त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. स्वच्छ, नितळ आणि निरोगी त्वचा मिळवण्यासाठी आपण अनेक क्रीम्स आणि ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरतो, पण नैसर्गिक उपाय (Alum & Coconut Oil For Skin Ayurvedic Doctor Shares Benefits) नेहमीच अधिक सुरक्षित आणि फायदेशीर (Applying Fitkari & Coconut Oil On Face) ठरतात. त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी घरगुती उपाय करताना, शक्यतो आपण घरात अगदी सहज उपलब्ध (How to use fitkari & Coconut Oil For beautiful skin) असणाऱ्या पदार्थांचा वापर करतो. खोबरेल तेल आणि तुरटी असे दोन पदार्थ हमखास प्रत्येकाच्या घरात कायम असतातच. खोबरेल तेल आणि तुरटी हे दोन्ही पदार्थ आपल्या त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात(Alum & Coconut Oil Facemask).
खोबरेल तेलात तुरटी मिसळल्यास त्याचे सौंदर्यवर्धक गुणधर्म दुपटीने वाढतात. तुरटीमध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुण त्वचेवरील बॅक्टेरियांचा नायनाट करून त्वचा आतून स्वच्छ ठेवतात, तर खोबरेल तेल त्वचेला खोलवर पोषण देतं. या दोन घरगुती पदार्थांचे एकत्रित मिश्रण त्वचेवरील पिंपल्स, काळे डाग, काळवंडलेली त्वचा अशा अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत करतात. याशिवाय, हा सोपा घरगुती उपाय केमिकलयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्सना उत्तम नैसर्गिक आणि घरगुती पर्याय ठरू शकतो. यासाठी नेमकं करायच काय ते पाहूयात...
खोबरेल तेल आणि तुरटीचे मिश्रण त्वचेसाठी फायदेशीर...
डॉ. जैदी यांनी युट्युबवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, खोबरेल तेल आणि तुरटी यांचे एकत्रित मिश्रण करून त्वचेला लावल्याने त्वचेचे संरक्षण केले जाते. हे मिश्रण त्वचेला स्वच्छ, निरोगी आणि पिंपल्सपासून दूर ठेवण्यास मदत करतं. नियमित वापर केल्यास त्वचेचा पोत सुधारतो, त्वचेची छिद्र (पोर्स) टाईट होतात आणि त्वचेतील अतिरिक्त तेलाचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
बागेतील 'या' हिरव्यागार पानांचा करा हेअर मास्क! केसांसाठी वरदान, दिसतील सुंदर-वाढतील भरभर...
त्वचेसाठी खोबरेल तेल आणि तुरटीचा असा करा वापर...
त्वचेसाठी खोबरेल तेल आणि तुरटीचा वापर करण्यासाठी १०० मि.ली. खोबरेल तेल घ्या आणि त्यात १ छोटा चमचा तुरटीची पावडर मिसळा.
दोन्ही घटक नीट एकत्र मिसळा, जोपर्यंत तुरटी पूर्णपणे तेलात विरघळत नाही तोपर्यंत हे मिश्रण चमच्याने कालवून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण एअरटाइट कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि आवश्यकतेनुसार वापरा.
याचा वापर त्वचेसाठी कसा करावा ?
डॉ. जैदी यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम चेहरा नीट स्वच्छ करा आणि त्यानंतर तयार केलेलं मिश्रण हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण १५ ते २० मिनिटांपर्यंत त्वचेवर लावून तसेच राहू द्या. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करत करत चेहरा कोमट पाण्याने धुवा.
भूमी पेडणेकरचा 'संडे स्पेशल फेसमास्क', पाहा तिच्या सुंदर त्वचेचे गुपित - वापरते 'हा' खास पदार्थ...
त्वचेवर खोबरेल तेल आणि तुरटी लावण्याचे फायदे...
१. त्वचेमधील घाण, डेड स्किन आणि अतिरिक्त तेल काढून त्वचा आतून स्वच्छ होते.
२. तुरटीमधील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म पिंपल्स आणि त्वचेच्या इतर संक्रमणांपासून बचाव करतात.
३. खोबरेल तेल त्वचेला खोलवर मॉइश्चराईज करुन मऊ बनवतं.
४. तुरटी त्वचेचे ओपन पोर्स टाईट करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा स्मूद दिसते.
५. तुरटी आणि खोबरेल तेलाचे अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचेची जळजळ, खाज, रॅशेज यांसारख्या समस्या कमी करण्यास मदत करते.