केस तुटणे, डोक्यात कोंडा, रखरखीत केस अशा वेगवेगळ्या समस्या सतत होत राहतात. याची कारणं पोषणाची कमतरता, केसांची योग्य काळजी न घेणे, केमिकल्सचा वापर, एखादा आजार इत्यादी सांगता येतील.

अशात या समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळी केमिकल्स प्रोडक्ट्स वापरली जातात. पण केमिकल्स प्रोडक्ट्स शिवायही तुम्ही केसांच्या समस्या दूर करू शकता. यासाठी एक घरगुती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या एकाच उपायानं तुम्ही केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करू शकता. हा उपाय म्हणजे व्हिटामिन ई, कांद्याचा रस आणि खोबऱ्याचं तेल. चला तर जाणून घेऊ या उपायाचे फायदे...

केसगळती थांबेल

जर तुम्ही रोजच्या केसगळतीला वैतागला असाल तर व्हिटामिन ई, कांद्याचा रस आणि खोबऱ्याच्या तेलाचं मिश्रण लावू शकता. कांद्यामध्ये सल्फर असतं, ज्यामुळे केसगळती थांबते. केसांची मूळं मजबूत होतात. केसगळती थांबून केसांची वाढही होते. 

इन्फेक्शनपासून बचाव

बऱ्याच महिलांना डोक्यात सतत इन्फेक्शन होतं किंवा केसांमध्ये कोंडा होतो. ही समस्या दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही व्हिटामिन ई, कांद्याचा रस आणि खोबऱ्याच्या तेलाचं मिश्रण केसांना लावू शकता. कांद्याच्या रसामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल गुण असतात. जे इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात. डोक्यात होणारी खाजही यानं दूर होते. अधिक फायद्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय करू शकता.

मुलायम आणि चमकदार केस

व्हिटामिन ई, कांद्याचा रस आणि खोबऱ्याच्या तेलाचं मिश्रण डल आणि निर्जीव केसांपासून सुटका देतं. जर केस रखरखीत झाले असतील, चमक गेली असेल तर हा उपाय तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. या तिन्ही गोष्टींमुळे केस मुलायम आणि चमकदार होतात. खोबऱ्याच्या तेलानं केसांना खोलवर पोषण मिळतं.

केसांची वाढ

जर तुमच्या केसांची वाढ खुंटली असेल तर व्हिटामिन ई, कांद्याचा रस आणि खोबऱ्याच्या तेलाचं मिश्रण केसांवर लावावं. व्हिटामिन ई नं केसांना पोषण मिळतं. डोक्याच्या त्वचेमध्ये ब्लड सर्कुलेशन अधिक चांगलं होतं. त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते. तसेच केस मजबूत होतात आणि तुटत नाहीत. 

कसं लावाल?

हे मिश्रण तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये खोबऱ्याचं तेल घ्या. त्यात कांद्याचा रस टाका आणि 4 ते 5 व्हिटामिन ई कॅप्सूलमधील तेल त्यात टाका. या गोष्टी चांगल्या मिक्स करून घ्या. नंतर हे मिश्रण केस आणि डोक्याच्या त्वचेवर चांगलं लावा. एक तासांनंतर माइल्ड शाम्पूनं केस धुवा. आठवड्यातून एकदा तुम्ही हा उपाय करू शकता.

Web Title: Apply vitamin e, onion juice and coconut oil on hair to get rid off hair fall, dandruff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.