Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > अनुष्का शर्माचं 'झिरो कॉस्ट' ब्यूटी सिक्रेट! तिचा फेवरिट फेसपॅक देईल आरशासारखी नितळ त्वचा - चेहऱ्यावर येईल सेलिब्रिटीसारखा ग्लो...

अनुष्का शर्माचं 'झिरो कॉस्ट' ब्यूटी सिक्रेट! तिचा फेवरिट फेसपॅक देईल आरशासारखी नितळ त्वचा - चेहऱ्यावर येईल सेलिब्रिटीसारखा ग्लो...

Anushka Sharma face pack secret : Anushka Sharma natural skincare routine : अनुष्का शर्माचे खास ब्यूटी सिक्रेट, महागड्या क्रीम्स नाही तर किचनमधील 'या' २ गोष्टींची आहे जादू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2026 17:24 IST2026-01-13T17:12:04+5:302026-01-13T17:24:04+5:30

Anushka Sharma face pack secret : Anushka Sharma natural skincare routine : अनुष्का शर्माचे खास ब्यूटी सिक्रेट, महागड्या क्रीम्स नाही तर किचनमधील 'या' २ गोष्टींची आहे जादू...

Anushka Sharma face pack secret Anushka Sharma natural skincare routine | अनुष्का शर्माचं 'झिरो कॉस्ट' ब्यूटी सिक्रेट! तिचा फेवरिट फेसपॅक देईल आरशासारखी नितळ त्वचा - चेहऱ्यावर येईल सेलिब्रिटीसारखा ग्लो...

अनुष्का शर्माचं 'झिरो कॉस्ट' ब्यूटी सिक्रेट! तिचा फेवरिट फेसपॅक देईल आरशासारखी नितळ त्वचा - चेहऱ्यावर येईल सेलिब्रिटीसारखा ग्लो...

बॉलीवूडची 'नॅचरल ब्युटी' अनुष्का शर्मा नेहमीच तिच्या नितळ आणि चमकदार त्वचेमुळे कायम चर्चेत असते. मग रेड कार्पेट असो किंवा कॅमेऱ्यामागचा 'नो मेकअप' लूक, अनुष्काची स्किन नेहमीच फ्रेश आणि ग्लोइंग दिसते. मेकअपशिवायही फ्रेश दिसणारी तिची त्वचा पाहून अनेकांना प्रश्न पडतो की ती स्किन केअरसाठी नेमकं काय करते? अनेकांना वाटतं की, या सौंदर्यामागे महागड्या स्किन ट्रीटमेंट किंवा परदेशातील ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करत असेल...(Anushka Sharma face pack secret).

जेव्हा आपण बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्याचा विचार करतो, तेव्हा डोळ्यासमोर येतात ते महागडे ब्यूटी पार्लर्स आणि महागड्या स्किन ट्रिटमेंट. पण अनुष्का शर्माच्या बाबतीत गणित थोडं वेगळं आहे. तिची त्वचा नेहमीच एखाद्या आरशासारखी स्वच्छ आणि चमकदार दिसते याचे सिक्रेट तिच्या एका साध्या, पण अत्यंत फायदेशीर  घरगुती फेसमास्कमध्ये लपलेले आहे... विशेष म्हणजे, यासाठी ती कोणतेही ब्रँडेड प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा आयुर्वेदिक आणि नैसर्गिक घटकांना प्राधान्य देते. त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी ती एक खास सिक्रेट घरगुती फेसमास्क वापरते, जो त्वचेला पोषण देतो, नॅचरल ग्लो आणतो आणि स्किन हेल्दी ठेवण्यास मदत करतो. या फेसमास्कसाठी लागणारे साहित्य सहज घरात मिळणारे असून कोणताही जास्तीचा खर्च करावा लागत नाही. बॉलीवूडची ही फिट आणि फाईन अभिनेत्री तिच्या त्वचेला डिटॉक्स करण्यासाठी एका घरगुती औषधी लेपाचा वापर करते. कोणतंही केमिकल (Anushka Sharma natural skincare routine) नसलेला हा फेसमास्क घरच्याघरी कसा तयार करायचा ते पाहूयात... अनुष्काच्या सौंदर्याचं हे सिक्रेट तुमचे स्किन केअर रुटीन कायमचे बदलून टाकेल...  पाहूयात नेमकं काय आहे अनुष्काचं हे 'झिरो कॉस्ट' ब्यूटी सिक्रेट... 

अनुष्का शर्माचं ब्यूटी सिक्रेट... 

अनुष्का शर्माचा 'झिरो कॉस्ट' ब्यूटी फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला २ टेबलस्पून कडुलिंबाची पावडर किंवा (तुम्ही कडुलिंबाची ताजी पाने वाटून वापरू शकता), १ टेबलस्पून दही, १ टेबलस्पून गुलाबपाणी, १ टेबलस्पून एलोवेरा जेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

सिक्रेट फेसमास्क कसा तयार करायचा ? 

सर्वात आधी एका बाऊलमध्ये २ चमचे कडुलिंबाची पावडर घ्या. त्यामध्ये एक चमचा दही घाला. मग एक चमचा गुलाब पाणी आणि थोडे एलोवेरा जेल टाका. आता हे सर्व मिश्रण हाताने किंवा चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घ्या. 

फक्त २० रुपयांत मिळेल ‘ॲण्टी हेअर फॉल स्प्रे’! केसांचं गळणं थांबलंच म्हणून समजा, मिळवा मजबूत केस...

कसा लावावा हा फेसपॅक?

 हा पॅक तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर, मानेवर आणि कानाच्या मागे व्यवस्थित लावा. जर पॅक थोडा शिल्लक राहिला, तर तो तुम्ही तुमच्या हातावरही लावू शकता. पॅक लावल्यानंतर १५ ते २० मिनिटे तो सुकू द्या. बरोबर २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. चेहरा धुताच तुम्हाला लगेच फरक जाणवेल. तुमचा चेहरा पूर्वीपेक्षा अधिक टवटवीत आणि स्वच्छ दिसेल. आठवड्यातील कोणतेही २ दिवस आणि २० मिनिटांसाठी हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. साधारण २ ते ३ आठवड्यांतच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट फरक दिसायला लागेल.

मोत्यासारखे चकमतील दात, लावा ‘हे’ घरगुती दंतमंजन-दातांच्या तक्रारीवर खास उपाय...

चेहऱ्यावरील काळे डाग हलके होऊ लागतील आणि त्वचेचा रंग सुधारेल.

कडुलिंबामध्ये 'अँटी-बॅक्टेरियल' गुणधर्म असल्याने पिंपल्सची समस्या बऱ्याच अंशी कमी होईल.

जर चेहऱ्यावर खाज येत असेल, तर ती समस्याही दूर होईल.

 तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि सतेज दिसू लागेल.

Web Title : अनुष्का शर्मा का 'ज़ीरो कॉस्ट' ब्यूटी सीक्रेट, पाएं दमकती त्वचा

Web Summary : अनुष्का शर्मा की दमकती त्वचा का राज है नीम, दही, गुलाब जल और एलोवेरा से बना घरेलू फेस पैक। यह 'ज़ीरो कॉस्ट' उपाय दाग-धब्बे कम करके और त्वचा की रंगत निखारकर साफ, चमकदार त्वचा का वादा करता है।

Web Title : Anushka Sharma's 'Zero Cost' Beauty Secret for Glowing Skin

Web Summary : Anushka Sharma's radiant skin secret is a homemade face pack using neem, yogurt, rose water, and aloe vera. This 'zero cost' remedy promises clear, glowing skin by reducing blemishes and improving skin tone with regular use.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.