आजकाल वेळ वेगानं बदलत चालला आहे. (Hair Care Tips) खाण्यापिण्यापासून राहण्याखाण्यापर्यंत अनेक सवयी बदलत आहेत. निरोगी राहण्यासाठी आजकाल लोक महागडं डाएट आणि सप्लिमेंट्सचा आहार घेतात. गळणारे केस आणि स्किन केअरसाठी लोक महागड्या ट्रिटमेंट्स घेतात. (Homemade Hair Mask For Long Hairs) आजी-आजोबांनी सुचवलेला एक उपाय करून तुम्ही लांबसडक, दाट केस मिळवू शकता.
जर तुमच्या केसांची ग्रोथ थांबली असेल किंवा केस गळून गळून एकदम पातळ झाले असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय करून गेलेले केस परत मिळवू शकता. आयुर्वेदीक डॉक्टरांनी हेअर मास्कबाबत सांगितले आहे. ज्यामुळे हेअर फॉल कमी होतो. हा मास्क स्वंयपाकघरात उपलब्ध असलेल्या साहित्याच्या साहित्यानं सहज बनवू शकता. आयुर्वेदीक डॉक्टर आनंदी माहेश्वरी यांनी अधिक माहिती दिली आहे. (Amla Methi Mask For Long And Thick Hairs)
एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार केसांना लांब, दाट, मजबूत बनवण्यासाठी हेअर मास्क फायदेशीर ठरतो. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि हेअरफॉल कमी होतो. या हेअर मास्कनं केसांची ग्रोथ चांगली होते आणि गळणारे केसही कमी होतात. मेथीत प्रोटीन असते ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि केस गळणंही कमी होतं. मेथीतील लेसिथिन, केसांना पोषण देते.
यातील व्हिटामीन्स केसांना कमजोर होण्यापासून वाचवतात आणि यातील एंटी फंगल गुण, कोंडा कमी करतात. मेथीत निकोटिनिक आणि आयर्न असते. हे दोन्ही पदार्थ मेथीतील एंजाईम्स, केसांच्या मुळांमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगले बनवतात आणि हेअर फॉल कमी होतो. आवळ्यात एमीनो एसिड आणि प्रोटीन असते. ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि केस गळणं कमी होतं.
आवळ्यातील हेल्दी फॅट्स फॉलिक्सना पोषण देतात. यातील एंटी ऑक्सिडेंट्स ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात आणि फ्री रॅडिकल्सशी लढतात. ज्यामुळे फ्रि रेडीकल्सशी लढण्यास मदत होते. केस गळती होत नाही. आवळा केसांना मऊ, मुलायम बनवतो ज्यामुळे केस वाढतात. लिंबातील व्हिटामीन सी, केसांचे पोर्स मजबूत बनवतात. ज्यामुळे केस डिप क्लिन होतात. स्काल्पमध्ये कोलोजन बुस्ट होते.
हेअर फॉल कमी करण्यासाठी घरीच बनवा हेअर मास्क
१ वाटी मेथीचे दाणे घ्या, रात्रभर भिजवून घ्या याची पेस्ट बनवून घ्या. त्यात आवळा पावडर मिसळा, ताजा आवळा कापून बारीक करून घ्या. या पेस्टमध्ये एका लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा. जवळपास अर्ध्या तासासाठी तसंच सोडून द्या. त्यानंतर साध्या पाण्यानं केस धुवा. काही आठवड्यातच तुम्हाला केसांमध्ये फरक दिसून येईल.