Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > हिवाळ्यात मिळणाऱ्या रसरशीत आवळ्याचा करा हेअर डाय! प्रत्येक पांढरा केस होईल काळा - विकतच्या डायपेक्षा भारी पर्याय...

हिवाळ्यात मिळणाऱ्या रसरशीत आवळ्याचा करा हेअर डाय! प्रत्येक पांढरा केस होईल काळा - विकतच्या डायपेक्षा भारी पर्याय...

Amla hair dye naturally turn white hair into black : How to use amla for white hair : turn grey hair black naturally with amla : हिरवागार, ताजा आणि रसाळ आवळा केसांच्या समस्येवरील सर्वोत्तम नैसर्गिक उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2025 19:00 IST2025-11-15T18:40:45+5:302025-11-15T19:00:02+5:30

Amla hair dye naturally turn white hair into black : How to use amla for white hair : turn grey hair black naturally with amla : हिरवागार, ताजा आणि रसाळ आवळा केसांच्या समस्येवरील सर्वोत्तम नैसर्गिक उपाय...

Amla hair dye naturally turn white hair into black How to use amla for white hair turn grey hair black naturally with amla | हिवाळ्यात मिळणाऱ्या रसरशीत आवळ्याचा करा हेअर डाय! प्रत्येक पांढरा केस होईल काळा - विकतच्या डायपेक्षा भारी पर्याय...

हिवाळ्यात मिळणाऱ्या रसरशीत आवळ्याचा करा हेअर डाय! प्रत्येक पांढरा केस होईल काळा - विकतच्या डायपेक्षा भारी पर्याय...

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे, मोठ्या प्रमाणावर गळणे, टक्कल पडणे, केसांची वाढ खुंटणे अशा समस्या सतावतात. आपल्यापैकी बऱ्याचजणांना केसांच्या समस्या खूपच त्रास देतात. यातही केस अकाली पांढरे होऊ लागले की, आपल्याला जरा टेंन्शनच येते. केस पांढरे झाल्यामुळे ते लपवण्यासाठी अनेकजण केसांना कलर करतात किंवा थेट डाय लावतात. पण केसांना नेमके किती दिवस डाय लावणार किंवा कलर करून ते लपवणार. पांढऱ्या केसांवर काहीतरी ठोस आणि कायमचा असा नैसर्गिक उपचार करणे गरजेचे असते(turn grey hair black naturally with amla).

आर्टिफिशियल उपाय केसांना तात्काळ रंग देतात, पण त्यांचे दीर्घकाळानंतर  होणारे दुष्परिणाम त्वचा आणि केसांच्या मुळांना त्रास देतात. परंतु, हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात मिळणारा ताजा आणि रसाळ आवळा हे या समस्येवरील सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे. आवळा फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर केसांच्या अनेक समस्यांवर गुणकारी उपाय ठरतो. आवळ्यातील (How to use amla for white hair) व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि टॅनिन केसांचा नैसर्गिक काळेपणा टिकवतात आणि पांढरे केस हळूहळू नैसर्गिक काळे दिसू लागतात. हिवाळयात बाजारांत विकत मिळणाऱ्या ताज्या आवळ्याच्या हेअर डाय घरीच (Amla hair dye naturally turn white hair into black) अगदी सहज करता येतो. पांढरे केस काळे करण्यासाठी तसेच केसांच्या अनेक समस्यांवर उपाय म्हणून आवळ्याचा हेअर डाय कसा करावा ते पाहूयात. 

हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या आवळ्याचा करा हेअर डाय... 

हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या, रसाळ आवळ्याचा घरच्याघरीच नॅचरल हेअर डाय करण्यासाठी आवळा पावडर, आवळ्याचे तुकडे, मेहेंदी पावडर, चहाचे पाणी व लोखंडी कढई इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

आवळ्याचा हेअर डाय कसा करायचा आहे ? 

