Join us  

Anti Ageing Foods : पन्नाशीनंतरही येणार नाहीत सुरकुत्या; रोज रिकाम्या पोटी ५ पदार्थ खा, नेहमी तरूण फिट दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 9:35 AM

Anti Ageing Foods : काही घरगुती युक्त्याही वापरून पाहाव्या लागतात. (Anti Ageing Tips) तुम्ही तुमच्या आहारात पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश केला तर तुम्हाला आपोआप सुधारणा दिसून येईल.

सौंदर्य केवळ मेकअप किंवा सौंदर्य उत्पादनांमधून येत नाही. तर यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतील. निरोगी जीवनशैली, पुरेशी झोप, योग्य आहार इत्यादी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. याशिवाय काही घरगुती युक्त्याही वापरून पाहाव्या लागतात. (Anti Ageing Tips) तुम्ही तुमच्या आहारात पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश केला तर तुम्हाला आपोआप सुधारणा दिसून येईल. (How to stop ageing of skin)

इतकेच नाही तर हे पोषक घटक वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यासही मदत करतात. तर दुसरीकडे यातील काही गोष्टी रिकाम्या पोटी खाल्ल्यास फायदा दुप्पट होऊ शकतो. (How to stop ageing sings)  त्याचबरोबर या गोष्टी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानल्या जातात. त्यात आढळणारे गुणधर्म प्रभावीपणे काम करतात. यामध्ये असलेले पोषक तत्व त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. काही दिवस सतत सेवन केल्यावर फरक दिसून येईल. (Ways to reduce premature skin aging)

फळं, भाज्यांचा रस

वेगवेगळ्या भाज्यांपासून बनवलेला रस तुमच्या त्वचेसाठी तसेच केसांसाठी अत्यंत गुणकारी मानला जातो. वास्तविक, ते अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, फायबर इत्यादींनी समृद्ध असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. रोज रिकाम्या पोटी एक ग्लास भाज्यांचा रस प्यायल्याने त्वचा चमकू लागते.  असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांचा दिवसाची सुरुवात भाज्यांच्या रसाने होते.

पित्ताचा त्रास कमी होण्यासाठी घरगुती उपाय; वाचा पित्त झाल्यावर काय खायचं काय नाही

पाणी

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे खूप फायदेशीर आहे, परंतु जर तुम्हाला चेहरा तरुण आणि चमकदार बनवायचा असेल तर त्यात काही खास गोष्टींचा समावेश करा. जसे ओवा पाणी, जिरे पाणी, बडीशेप पाणी. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. याशिवाय शरीरातील टॉक्सिन्सही काढून टाकतात. विशेष म्हणजे घरगुती वस्तूंपासून बनवलेले हे औषधी पाणी रोज सेवन केल्याने तुम्हाला फार लवकर फरक दिसू शकतो.

पपई

फायबरने भरपूर असलेली पपई  शरीराला पुरेशी ऊर्जा देखील देते. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, परंतु त्वचेबद्दल बोलायचे तर ते निस्तेज आणि निर्जीव त्वचेला पुनरुज्जीवित करण्याचे काम करते. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने एक नाही तर अनेक फायदे मिळतात. हे त्वचेच्या समस्यांसाठी जबाबदार असलेल्या पेशी नष्ट करण्यास मदत करते. दररोज एक ताजी पपई खाणे पुरेसे आहे. उन्हाळ्यात स्वच्छ त्वचा हवी असेल तर पोट स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. यासाठी पपईपेक्षा चांगले काहीही नाही.

रक्तात जमा झालेले घातक कॉलेस्ट्रॉल बाहेर काढतील ५ पदार्थ; वाढत्या वयातही तब्येतही राहील ठणठणीत

कलिंगड

उन्हाळ्याच्या हंगामात स्वतःला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. अशावेळी तुम्ही रिकाम्या पोटी टरबूज खाऊ शकता. खरं तर त्यात ९० टक्के पाणी असते. तसेच, ते शरीरातील द्रव संतुलन सुधारते. याशिवाय, त्यात असलेले व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला हायपरपिग्मेंटेशन किंवा फ्री रॅडिकल्सच्या परिणामांपासून वाचवतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते रिकाम्या पोटी खाऊ शकता किंवा ज्यूस बनवल्यानंतर पिऊ शकता.

भिजवलेले बदाम

आरोग्यासाठी बदाम फायदेशीर असतातच, पण ते त्वचेसाठीही खूप फायदेशीर मानले जातात. बदाम, अक्रोड, अंजीर हे काजू तुम्ही खाऊ शकता.  त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड, प्रथिने, हेल्दी फॅट्स असतात, जे त्वचेसाठी सर्वोत्तम ठरू शकतात. रिकाम्या पोटी मर्यादित प्रमाणात याचे सेवन केल्याने त्वचा लवचिक बनते आणि सुरकुत्या, फ्री रॅडीकल्सची समस्या कमी होते. याशिवाय केस निरोगी ठेवण्यासही मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी