बऱ्याचदा असं होतं की त्वचेची योग्य ती काळजी घेण्यासाठी आपल्याकडे वेळच नसतो. आहारातून त्वचेला पाेषण मिळत नाही. धूळ, ऊन, प्रदुषण या सगळ्यामुळेही त्वचेचं नुकसान होतं. शिवाय शरीरात होणाऱ्या काही हार्मोनल बदलांमुळेही त्वचेवर ॲक्ने, पिगमेंटेशन दिसू लागतात. पिंपल्स येऊन गेल्यानंतर पुढे कित्येक दिवस त्यांचे डाग त्वचेवर राहतात. त्वचेच्या या सगळ्या तक्रारी दूर करण्यासाठी सगळ्यात पहिले आपला आहार, झोप या गोष्टी व्यवस्थित असतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण त्यासोबतच जावेद हबीब यांनी सुचविलेला एक सोपा उपायही घरच्याघरी करून पाहा (skin care tips by Javed Habib). यामुळे काही दिवसांतच पिगमेंटेशन, ॲक्ने कमी होतील असं ते सुचवतात.(home hacks to get rid of acne and pigmentation)
ॲक्ने, पिगमेंटेशन कमी करण्यासाठी उपाय
चेहऱ्यावरचे ॲक्ने, पिगमेंटेशन कमी करण्यासाठी कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो, याविषयीची माहिती जावेद हबीब यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे. त्यासाठी त्यांनी तुरटीचा एका खास पद्धतीने वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
वजन घटविण्याच्या नादात गरजेपेक्षा जास्त वॉकिंग कराल तर वजन जास्त वाढेल! वाचा डॉक्टरांचा सल्ला
तुरटीमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवरील डाग, काळसरपणा, ॲक्ने कमी करण्यासाठी ती उपयुक्त ठरते. म्हणूनच जावेद हबीब सांगतात की एका वाटीमध्ये तुरटीची पावडर १ चमचा घ्या. त्यामध्ये १ चमचा दही घाला. दही आणि तुरटीची पावडर एकत्र कालवा आणि हा लेप चेहऱ्याला लावा.(alum and curd face pack for reducing pigmentation and acne)
टॅनिंग कमी करून त्वचेवर चमक आणण्यासाठी दही उपयुक्त ठरते. दह्यामध्ये असणारे लॅक्टीक ॲसिड डेड स्किन काढून टाकण्यासाठी मदत करते. त्यामुळे त्वचा स्वच्छ होते. दह्यामध्ये असणाऱ्या ॲण्टीऑक्सिडंट्समुळे त्वचा तरुण, टवटवीत राहण्यास मदत होते.
गळ्यावर वाढणाऱ्या चरबीमुळे गळा गुबगुबीत दिसू लागला? ५ व्यायाम- मोरासारखी डौलदार होईल मान-गळा
दही आणि तुरटी या दोन्ही पदार्थांचे गुणधर्म जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्वचेवर त्याचा खूप छान परिणाम दिसून येतो. दही आणि तुरटीचा लेप चेहऱ्याला लावल्यानंतर तो १० ते १५ मिनिटे तसाच राहू द्या आणि त्यानंतर चेहरा धुवून टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा. चेहऱ्यावर खूप छान परिणाम दिसून येईल.