Join us

बीटरूटची साल फेकून देता? फक्त २ साहित्यांचा वापर करून बनवा हेअर मास्क, केसांची समस्या होईल दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2023 16:17 IST

Apply Hair Mask Of Beetroot Peel For These 3 Problems केस पांढरे - कोंड्यापासून त्रस्त आहात? बीटरूटच्या सालीचा बनवा हेअरमास्क, केस करतील शाईन

केस गळणे, केसात कोंडा तयार होणे, केस पांढरे होणे या समस्या आता सामान्य वाटतात. खराब जीवनशैलीमुळे अनेकांना या समस्येला सामोरे जावे लागते. केसांची योग्य निगा राखणे महत्वाचे. यासाठी बीटरूटच्या सालीचा हेअरमास्क बनवा.

लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, सी आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स सारख्या आवश्यक घटकांसह बीटरूटमध्ये आढळतात. जे केसांच्या समस्या मुळापासून नष्ट करतात. या हेअरमास्कमुळे केसात कोंडा होणे, केस पांढरे होणे या समस्येपासून सुटका मिळेल. याचा वापर कसा करावा, पाहा(Apply Hair Mask Of Beetroot Peel For These 3 Problems).

पांढऱ्या केसांसाठी उत्तम पर्याय

अनेकदा लोकांचे केस अगदी लहान वयात पांढरे होतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे महागडे प्रोडक्ट्स वापरण्यात येते. त्याऐवजी बीटरूटच्या सालीचा हेअरमास्क बनवा. बीटरूटमध्ये कॅरोटीनॉइड आढळते, जे टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढवते. ज्यामुळे केस लवकर पांढरे होत नाही. यासह केसांची गळती देखील थांबते.

दह्यात मीठ घालून खावे की साखर? तज्ज्ञ सांगतात काय फायद्याचं - कशाने बिघडते तब्येत

कोंडा दूर करण्यास मदत

कोंडा ही केसांची सर्वात सामान्य समस्या आहे, ज्यामुळे बहुतांश लोकं त्रस्त आहेत. यापासून सुटका मिळवण्यासाठी बीटरूटच्या सालीपासून हेअर मास्क लावा. याने केसांना नक्कीच फायदा होईल.

कंबर - नितंबावरील चरबी वाढली? ३ सोपी योगासने नियमित, बेढब शरीर होईल सुडौल

बीटरूटच्या सालीचा बनवा हेअरमास्क

बीटरूटच्या सालीचा हेअर मास्क बनवण्यासाठी, सर्वप्रथम दोन ते तीन बीटरूटची सालं घ्या. त्यानंतर ते धुवून स्वच्छ करा. ही सालं मिक्सरच्या भांड्यात घ्या, त्यात दोन ते तीन चमचे लिंबाचा रस घालून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट टाळूवर लावा. हे मिश्रण २० मिनिटांसाठी स्काल्पवर लावून ठेवा. त्यानंतर सामान्य पाण्याने केस धुवून घ्या. आपण हा हेअरमास्क आठवड्यातून दोन वेळा वापरू शकता.

टॅग्स :केसांची काळजीहोम रेमेडीत्वचेची काळजी