आवळ्याचा हेअर डाय तयार करण्यासाठी एका लोखंडी कढईत ताज्या आवळ्याचे तुकडे आणि आवळा पावडर एकत्रित घेऊन कोरडे भाजून घ्यावे. आवळा पावडरचा रंग गडद काळा होईपर्यंत हलके हलके भाजून घ्या. पावडर जळणार नाही याची काळजी घ्या. जेव्हा आवळा पावडर थंड होईल, तेव्हा तिला कढईतच राहू द्या. त्यात गरजेनुसार चहापत्ती उकळून गाळलेले पाणी मिसळून एक जाडसर आणि गुळगुळीत पेस्ट तयार करा. कढई झाकून ठेवा आणि ही पेस्ट कमीतकमी ८ ते १० तास किंवा पूर्ण रात्रभर तशीच राहू द्या. लोखंडाच्या कढईत राहिल्यामुळे आवळा रासायनिक प्रक्रिया करतो आणि एक गडद काळा रंग सोडतो, ज्यामुळे तुमच्या केसांना नैसर्गिक डाय तयार मिळतो.

जपानी स्त्रियांच्या सुंदर सिल्की केसांचे पारंपरिक सिक्रेट? करतात फक्त ३ गोष्टी, एकदम साध्या सोप्या...

हेअर डाय केसांना लावण्याची पद्धत... 

दुसऱ्या दिवशी सकाळी, तयार झालेला डाय सुक्या किंवा हलक्या ओल्या केसांच्या पांढऱ्या भागांवर चांगल्या प्रकारे लावा. हा डाय मुळांपासून ते केसांच्या टोकांपर्यंत लावा. ही पेस्ट आपल्या केसांवर कमीतकमी २ ते ३ तास लावून तशीच राहू द्या. केस धुण्यासाठी फक्त साध्या पाण्याचा वापर करा. शाम्पूचा वापर लगेच करू नका, कारण यामुळे रंग हलका होऊ शकतो.शाम्पू  तुम्ही २४ ते ४८ तासांनंतर वापरु शकता. 

हिवाळ्यात खा टम्म फुगलेली मसालेदार कोथिंबीर पुरी! पारंपरिक गरमागरम पदार्थ - खाऊन व्हाल खुश...

सुईदोरा न वापरता २ मिनिटांत करा सैल किंवा घट्ट ब्लाऊज परफेक्ट फिटिंगचे, पाहा ७ ट्रिक्स...

केसांसाठी आवळ्याचा हेअर डाय वापरण्याचे फायदे...

आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन 'सी' आणि अँटिऑक्सिडंट्स केसांच्या मुळांना मजबूत करतात, अकाली केस पांढरे होणे थांबवतात आणि केस वाढवण्यास मदत करतात. आवळ्याचा डाय केसांसाठी वापरल्याने केस नैसर्गिकरित्या काळे, मऊ आणि चमकदार बनतात. तसेच, लोखंडाच्या भांड्यात तयार केल्यामुळे हा डाय केसांना गडद रंग देतो आणि कोंडा तसेच स्काल्पच्या इतर समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो.

Web Title : प्राकृतिक आंवला हेयर डाई: इस सर्दी में सफेद बालों को करें काला!

Web Summary : घर पर आंवला हेयर डाई से सफेद बालों से छुटकारा पाएं! यह प्राकृतिक उपाय आंवला, मेहंदी और चाय के पानी का उपयोग करता है, और सर्वोत्तम परिणामों के लिए लोहे के बर्तन में संसाधित किया जाता है। यह स्वाभाविक रूप से बालों को काला करता है, जड़ों को मजबूत करता है और चमक जोड़ता है। रासायनिक रंगों को छोड़कर इस प्रभावी उपाय को अपनाएं।

Web Title : Natural Amla Hair Dye: Turn Grey Hair Black This Winter!

Web Summary : Combat grey hair with a homemade Amla hair dye! This natural remedy uses Amla, henna, and tea water, processed in an iron pan for best results. It darkens hair naturally, strengthens roots, and adds shine. Ditch chemical dyes for this effective solution.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.