Join us

केमिकल्सला करा बाय! नॅचरल ग्लोसाठी त्वचेवर लावा बिटाचा रस- ४ सोप्या पद्धती, त्वचा होईल नितळ- चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 12:46 IST

Beetroot juice for glowing skin: Beetroot for skin brightening: Natural glow with beetroot: Beetroot beauty benefits: Skin benefits of beetroot juice: Beetroot for dark spots: बिटात असणारे घटक त्वचा उजळवण्यास मदत करतात.

चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण सतत काहींना काही लावतो. बीट हा आपल्या आरोग्यासाठी जितका महत्त्वाचा आहे तितक्याच चेहऱ्यासाठी देखील.(How to apply beetroot juice for glowing skin) चेहरा सुंदर दिसण्यासाठी, ओठ गुलाबी दिसण्यासाठी आपण बिटाचा वापर करतो.(Simple ways to use beetroot for skincare) बीट खाल्ल्याने आरोग्याला अनेक पोषकतत्व मिळतात. सुरकुत्या, पुरळ आणि काळे डाग कमी करण्यासाठी, त्वचेचे हायड्रेशन सुधारण्यासाठी बिटाचा फायदा होतो. (beetroot remedies for dark spots)बीटरुटमध्ये ८७ टक्के पाणी असते. त्यात जीवनसत्त्वे ए, बी आणि सी तसेच लोह, मँग्नेशिअम आणि पोटॅशियमसारखी खनिजे असतात.(Home remedies using beetroot for brighter skin) बीटरुटमध्ये लाइकोपीन आणि स्क्वेलीन असते. ज्यामुळे आपली त्वचेची लवचिकता वाढते तसेच बारीक रेषा कमी होतात.(Beetroot juice for skin) बिटरुटमध्ये बीटेन असेल, जे त्वचेला शांत करते. तसेच त्वचेवरील तेलाचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. बिटांमध्ये असणारे घटक ओठांचा रंग हलका करुन काळे डाग कमी करतात. (Benefits and how to use)

सुरकुत्या- डार्क सर्कलचे टेन्शन? चेहऱ्याला रोज लावा अळशीचा फेसपॅक, घरगुती उपाय- टॅनिंग-पिंपल्स गायब

आपल्या त्वचेवर काळे डाग, मुरमे येत असतील तर बीट फायदेशीर ठरेल. बिटात असणारे घटक त्वचा उजळवण्यास मदत करतात. तसेच महागड्या केमिकल्सयुक्त क्रीम्सपासून सुटका हवी असेल तर घरच्या घरी नॅचरल ग्लो येण्यासाठी बिटाचा वापर कसा करायचा ते पाहूया. या सोप्या ४ पद्धतीने बिटाचा वापर केला तर त्वचा चमकदार होईल. सनस्क्रिन, क्लींजिंग करण्यासाठी अनेक केमिकल्स असणाऱ्या क्रीम्सची गरज भासणार नाही. पाहूया बिटाचा रस कसा वापरायचा. 

1. क्लींजिंग 

त्वचा स्वच्छ करण्यासाठी चमचाभर बिटाच्या रसात कच्चे दूध घाला. व्यवस्थित मिक्स करुन त्यात कॉटन भिजवून घ्या. यांने आपला त्वचा साफ करा. असे नियमित केल्याने त्वचेचा ग्लो वाढण्यास मदत होईल. 

2. फेस स्क्रब 

स्क्रबिंगमुळे त्वचेचवरील मृतपेशी काढण्यास मदत होतात. तसेच त्वचा चमकदार आणि मऊ होतो. जर आपल्या त्वचा कोरडी पडली असेल तर बिटाच्या रसात साखर आणि बिटाचा किस घाला. व्यवस्थित मिक्स करुन त्वचेवर लावा. सुकल्यानंतर व्यवस्थित चोळून पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. 

View this post on Instagram

A post shared by LavishLillies (@ilavishlillies)

">

3. फेस मसाज  चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचा स्वच्छ होते, मुरुमे कमी होतात. यासाठी बिटाच्या रसात मध, कोरफडीचा गर आणि हळद घाला. हे मिश्रण एकत्र करुन चेहऱ्यावर मसाज करा. काही वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. चेहरा चमकण्यास मदत होईल. 

4. फेस पॅक 

आपण चेहऱ्यावर अनेक प्रकारचे फेस पॅक वापरतो. परंतु, अनेकदा बेसनाच्या पिठाचा, डाळीचा वापर केल्याने मुरुमे, रॅशेस येण्याची समस्या येते. परंतु, बिटाचा फेस पॅक वापरल्याने चेहरा उजळण्यास मदत होईल. त्यासाठी बिटाचा रस, तांदाळाचे पीठ आणि दूध घालून चांगले एकत्र करा. काही वेळाने चेहरा स्वच्छ धुवा. चेहरा ग्लो आणि तजेलदार होण्यास मदत होईल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी