Join us

ऐन तिशीतच डोळ्याखाली, चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या? ४ सोपे उपाय, चेहरा दिसेल तरुण-सतेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2023 17:31 IST

Anti aging Tips Remedies for Wrinkle free Skin : अकाली वयस्कर दिसू नये यासाठी काय करता येईल...

हल्ली चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचे प्रमाण वाढले आहे. चेहऱ्यावर पिंपल्स किंवा फोड आले, चेहऱ्याची त्वचा रुक्ष झाली तर एकवेळ आपण काही ना काही करुन ते लपवू शकतो. पण एकदा चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या की आपलं वय कमी असेल तरी आपण वयस्कर दिसायला लागतो. कधी ना कधी आपण वयस्कर होणार आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येणारच. हे जरी खरे असले तरी कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या आल्यास आपलं वय जास्त नसतानाही जास्त दिसतं. चेहऱ्याच्या त्वचेची योग्य ती काळजी न घेतल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. इतकेच नाही तर आपण घेत असलेला आहार, ताणतणाव यांमुळेही चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची शक्यता असते. मात्र या सुरकुत्या कमी व्हाव्यात यासाठी कोणते उपाय करायचे याविषयी (Anti aging Tips Remedies for Wrinkle free Skin)...

१. अँटी एजिंग क्रिम 

काही जण वयाच्या चाळीशीनंतर अँटी एजिंग उत्पादनांचा वापर करतात. वय वाढण्याची प्रक्रिया कमी करण्यासाठी ही उत्पादने फायदेशीर ठरतात. मात्र आपल्या त्वचेचा पोत, आपल्याला सूट होणारी उत्पादने यांचा विचार करायला हवा. 

२. आहाराबाबत काळजी

आहारात फळं, भाज्या, भरपूर प्रमाणात प्रोटीन, गुड फॅट घेतल्यास सुरकुत्यांचे प्रमाण कमी होते. तसेच आहारात व्हिटॅमिन्स आणि खनिजांचे प्रमाण जास्त ठेवावे. तळलेल्या किंवा मसालेदार गोष्टी खाण्यापेक्षा आरोग्यदायी पदार्थ खायला हवेत. 

३. अँटीऑक्सिडंट आणि सनस्क्रिन गरजेचे

त्वचेच्या पेशींसाठी अँटीऑक्सिडंटस गरजेची असतात, त्यामुळे त्वचा नितळ राहण्यास मदत होते. तसेच नियमितपणे सनस्क्रीनचा वापर केल्यानेही त्वचेला सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते. 

४. ताणतणावावर नियंत्रण 

त्वचा चांगली चमकदार राहण्यासाठी तणाव नियंत्रणात असणे गरजेचे असते. जास्त तणाव असेल तर कोर्टीसोल नावाचा हार्मोन जास्त प्रमाणात स्रवतो. या हार्मोनमुळे सीबम किंवा तेलाची निर्मिती होते आणि केसांच्या आजुबाजूचे छिद्र बंद होतात आणि चेहऱ्यावर फोड येतात. म्हणूनच तुम्हाला त्वचा चांगली ठेवायची असेल तर ताणतणावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.   

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी