Lokmat Sakhi >Beauty > खोबरेल तेलात मिसळा फक्त 'हे' ३ पदार्थ, चेहऱ्यावर कधीच दिसणार नाहीत एजिंगच्या खुणा...

खोबरेल तेलात मिसळा फक्त 'हे' ३ पदार्थ, चेहऱ्यावर कधीच दिसणार नाहीत एजिंगच्या खुणा...

Anti Aging Tips : Anti Aging Tips To Prevent From Wrinkles & Fine Lines : Anti-Aging Secrets: How to Reduce Fine Lines and Wrinkles : Home Remedies for Wrinkles & Fine Lines : कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा दिसतात, मग हे घरगुती उपाय करतील जादू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2025 12:05 IST2025-04-25T11:50:38+5:302025-04-25T12:05:55+5:30

Anti Aging Tips : Anti Aging Tips To Prevent From Wrinkles & Fine Lines : Anti-Aging Secrets: How to Reduce Fine Lines and Wrinkles : Home Remedies for Wrinkles & Fine Lines : कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा दिसतात, मग हे घरगुती उपाय करतील जादू...

Anti Aging Tips To Prevent From Wrinkles & Fine Lines Home Remedies for Wrinkles & Fine Lines How to Reduce Fine Lines and Wrinkles | खोबरेल तेलात मिसळा फक्त 'हे' ३ पदार्थ, चेहऱ्यावर कधीच दिसणार नाहीत एजिंगच्या खुणा...

खोबरेल तेलात मिसळा फक्त 'हे' ३ पदार्थ, चेहऱ्यावर कधीच दिसणार नाहीत एजिंगच्या खुणा...

वाढत्या वयानुसार त्वचेवर सुरकुत्या आणि एजिंगच्या खुणा येणं सहाजिक आहेच. परंतु काहीजणांना वयाच्या आधीच चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची समस्या सतावते. त्वचेवर सुरकुत्या (Anti Aging Tips To Prevent From Wrinkles & Fine Lines) आल्याने आपण कमी वयातच म्हातारे दिसू लागतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या, बारीक रेषा यामुळे आपले सौंदर्य कमी होते. त्वचेवर दिसणाऱ्या अशा सुरकुत्या आणि बारीक रेषांमुळे आपला संपूर्ण लूकच बदलून जातो. जशी आपण आपल्या (Home Remedies for Wrinkles & Fine Lines) आरोग्याची काळजी घेतो तशीच आपल्या त्वचेची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं असत(How to Reduce Fine Lines and Wrinkles).

काहीवेळा आपण त्वचेशी संबंधित छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्वचेवर येणाऱ्या बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी काहीजण अगदी कमी वयातच अँटी एजिंग क्रीम, लोशनचा वापर करतात. परंत्तू फार कमी वयातच येणाऱ्या सुरकुत्यांसाठी अशा प्रकारच्या अँटी एजिंग क्रीम्स वापरणे त्वचेच्या दृष्टीने हानिकारक ठरु शकते. यासाठीच, त्वचेवर जर कमी वयातच सुरकुत्या किंवा बारीक रेषा आणि एजिंगच्या खुणा दिसत असतील तर आपण काही नैसर्गिक उपाय नक्कीच करु शकतो. खरंतर, नारळाच्या तेलात असे अनेक घटक असतात, जे त्वचेचा सैलपणा आणि एजिंगच्या खुणा कमी करण्यास मदत करतात. यासाठी, त्वचेवरील एजिंगच्या खुणा घालवण्यासाठी तुम्हाला नारळाच्या तेलात फक्त ३ पदार्थ मिसळून त्याने त्वचेला मसाज करायचा आहे. हा उपाय केल्यास कमी वयातच त्वचेवर आलेल्या एजिंगच्या खुणा कमी होतात. यासाठी नारळाच्या तेलात कोणते ३ पदार्थ मिक्स करावेत ते पाहूयात. 

त्वचेवरील एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी... 

१. खोबरेल तेल आणि एलोवेरा जेल :- खोबरेल तेल आणि एलोवेरा जेलने त्वचेला नियमित मसाज केल्यास एजिंगच्या खुणा कमी होण्यास मदत मिळते. यासाठी, एका बाऊलमध्ये प्रत्येकी २ टेबलस्पून खोबरेल तेल आणि एलोवेरा जेल घ्यावे. आता हे दोन्ही घटक चांगले मिक्स करून घ्यावेत. या तयार मिश्रणाचा मसाज त्वचेवर केल्यास त्वचेवरील एजिंगच्या खुणा कमी होण्यास मदत मिळते. 

माधुरी दीक्षित टोनर म्हणून वापरते चक्क 'हा' पदार्थ, स्वस्तात मस्त उपाय - पन्नाशीतही दिसाल तिच्यासारखे ग्लोइंग...

२. खोबरेल तेल आणि मध :- खोबरेल तेलात चमचाभर मध मिसळून लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत मिळते. यासोबतच, मधामुळे त्वचेची चमक देखील कायम राखण्यास मदत मिळते. यासाठी खोबरेल तेलात चमचाभर मध मिसळून हे एकत्रित मिश्रण चेहऱ्यावर लावून अर्धा तास तसेच ठेवून द्यावे. अर्ध्या तासानंतर, चेहऱ्याला हलके मसाज करा आणि नंतर चेहरा धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या देखील कमी होतील. 

३. नारळ तेल आणि हळद :- हळदीमध्ये असणारे औषधी गुणधर्म त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करतात. जर तुम्ही नारळाच्या तेलात हळद मिसळून  चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील सुरकुत्या आणि एजिंगच्या खुणा कमी होतील. प्रथम एका भांड्यात खोबरेल तेल घ्या. आता त्यात चिमूटभर हळद घाला आणि मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर अर्धा तास लावावे आणि नंतर चेहरा धुवून घ्यावा. यामुळे त्वचेवरील एजिंगच्या खुणा कमी होतात.

डोक्यात खाज येते, उवा-लिखाही झाल्या? एक नैसर्गिक उपाय, उवा- लिखांचा कायमचा बंदोबस्त...

Web Title: Anti Aging Tips To Prevent From Wrinkles & Fine Lines Home Remedies for Wrinkles & Fine Lines How to Reduce Fine Lines and Wrinkles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.